जगण्याचे बहाणे

Submitted by कुणी दिवाणा on 29 September, 2017 - 15:49

आभार सोहळा अंती, जाहिर केला मरणाने
त्या जहाल सुंदर ज्वाळा
चेतल्या तुझ्या स्मरणाने

मी हसलो होतो जेँव्हा ते मजला प्रेत म्हणाले
सरणावर निजले होते प्रेमाचे शापित गाणे

मी जळतानाही झरले नयनांतून कैक फवारे
मज कळले त्यातिल थोडे अश्रुही लाजिरवाणे

त्या शितल अस्थिँचाही तु स्पर्ष टाळला जेव्हा
मी राखेतून फुरफुरलो नशीबावरती जोराने

ठाउक मलाही नव्हते ,ती ओढ कशाची होती
नसता मी केले नसते जगण्याचे लाख बहाणे

Group content visibility: 
Use group defaults