हे बहुरुपी

Submitted by अनन्त्_यात्री on 29 September, 2017 - 05:44

हे बहुरुपी मृत्यो
एकदाच सांग, थांबवून समुद्राची गाज
कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज?
उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी?
की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई?
कळत नाही, दोष देऊ कुणा ?
या बजबजपुरीचा बकालपणा ?
की तुझा निरंतर मायावीपणा ?

(आज एल्फिन्सटन स्थानकावर चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली !)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Yes, it's about today's mishap due to stampede on Elphinstone Road bridge.

Yes, it's about today's mishap due to stampede on Elphinstone Road bridge.

स्थलबंधन नाही त्याला
काळही ठरलेला नाही
सोकावलेल्या मृत्यूला
भिती कुणाचीच नाही

सहज झडप घालणे
त्याच्या रक्तांत आहे
चुकवून त्याला जाणे
हातांत आपल्या नव्हे

खिन्नता मनांत दाटली
मृत्युगान तरी गात आहे
मृतात्म्यांना भावपुष्पांची
भरूनी! ओंजळ वाहत आहे
-र।हुल

(काळ- वेळ, भरूनी- साश्रूनयनांनी)

RIP__/\__