-सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली
-पाऊस सुरु असल्याने अनेकजण पुलावरुन खाली उतरण्यास तयार नव्हते. त्यामुळे पुलावर मोठी गर्दी झाली होती.
-10-15 मिनिटांत गर्दीत मोठी वाढ झाली. त्यामुळे काही लोक पुलावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र गर्दीमुळे त्यांना पुलावरुन उतरणं शक्य होतं नव्हतं.
-पुलावरच उभ्या असलेल्या कोणीतरी पूल पडत असल्याचं सांगितलं. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं.
-पूल पडत असल्याच्या अफवेमुळे उडालेल्या गोंधळात शॉर्ट-सर्किट झाल्याच्या अफवेने आणखीच भर घातली.
-अफवा पसरल्यामुळे पुलावरुन बाहेर पडण्यासाठी एकच गोंधळ उडाला. या गोंधळात अनेकजण खाली पडले. त्यांच्या अंगावर पडणाऱ्यांचं आणि खाली दबणाऱ्यांचं प्रमाण वाढत गेलं.
-श्वास कोंडल्याने जागच्या जागीच अनेकांनी जीव सोडला.
-घटना घडली त्यावेळी स्थानिकांशिवाय कुणीही त्यांना मदत करायला उपस्थित नव्हतं.
-घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
-अधिकारी जखमींचा आकडा खूपच कमी सांगत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केलाय. किमान 50 जणांना अॅम्बुलन्समध्ये टाकून उपचारासाठी नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय.
-दरम्यान, रोज सकाळी आणि संध्याकाळच्या याठिकाणी मोठी गर्दी होते. अनेकदा पूल मोठा करण्याची मागणी केली. मात्र त्याकडे कधी गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही, असा आरोप स्थानिकांनी केलाय.
(थोडक्यात पेज वरील माहिती)
मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत,
किरकोळ जखमींना ५०,००० ची मदत.
मृत व्यक्ती:
ज्योतिबा चव्हाण,रोहित परब,चंदन गणेश सिंग,
मोहम्मद शकिल,प्रियंका पासलकर,मयुरेश हळदणकर,
हिलोनी देढिया,शुभलता शेट्टी,सुजाता शेट्टी,सुरेश जैसवाल,अंकुश जैसवाल,श्रध्दा वर्पे,मासूद आलम,मुकेश मिश्रा,तेरेसा फर्नांडिस,सचिन कदम,Alex.
एल्फिन्स्टन स्टेशन च्या ब्रिज
एल्फिन्स्टन स्टेशन च्या ब्रिज वर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,
A negative आणि B negativ रक्तदात्यांनी त्वरीत के इ म हॉस्पिटलमध्ये यावे.
संपर्क: ०२२ २४१३६०५१
हा नंबर व्हॉटसपवर आला आहे. प्लीज कन्फर्म करा आणि शक्य आहे त्यांनी मदत करा.
फार दुर्दैवी आणि तितकाच संतापजनक प्रकार आहे हा. माणूसकीची भावना जपणारया आणि स्वत:ला या देशाचा नागरीक म्हणणारया प्रत्येकासाठी शॉकिंग आहे.
मायबोलीकर आणि त्यांचे जवळचे सुखरूप असतील अशी प्रार्थना करतो. पण एक मुंबईकर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात असे घडणे कोणी घरातलेच गेल्यासारखे वाटत आहे
अतीशय दुर्देवी घटना.
अतीशय दुर्देवी घटना.
मरणार्यांमध्ये १८ पुरुष व ४ महिला आहेत असे कळते.
अस्ताव्यस्त अवस्थेतील मृतांचे फोटो देखील लोकांनी व्हॉट्सअप वर व्हायरल केले आहेत.
ए-नीगेटीव्ह, बी- निगेटीव्ह,
ए-नीगेटीव्ह, बी- निगेटीव्ह, एबी निगेटीव्ह रक्तगट असणाऱ्यांनी केईएम रुग्णालयाशी लवकरात लवकर संपर्क करा. २४१३६०५१ आणि २४१०७०२० या क्रमांकावर संपर्क साधावा
खुप दुर्दैवी घटना.
खुप दुर्दैवी घटना.
केंद्र सरकारला अच्छे दिन आले आहेत मात्र गरिब मध्यमवर्गीयांना बुरे दिन आले आहेत.
अतिशय वाईट घटना. आणि भितीदायक
अतिशय वाईट घटना. आणि भितीदायक सुद्धा.
मी रोज एल्फिन्स्टनवरुनच येते.
ते वॉअॅ वर आलेले फोटो / विडीओ बघुन हुरहुर लागलीये मनाला.
खूप वाईट घडलं . पण परेल ची
खूप वाईट घडलं . पण परेल ची गर्दी आणि अरुंद पूल पहाता हे घडलं याच आश्चर्य नाही वाटत आहे. लोकं तरी काय करणार ? किती अगतिक आहोत आपण , अरुंद पुलाचा न वापर करण शक्य आहे का ? आता तिथे नवा रुंद पूल होईल पण त्यासाठी इतक्या लोकांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली .
एक काळ ठाणा स्टेशन ही असच नाईट मेअर होत. मला रोज वाटायचं की मी पडले तर चेंगरून मरेन असं. गर्दीत घुसायची मला भीती वाटते म्हणून मी पंधरा पंधरा मिनिटं पुलावरची गर्दी ओसरण्याची वाट बघत प्लँटफॉर्म वर उभी राहून काढली आहेत. इतकं असून ही एकदा मी अर्ध्या जिन्यात असताना हार्बर गाडीचा लोंढा आला . नशीब बलवत्तर म्हणूनच त्या दिवशी वाचले मी. आता ठाण्याला बरेच पादचारी पूल बांधले आहेत तेव्हा दोनच होते आणि वाशी गाडीमुळे ठाणा स्टेशनचा ट्रॅफिक किती तरी पटीने वाढला होता.
खूप वाईट घडलं . पण परेल ची
खूप वाईट घडलं . पण परेल ची गर्दी आणि अरुंद पूल पहाता हे घडलं याच आश्चर्य नाही वाटत आहे. लोकं तरी काय करणार ? किती अगतिक आहोत आपण , अरुंद पुलाचा न वापर करण शक्य आहे का ? आता तिथे नवा रुंद पूल होईल पण त्यासाठी इतक्या लोकांना आपल्या प्राणांची किंमत मोजावी लागली .>> ममो +१
रोजच पुलावरुन जाताना एवढी गर्दी असते. पुल मोठा का करत नाहीत असा विचार येतोच मनात.
काही महिन्यापुर्वी महलक्ष्मीला डीरेल झाली होती तेव्हा मी एलफिन्स्टनवरुन परेलच्या ब्रिजला गेले.
परेल ब्रिजवर प्रचंड गर्दीत फसले होते. माणसं हुल्लड करत होती. मधेच गर्दी हलायची.
माझा श्वास अडकला होता. मोठमोठ्याने अरे धक्का मारु नका. शांत रहा ओरडुन ओरडुन.
पण सुदैवाने काही धक्काबुक्की झाली नाही. हळुहळु पुलावरुन प्लॅटफॉर्मवर उतरले.
तेव्हाही आता जर धक्काबुक्की झाली तर मी चेंगरुन मरेन अशी भिती वाटली होती मला. खुप रडु येत होतं.
आजची घटना ऐकल्यापासुन तसंच फीलिंग आलंय.
बोरीवलीला पण अशीच
बोरीवलीला पण अशीच चेंगराचेंगरी व्हायची, पण सुदैवाने नवीन मोठे पूल बांधले आणि सोय झाली.
विरार पूर्वेकडे जाणारा पूल अजुनही खुप अरुंद आहे, तिथे देखील नेहमीच रेटारेटी होत असते.
व्हॉटसअॅपवर एक विडीओ आलाय. खुप अस्वस्थ करणारा विडीओ आहे. त्यात मृत बाईच्या हातात भाताच्या लोंब्या आहेत. बिचारी उद्या दसर्यासाठी खरेदी करायला गेली असेल आणि ह्या दुर्घटनेत सापडली.
बोरीवलीला पण अशीच
बोरीवलीला पण अशीच चेंगराचेंगरी व्हायची, पण सुदैवाने नवीन मोठे पूल बांधले आणि सोय झाली>>>
तरी सकाळी ९ ते १० मध्ये गर्दी असतेच..
सात नंबर वर काम सुरू असताना तर खूप जास्त असायची.
एक काळ ठाणा स्टेशन ही असच
एक काळ ठाणा स्टेशन ही असच नाईट मेअर होत. मला रोज वाटायचं की मी पडले तर चेंगरून मरेन असं. गर्दीत घुसायची मला भीती वाटते म्हणून मी पंधरा पंधरा मिनिटं पुलावरची गर्दी ओसरण्याची वाट बघत प्लँटफॉर्म वर उभी राहून काढली आहेत. इतकं असून ही एकदा मी अर्ध्या जिन्यात असताना हार्बर गाडीचा लोंढा आला . नशीब बलवत्तर म्हणूनच त्या दिवशी वाचले मी. आता ठाण्याला बरेच पादचारी पूल बांधले आहेत तेव्हा दोनच होते आणि वाशी गाडीमुळे ठाणा स्टेशनचा ट्रॅफिक किती तरी पटीने वाढला होता. >>>> हो ममो
ठाण्याच्या मोठ्या पुलाचे काम चालु होते तेव्हा खरेच खुप हाल झालेत.
एकदा, ५,६ अन १० नंबर फलाटावर एकाच वेळी गाड्या आल्या होत्या, भयानक गर्दी होती, तेव्हा एक वयस्कर काका होते त्यांना हार्ट अॅटॅक आला अन ते तीथेच गेले, पण बॉडी गर्दीबरोबर चालत होती. कूणाला काहीच कळले नाही.
जेव्हा २ नंबरच्या ईथे गर्दी विभागली गेली तेव्हा ते खाली पडले अन नंतर कळले की कधीच त्यांचे प्राण निघुन गेलेत.
बाकी आजच्या घटनेचे तर फोटोसुधा बघवत नाहीत, अन आश्चर्य सुद्धा वाटते की लोक असे फोटो देखील का टाकताहेत वॉट्स अॅप वर
खूप दुर्दैवी घटना
खूप दुर्दैवी घटना
अस सर्व असताना आज आपल्याला
अस सर्व असताना आज आपल्याला खरच बुलेट ट्रेनची गरज आहे का?
दुर्दैवी घटना!!
दुर्दैवी घटना!!
२७. १० लाख.
२७.
१० लाख.
अस सर्व असताना आज आपल्याला
अस सर्व असताना आज आपल्याला खरच बुलेट ट्रेनची गरज आहे का?
<<
राष्ट्रद्रोही
अत्यंत दुर्देवी घटना
अत्यंत दुर्देवी घटना
काय सालं किड्या मुंग्यांसारख आयुष्य आहे
बातमी वाचून फारच वाईट वाटले.
बातमी वाचून फारच वाईट वाटले.
पुलावरच उभ्या असलेल्या कोणीतरी पूल पडत असल्याचं सांगितलं. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं.
-पूल पडत असल्याच्या अफवेमुळे उडालेल्या गोंधळात शॉर्ट-सर्किट झाल्याच्या अफवेने आणखीच भर घातली.>>>खूपच गर्दी झाली आहे आणि कोणीच पुढे सरकत नाही असे वाटून कोणीतरी अशी खोटी बातमी सांगितली असेल मग लोक घाबरुन अशी दुर्घटना घडली. पण खरेच आपण काय बोलतो, पुढे त्याचे काय परिणाम होतील याचा जरा सुद्धा विचार असे लोक करत नाहीत का? अफवा निर्माण करणे किती चुकीचे आहे हे कसे समजत नाही!
<<<केंद्र सरकारला अच्छे दिन
<<<केंद्र सरकारला अच्छे दिन आले आहेत मात्र गरिब मध्यमवर्गीयांना बुरे दिन आले आहेत.>>>
इथे केंद्र सरकार चे काय मधेच काढलेत? का उगाचच?
पूल मोठा करावा म्हणणारे सिव्हिल इंजिनियर आहेत का? म्हणजे ते मुळात शक्य आहे का?
पूलच पाहिजे का, काही दुसरा मार्ग नाही? होणार नाही का?
एव्हढे सगळे हुश्शार भारतीय, किडा मुंग्यांसारखे जगतात नि मरतात! दुर्दैव. वाईट वाटतेच पण कुठेतरी रागहि येतो.
पैशाची अडचण नाही - अनेक सिनेमा नट नट्यांना गरीब जनतेबद्दल भरपूर कळकळ आहे. २०० हजार कोटी रु. घालून गरीबीवर सिनेमा काढून ते सिद्ध करत असतात. त्यात या पुलाचा खर्च सहज निघून येईल. राजकारणी तर जण्तेची शेवा क्रायलाचउनिवडून येतात ना? त्यांच्या जवळ भरपूर पैसा असतो.
पूल पडतोय अशी अफवा होती, असे
पूल पडतोय अशी अफवा होती, असे सुद्धा छातीठोक म्हणता येत नाही,
बऱ्याच ब्रिज खालून ट्रेन जाताना ब्रिज थरथरतो,
या केस मध्ये किती हलला?, रेसोनान्स फ्रिक्वेन्सी मॅच झाल्याने जास्त हलला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत.
अतिशय वाईट आणि दुःखद घटना,
अतिशय वाईट आणि दुःखद घटना, मृतांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
अडतीस वर्षांपूर्वी आलेल्या सिंहासन या चित्रपटातील एक डायलॉग
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
हे ज्या दिवशी सामान्य जनतेला समजेल तो सुदिन
(हा डायलॉग मी नुकत्याच वाचलेल्या एका ब्लॉग वरील लेखामध्ये पाहीला होता,
सद्य परिस्थिती मध्ये आठवला म्हणून इथे देत आहे )
न्हावी: ह्या वेळी दाभाडे
न्हावी: ह्या वेळी दाभाडे नक्की मुख्यमंत्री होणार.
दिगू टिपणीस: शिंदे आले काय आणि दाभाडे आले काय …तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो?>>>>>>>> बरोबर सब घोडे बारा टक्के....
आईग्ग किती दुर्दैवी घटना आहे
आईग्ग किती दुर्दैवी घटना आहे ही. वाचून खरंच कसेतरी होतेय. किती हाल ते लोकांचे.
हल्ली हे उठ्सुठ मरणाचे विडीओ, फोटो बघून मळमळतं.
पूल पडतोय अशी अफवा होती, असे
पूल पडतोय अशी अफवा होती, असे सुद्धा छातीठोक म्हणता येत नाही,
बऱ्याच ब्रिज खालून ट्रेन जाताना ब्रिज ,थरथरतो
या केस मध्ये किती हलला?, रेसोनान्स फ्रिक्वेन्सी मॅच झाल्याने जास्त हलला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत.>>>> +११११११
ठाण्याचा कर्जतसाईडचा ब्रिज सुद्धा खुप थरथरतो, बरेचदा ईतकी भिती वाटते की खरेच ब्रिज पडेल की काय अशी भिती वाटते
इथे केंद्र सरकार चे काय मधेच
इथे केंद्र सरकार चे काय मधेच काढलेत? का उगाचच?---- रेल्वे काय मुंबई महानगरपालिका चालवते का? अजून किती बळी गेल्यावर रेल्वे मंत्रालयाला अक्कल येणार आहे? ‘
'त्या’ पत्राची दखल घेतली असती तर २२ प्रवाशांचा जीव गेला नसता!
खूपच दुखद आणि दुर्दैवी घटना.
खूपच दुखद आणि दुर्दैवी घटना.
वाचून आणि ऐकूनच अस्वस्थ झाले दुपारपासून. वीडियोही बघताना खूपच हळहळ वाटली. जे लोक गेले त्यांच्या घरी काय वातावरण असेल ह्या विचाराने अस्वस्थ वाटतं.. .. लोकं का असे फोटो आणि वीडियो वायरल करतात...
मला वाटतं, फोटो आणि विडियो
मला वाटतं, फोटो आणि विडियो जास्तीत जास्त शेअर झालेच पाहिजेत. समस्या घरापर्यंत आल्यासारख्या, आपण त्याचा भाग असल्यासारख्या वाटतील तरी लोकांना. कधीतरी बंड करुन उठतील लोक... झुगारुन देतील आणि अराजक माजवतील, नकोय आम्हाला ह्या जीवघेण्या व्यवस्था.. दोषींना ताबडतोब शिक्षा करा.. दोषरहित यंत्रणा राबवा.. एक एक जीव वाचवा.... रस्त्यावर उतरतील लोक.
त्या बावीस मध्ये आपणही असलो असतो, हे कधीतरी आतपर्यंत घुसेल लोकांच्या मनात..... मी वाट पाहतोय त्या दिवसाची. जेव्हा लोक सविनय कायदेभंग करतील. व्यवस्था पुरवा, नंतर कर घ्या....
दोन वर्षाच्या वर झालेत, सुधारणेच्या नावाखाली पैसे उकळायला लागली रेल्वे. भ्रष्टाचार कमी झाला ना? आता तर पैसे कुठे जातही नस्तील कोणाच्या खिशात... निर्णयपण धडाधड घेतले जातात, कामाचा स्पीड पण आजच्या जगात सुपरफास्ट आहे. (मी नाशिकचे स्टेशन कुंभमेळ्यासाठी किती कमी वेळात किती चांगल्या दर्जाचे उभारले ते बघितले आहे प्रत्यक्ष.) मग आता नेमकी अडचण काय आहे?
संताप संताप संताप होतो नुसता.... किड्यामुंग्यांनी यल्गार कराय्ची वेळ आली आहे.
नरेन, तुमचे बरोबर आहे. इथे
नरेन, तुमचे बरोबर आहे. इथे केंद्र सरकारलाच शिव्या द्यायला पाहिजेत.
म्हणजे काय, इकडे लोकांचे जीव जाताहेत, पण आपल्याला त्याचेहि राजकारणच करायलाच पाहिजे. कुठल्याहि पक्षाचे सरकार असो, बहुमताने निवडून आलेले असो - एकदा सरकारला शिव्या घातल्या की बरे वाटते.
मंत्रीमंडळाला फक्त एक काम सांगितले होते की सगळे पूल खूप रुंद करा - तेव्हढेहि झाले नाही त्यांच्याकडून - त्यांना शिव्याच द्यायला पाहिजेत.
ते बाकीचे वाईट वाटणे वगैरे नंतर.
न४३, काय म्हणायचंय ते स्पष्ट
न४३, काय म्हणायचंय ते स्पष्ट बोला हो, तिरकस बाण मारायची ही वेळ नव्हे.
प्रतिवाद येतील म्हणून घाबरत असाल तर मग काहीच न बोललेलं उत्तम.
इंडिया टुडे न्यूज़ चैनल वर आता
इंडिया टुडे न्यूज़ चैनल वर आता कवर होत आहे, सांगत आहेत की सुरेश प्रभुन्नी दुसऱ्या पुलासाठी रेवेंन्ह्यू सैंक्शन केला होता, पण फाइल ब्यूरियॉक्रसी मध्ये अडकली.बाबु लोकांमुळे काम खूपच स्लो मोशन मध्ये चालते, आणि हे न्यूज़ चॅनल वाले पण घटना घडल्यावर सगळ कवर करतात आणि सांगतात की 2015 मध्ये दुसऱ्या पुला साठी मान्यता दिली होती पण पुढे काही झाले नाही, आधी बोम्बाबोम्ब करून ह्यचा जाब नाही विचारत.आपल्या कड़े सगळच पोस्ट एनालिसिस होत.
नादिवरचा पूल पडून गाड्या बस वाहून गेल्या नंतर न्यूज़ थ्रू कळत की ह्याची कल्पना त्या खात्याच्या लोकांना होती पण त्या कडे दुर्लक्ष केल्या गेले.
दुहेरी, या सर्व बाबतीत मंत्री
दुहेरी, या सर्व बाबतीत सध्याचे मंत्री खरेच हतबल आहेत असे तुम्हास वाटते काय?
अन जर हे मंत्री आज हतबल आहेत तर मग काँग्रेस ला शिव्या का घातल्या जाताहेत? त्यांचे मंत्री सुपरमॅन होते काय? सरकारी स्पॉन्सर्ड न्यूज चॅनल्स पृथ्वीराज्/पवारांना जाब विचारत आहेत
आजकाल सरकार सोडून बाबू, जनता, मरीआई, मुसलमान, इसाई, झालाच तर रोहिनग्या असे सगळे जबाबदार असतात. फक्त, सरकारचा "हेतू" चांगला आहे हो. अशी हाकाटी सुरु असते.
जरा विचार बिचार करायचा यत्न करा, असे सुचवितो. अभ्यास.
Pages