संघर्ष : भाग ०४

Submitted by दिपक ०५ on 23 September, 2017 - 05:45

भाग ०३ पासून पुढे..

१०:४० ला अनिकेतची गाडी सेंट्रल कॅफे समोर येऊन थांबली राधा कॅफेच्या दाराशीच उभी कोणाचीतरी वाट बघत असताना दिसली. अनिकेतने गडबडीने त्याची गाडी पार्क केली आणि तो राधा जवळ येऊन थांबला. त्याला समोर बघून राधा म्हणाली
‘अनिकेत तू लेट आहेस..’
‘आज अनुला कॉलेज पर्यंत सोडावं लागलं म्हणून थोडा वेळ झाला’ अनिकेत राधाला समजावण्याचा सुरत म्हणाला.. राधा त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली
‘अरे इट्स ओके.. आम्ही ही आताच आलोय..’ इतकं बोलून तीनं आपल्या मनगटावरील घड्याळावर नजर टाकली आणि म्हणाली
‘बरं तू आत जाऊन बस प्रिती आणि सागर बसलेत आत.’
अनिकेत आत आला सागर आणि प्रिती कॉफी पीत बसले होते. अनिकेत सागरच्या शेजारील खुडची ओढून बसला. राधा अजून बाहेरच उभी होती.
‘राधा का बाहेर? आणखीन कुणी येणार आहे का?’ अनिकेतने उत्सुकतेनं सागर आणि प्रितीवर नजर टाकत विचारलं..
‘हो, बहुतेक.. म्हणजे कोण येणार आहे ते नाही सांगितलं राधानं.. पण कुणीतरी येणारे म्हटली..’ प्रिती काॅफीचा सिप घेत बोलली
मोबाईल मधे डोकं खुपसून बसलेल्या सागरने अनिकेतला ‘हाय’ करून, वेटरला आणखीन एक कॉफी आणण्याचा इशारा केला.
अनिकेतने राधावर नजर टाकली. राधाच्या अशा विचित्र वागण्याबद्दल अनिकेतच्या मनात अनेक विचार येत होते शेवटी त्याने न रहावुन सागरला विचारलं.
‘काय रे राधाने असं सगळ्यांना अचानकपणे बोलावलं.. ते पण इथे, कॅफे मधे?. आनंदला जाऊन किती वेळ झालाय?.. आणि ही अशी बिंधास्त कशी वागू शकते..’ अनिकेतचं बोलणं ऐकून सागर आपल्या केसांवर हात फिरवत म्हणाला.
‘अनिकेत, हे सगळं तू राधालाच विचारलस तर बेटर आहे.. म्हणजे आम्हाला सुद्धा नक्की काय प्रकार आहे ते अजून कळलं नाहीये..’
वेटरने अनिकेतला कॉफी आणून दिली अनिकेतने कॉफीचे दोनचं घोट पिले असतील तशी राधा समोरून येताना दिसली पण ह्या वेळी ती एकटी नव्हती. राधा पुढे व तिच्या मागोमाग एक पसतीसीच्या आसपासचा पुरुष येत होता शेवटी राधाने त्या युवकाला बसायला सांगितलं आणि तीही आपल्या जागेवर येऊन बसली
अनिकेत त्या युवकाला एका कटाक्ष नजरेनं बघत होता त्याच्या मनात त्या युवकाबद्दल अनेक विचार फिरत होते. शेवटी राधाने त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली.
‘धिस इज प्रिती.. अँड ही इज प्रितीस बॉयफ्रेंड सागर.. अँड ही इज अनिकेत.. अँड गाईस.. धिस इज मि. निखिल मेहता..’
"मेहता" नावं ऐकताच अनिकेतच्या डोक्याचं चक्र फिरलं त्यानं डोक्यावर जोर दिला.. "मेहता"... नावं तर ऐकलंय.. पण कुठे?.. राधा चा भाऊ?.. छे!.. मग मेहता कसं?.. अनिकेत स्वतःशीच पुटपुटत होता.. शेवटी राधाने तो ताणलेला सस्पेन्स मोडला
‘अनिकेत, हे मी. मेहता.. गलॅक्सी इंटरप्राइस चे सीईओ..’ राधाने गलॅक्सी इंटरप्राइस म्हणताच अनिकेतचे डोळे मोठे झाले प्रिती त्यांच्या कडे बघून गालात हसली. सागर अजूनही आपल्या मोबाईल मधे डोकं खुपसून बसला होता प्रितीने त्याला टेबलाखालून डवचलं तसा तो सावध होऊन बसला

‘हॅलो एव्हरीबडी, जसं की राधा म्हणाली मी निखिल.. निखिल मेहता.. अनिकेत आमच्या कंपनीमधेच होता.. झालेला प्रकार ऐकून खूप वाईट वाटलं.. पण आय थिंक नाव वी शुड मुव्ह ऑन.. म्हणून तुम्हा सगळयांना बोलावण्यासाठी मिच राधाला सांगितलं.. आणि तसंही माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे.. मला तुम्हा सगळ्यांची थोडी मदत हवी आहे..’
अनिकेतला निखीलचं बोलणं पूर्णतः कळालं नव्हतं त्याने राधाकडे पाहून हाताने इशारा केला ‘कसली मदत?’..
राधा निखिलकडे बघत म्हणाली
‘निखिल, अनिकेतला मी याबद्दल अजून काही सांगितलं नाहीये.. प्लीज टेल हिम व्हॉट वी हॅव टू डू’
‘अनिकेत, अॅक्च्युअली जेव्हा हा सगळा प्रकार झाला. त्यावेळी बाय मिस्टेक माझा सेलफोन आनंदच्या कार मधे राहिला होता. तर..’ निखिलचं बोलणं अर्धवट थांबवत अनिकेत म्हणाला
‘काय?. तुमचा सेलफोन अनिकेतच्या कार मधे कसा?..’
‘अरे अनिकेत, अॅक्च्युअली ती कार निखीलनेच आनंदला एक महिन्यापूर्वी गिफ्ट केली होती.. आणि परवा आनंद आणि निखिल ऑफिसहुन एकत्रच परत आले कदाचित तेव्हा राहिला असेल..’ राधा आपली बाजू समजावण्याचा प्रयत्न करत होती..
‘ओके.. पण आता यामध्ये आमची कसली मदत लागणार तुम्हाला..’
‘अरे तेच तर, उद्या पोस्ट मोर्टेम रिपोर्ट येईल आणि इन्स्पेकटर सगळ्यांचे सेलफोन लोकेशन टॅब करत आहेत..’ राधा म्हणाली
‘मग?’
‘अरे मग निखिलचा सेलफोन आनंदच्या कारमधे असल्याने त्याचं लोकेशन पण आनंद सोबत दाखवेल ना.’
‘मग इन्स्पेक्टर ना सांग की निखिल सेलफोन गाडीतच विसरून गेला म्हणून..’ अनिकेत राधाच्या प्रत्येक उत्तरानंतर एक नवीन प्रश्न मांडत होता

राधा, निखिल, प्रिती आणि सागर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते राधाला आता पुढे काय बोलावं.. आणि अनिकेतला कसं आपल्या बाजूने करावं काहीच कळत नव्हतं शेवटी निखिल वैतागून राधाकडे बघत बोलला.
‘हे बघ राधा, असं लपवून काही उपयोग होणार नाही अनिकेतला काय आहे ते खरं सांगावचं लागेल..’
‘काय खरं?... राधा, कशाबद्दल बोलताय तुम्ही?.. अरे काय चाललंय काय तुमचं?..’ अनिकेतचा आवाज प्रत्येक वाक्याबरोबर वाढत चालला होता. त्याला स्थितीचा काहीच अंदाज लागत नव्हता त्याच्या मनात चालू असलेली विचारांची लहर चेहऱ्यावरून स्पष्टपणे झळकत होती..
‘अनिकेत, शांत हो..’ प्रिती अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
अनिकेत खूप अस्वस्थ झाला होता. निखिल आणि राधा विषयी खूप वाईट विचार त्याच्या मनात येत होते अनिकेतने राधा कडे बघितलं.. ती खाली मान घालून बसली होती
‘राधा, काय चाललंय काय तुमचं?.. कशाला बोलावलंय मला इथं?.. अनिकेतचा कर्कश आवाज कानावर पडताच राधा दचकली.. आणि दोन क्षण जाताच ती रडू लागली.. कॅफेचं वातावरण खूप गंभीर झालं होतं. कॅफेमधील सगळी मंडळी एक एक करून उठून जात होती चालू प्रकार बघून कॅफेचा मॅनेजर उठून टेबलापाशी आला. तसा सागर लगेच उठून मॅनेजरला स्थितीचा अंदाज देत सगळं ठीक असल्याचं समजावून परत लावून दिलं.
राधाला रडताना पाहून निखिल आपल्या जागेवरून उठून राधापाशी गेला. तिच्या डोक्यावरून हाथ फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला
‘राधा प्लीज तू शांत हो.. मी बोलतोय ना त्याच्याशी..’
‘अनिकेत, तुम्हाला इन्स्पेक्टरना सांगावं लागेल की आनंदच्या मृत्युवेळी मी तुमच्यासोबत होतो..’
‘काय?.. पण असं का बोलायचं आम्ही?..’

‘अनिकेत प्लीज तुला हे करावं लागेल..’

‘अरे पण मी का बोलू खोटं??’

‘कारण मिच मारलंय आनंदला.’ निखीलच वाक्य ऐकून अनिकेतच्या अंगावर शहारे उभे झाले राधा उठून रडत कॅफेच्या बाहेर पळाली प्रिती, सागर आणि निखिलही तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे पळत होते.
अनिकेत अजूनही शॉक मधे होता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं. राधाला निखीलनेच आनंदला मराल्याच माहीत असूनही ती का तिच्या सोबत होती? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते ज्याचं उत्तर त्याला माहित नव्हतं आणि ते जाणून घ्यायची त्याची हिम्मतही होत नव्हती..
आपला सर्वात जवळचा मित्र आणि आपली सर्वात जवळची मैत्रीण. दोघं एक मेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात.. आणि फक्त दोनच महिन्यांनी कळतं आपल्या मित्राची हत्या करण्यात आली.. आणि शेवटी त्याचा हत्यारा आपल्या समोर येऊन बसतो.. पण आपण काहीच करू शकत नाही??.
नाही...
अनिकेत उठतो आणि कॅफेच्या बाहेर पडतो.

क्रमशः.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह मस्त , कहानी मे नया ट्विस्ट, मला वाटल की राधाने किंवा अनिकेत ने मारल.
पण आनंदने मला घरी ड्रॉप केलं किंवा तत्सम काही कानाही सांगत निखील : एभाप्र

कथा लाईफ ओकेच्या एका भागाशी तंतोतंत मिळती जुळती वाटली मला त्या भागाचे नाव नीटसे आठवत नाही. नाहितर येथे लिंक दिली असती

कथा लाईफ ओकेच्या एका भागाशी तंतोतंत मिळती जुळती वाटली मला त्या भागाचे नाव नीटसे आठवत नाही. नाहितर येथे लिंक दिली असती
द्या लिंक.. मला ही बघुद्या

मस्त ट्विस्ट.
पण जरा लवकर लवकर टाका मला ही गोष्ट चैतन्य च्या गोष्टी बरोबर कन्फ्युज झाली. त्यात ही हा अनिकेत होता Happy

@ऋतु_निक @मंगेश @मेघाजी @राहुलजी @अदितीजी @बोक्या आठबंडे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार!.

असं कुणी मीच मारलंय सांगणार नाही सहज्पणे. एखाद्याला विश्वासात घेतल्याशिवाय.

<<<<‘हॅलो एव्हरीबडी, जसं की राधा म्हणाली मी निखिल.. निखिल मेहता.. अनिकेत आमच्या कंपनीमधेच होता.. >>> इथे अनिकेतच्या जागी आनंद हवंय.

पुढचा भाग कधी?

उद्या पोस्ट करेन अदिती जी.
धन्यवाद!.