या विष्णू मंत्राचा शुद्ध अर्थ काय आहे? ॐ नमो भगवते विष्णवे सर्वभूतात्मने वासुदेवाय सर्वात्मसंयोग योग पद्मपीठाय नमः

Submitted by Vaibhav Gilankar on 22 September, 2017 - 08:38

मी विष्णू भक्त आहे, विष्णूंवरील जवळ जवळ सर्वच पुराणांचे सार (विष्णू पुराण, गरुड पुराण, इ.) मी वाचले आहेत. तेव्हा विष्णू पुराण वाचून झाल्यावर त्यात शेवटी विष्णू आरती, मंत्र दिलेले होते. तेव्हा त्यात हा ॐ नमो भगवते विष्णवे सर्वभूतात्मने वासुदेवाय सर्वात्मसंयोग योग पद्मपीठाय नमः सर्वसिद्धी मंत्र होता. पण मला या मंत्राचा अर्थ माहित नाही तेव्हा कृपया याचा अर्थ कुणास माहित असेल तर सांगावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॐ नमो भगवते

ॐ नमो भगवते
त्या ॐ भागवताला नमस्कार

विष्णवे सर्वभूतात्मने
सर्व भुतांमध्ये वसणारा तो विष्णू
(सर्व प्राण्यांत आत्म्यात जो आहे)

वासुदेवाय सर्वात्मसंयोग
वासुदेव ज्याचा सर्वांशी संयोग आहे
(जो चराचरात आहे)

योग पद्मपीठाय नम:
ज्याने पद्म म्हणजे कमळात स्थान घेतले आहे त्याला नमस्कार.