नवरात्रीचे नऊ रंग कसे आले?

Submitted by सोनू. on 22 September, 2017 - 05:05

नवरात्र आली की मुंबईत नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.

पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही असं माझ्या ओळखीत तरी दिसलं.

महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. लोकसत्ता चा खप जास्त होतोय नी मटाचा कमी म्हणून खप वाढवण्यासाठी काय करावे यावर विचार करताना 2003 मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. मग काय, पसरले नवरंग मुंबईवर. इतके की मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं.

मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतं हे नक्की. मी पण नेहमी असे रंग वापरून रंगून जाते नऊ दिवस ( ऑफिसचे दिवस, सुट्टीत नाही Happy )

जय मटा, जय माता Wink

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेच वैभवलक्ष्मी व्रतही क्राफ्टेड आहे. भाविक स्त्रिया मात्र भक्तिभावाने पुजा-व्रत वगैरे करतात.

कारण भले काहिही असो, पण खुप मजा येते ह्या नवरंगामुळे.
तसे पाहता रोजचेच रंग असतात.
म्हणजे बर्याच जणी सोमवारी पांढरा, मंगळवारी - लाल, गुरुवारी - पिवळा ....... असेच रंग वापरतात.
पण नवरात्री ऊत्स्वात खास सगळ्या जणींनी ठरवुन, एकाच रंगाच्या साड्या, ड्रेस घालणे, गाणी गाणे खरचं खुप मजा येते. अन मुख्य म्हणजे यात वयोमर्यादा नसते, अगदी कॉलेज - शाळेच्या मुलींपासुन , वयस्कर बायकांपर्यंत सगळ्याच जणी खास असतात. नटतात , मुरडतात.

मी तर बर्यापैकी नास्तीक आहे, पण तरी हे रंग फॉलो करते .

आमच्या रोजच्या ट्रेनच्या ग्रुपमध्ये बर्याच जणी अश्या आहेत न ज्यांची खुप धावपळ असते, घर - ऑफिस सांभाळताना स्वःताकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो, अगदी त्या सुद्धा ह्या नऊ दिवसात स्वःताला प्रायोरीटी देतात, मजा मस्ती चालते अन मुख्य म्हणजे खुप रीलॅक्स वाटतात.
एरवी शेवटच्या क्षणी धावत पळत येण्यार्या सुद्धा वेळेच्या खुप अगोदर जमतो सगळ्या.

सो बरे वाटतात हे नऊ दिवस खुप एन्जॉय करतो सगळ्याजणी

नेहमी प्रश्न पडायचा की नेमकं हे रंग ठरवतं कोण आणि कसं?
ती लिंक बघतो आता लेखा खालची.

नाना, ह्यो 'क्राफ्टेड' शब्द धाग्याला भलते वळण लावू शकतो! Wink

सो बरे वाटतात हे नऊ दिवस खुप एन्जॉय करतो सगळ्याजणी
नवीन Submitted by VB on 22 September, 2017 - 15:02

>>> मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.

बाकी ठिके...

नानाकळा, बाकिच्यांचे माहित नाही पण आम्ही सगळ्या फक्त मजा करतो , एकत्र येऊन, कसलाही भेदभाव नाही.

अन ते फोटो असे कुठेही देत सुद्धा नाही

>>मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.>> अतिशय सहमत.
मला अजिबातच माहित नव्हतं हे अलिकडेच चालू झालेलं नवरंगाचं खूळ. फेसबुकमुळे कळलं.

>>> मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.
अगदी खरे आहे.

मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.>>> दोनेक वर्षांपूर्वी पुपुवर या अर्थाची चर्चा झाल्याचे आठवतेय.

साड्या नेसायला आवडतात. त्यासाठी निमित्त शोधत असते मी. सासरी आणि एकूणच दिल्लीत साड्या नेसण्याजोगी निमित्त मिळतही नाहित. या निमित्ताने नेसाव्यात असे मनात आले होते पण पुपुवरच्या चर्चेतून एक नवी परंपरा सुरू करण्यासाठी आपण नकळत हातभार लावू हे लक्षात आल्याने विचार सोडला.

हो चालतेय.
लिंक वाचली. अतिशय ब्रिलियंट आयडिया आहे.

मार्केटिंग आहे ते लक्षात आले होते. मी मुंबईला २००६ मध्ये आलो. त्याआधी कुठेही असे रंग पाहिलेले नव्हते. मात्र मुंबईला मटा मध्ये रंग दिसायला लागले. त्याचे बरेच दिवस आधीपासून मार्केटिंग सुरू असायचे. चर्चा असायच्या. आणि फोटो यायचे त्यामुळे सगळे जण मटा घ्यायचे मग.

मटाचा लुक बदलणे, ती मुंबई स्पेशल पुरवणी काढणे हे सगळे पण याच काळातले आहे. मटा वाचणाऱ्या जुन्या वाचकांना हे सगळे मार्केटिंग वाले बदल आवडले नव्हते पण नव्या पिढीमध्ये मटाचा खप वाढला या काळात.

त्यावेळी बऱ्याचदा मुंबईला मटाच्या एडिटोरियल टीम मध्ये असणाऱ्या नातेवाईकांकडे जाणे व्हायचे. हे सगळे बदल कसे होत गेले ते अनुभवायला मिळाले होते.

छान माहिती, धन्यवाद सोनू!

कलर्स मटा मध्ये येतात, त्यांची मार्केटींग मूव्ह आहे हे माहीत होतं, पण आता व्हॉट्सअपवर पण येतात.
ओव्हरऑल खूप छान आणि यशस्वी कॉन्सेप्ट आहे. लोकांना छान एकत्र आणलय या रंगांनी. मला नवरात्रीत कधी मुंबईत असल्यावर हे बघायला खूप आवडेल.

हे असे मार्केटिंग मटाने केले ही असेल पण नवरात्रीचे नऊ दिवस ठरवून विशिष्ट रंगांचा साड्या नेसणे हा प्रकार मी शाळेत असताना पासून बघितलेला आहे 1985 च्या जवळपास कधीतरी नक्की. त्यामुळे मटाने हे काही सुरू केलेलं नाही हे नक्की. एकदा मामा नागपूरहून आमच्या कडे नवरात्रात आला होता. त्यांने जेव्हा आईला ठराविक रंगाची साडी नेसताना पहिलं तेव्हा त्याने सांगितले होते की त्याचा बँकेत पण बायका असं करतात, बँड पार्टी सारखे सेम रंगांचे कपडे.

मी तर बर्यापैकी नास्तीक आहे, पण तरी हे रंग फॉलो करते .
>>>>>
नास्तिकता आस्तिकतेशी याचा काही संबंध नाही.
मी सुद्धा नास्तिक आहे. पण गरबा आणि डिस्को दांडिया चिक्कार खेळतो.

हे असे मार्केटिंग मटाने केले ही असेल पण नवरात्रीचे नऊ दिवस ठरवून विशिष्ट रंगांचा साड्या नेसणे हा प्रकार मी शाळेत असताना पासून बघितलेला आहे 1985 च्या जवळपास कधीतरी नक्की.
>>>>>

येस्स, मटाने उचलून धरले पण मूळ कल्पना त्यांची नाहीये.

याव्यतीरीक्त कॉलेजेसाम्ध्येही पूर्वापार एकेका विशिष्ट रंगाचे कपडे घालायचे डे'ज असतात...
कॉलेजला असताना मी म्हणजे आमचा ग्रूप हे फॉलो करायचा.. जिच्यासोबत कधी विचारही केला नसेल अश्या मुलींसोबत फोटो काढायला मिळायचे हे आकर्षण असायचे Happy
सध्या मात्र आमच्या ऑफिसमध्ये कोणीही मुलगा मंडळी हे फॉलो करत नाही, मी सुद्धा नाही. आता मुलींचे फोटो काढायला लागतात.. आधी ग्रूप आणि मग एकेकीचे स्वतंत्र. फुकटची हमाली, पण करावी लागते. तूच तर एक आहेस म्हटल्यावर आपण नाही बोलू शकत नाही Happy

मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.
बाकी ठिके...

>>>>>>

हा प्रकार मुख्यत्वे शहरातच बघायला मिळतो आणि शहरात राहणारी आताची जनरेशन स्मार्ट आहे.

मला अजिबातच माहित नव्हतं हे अलिकडेच चालू झालेलं नवरंगाचं खूळ. फेसबुकमुळे कळलं.
>>>>>>>>
तीन वर्षांपूर्वी हे वाचले असते तर कळले असते.
https://www.maayboli.com/node/50969
फेसबूकसे तेज ऋन्मेष Happy

येस्स, मटाने उचलून धरले पण मूळ कल्पना त्यांची नाहीये.

याव्यतीरीक्त कॉलेजेसाम्ध्येही पूर्वापार एकेका विशिष्ट रंगाचे कपडे घालायचे डे'ज असतात...

>>> कॉलेजेसमध्ये असेल विशिष्ट रंगाचे कपडे घालायचे फॅड.... पण त्यापूर्वीही भारतात रंगीबेरंगी कपडे घालत असतच... तेव्हा मुळ कल्पना कॉलेजांचीही नाहीच..

भारताच्या आधीही बहुतेक इजिप्त मध्ये कपडे घालत असत. तेव्हा कपडे घालायची मूळ कल्पना भारतीय नसावी...

आदिमानव प्राण्यांच्या कातडीचे वस्त्र धारण करायचा... वेगवेगळ्या रंगांच्या प्राण्यांच्या कातडी घालून त्याला नवरात्रीत एकाच रंगाच्या कातडीचे सगळ्यांनी वस्त्र धारण करावे असे वाटले असेल.. ..

मस्त माहिती सोनू.पण २००३ च्या आधीपासून हे चालू आहे.फक्त इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हते.

बाकी काहीही असो,हे रंग फॉलो करायला खूप आवडायचे.थोडीशी मजा इतकेच.आमच्या एका सेक्शनमधील सर्व पुरुषही हे रंग फॉलो करायचे.एखादा विसरला तर पेनल्टी म्हणून कॉफी त्याच्याकडून वसूल व्हायची.

तुझे लेख वाचत नाही हे सांगितलं की ऋन्मेष.
>>>>>
तेच तर सांगतोय ना सायो, जर वाचत असता तर तीन वर्षे आधीच हे समजले असते Happy

नानाकळा,
यू आर नॉट गेटींग माय पॉईंट ( . )
ईजिप्तमध्ये काय चालायचे किंवा आदिमानव काय करायचे यात मला जायचेच नाहीये. मी कुठेही असा दावा केला नाहीये की हे आमच्या वा मुंबईच्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा सुरू झाले. मला फक्त ईतकेच म्हणायचे आहे की मूळ कल्पना मटाची नाहीये. त्या आधीही हे घडत होते.
आणि जर आदिमानवापासून घडत असेल तर चांगलेच आहे की.. तसेही आदिमानव हे आताच्या माणसांपेक्षा जास्त फन लव्हिंग असावेत. आताचे लोकं विकेंड टू विकेंड जगतात आणि कुठेतरी असे ओकेजन शोधतात जेव्हा रिलॅक्स होता येईल. पण आदिमानवांचे मात्र उठसूठ मूड आला की झिंगालाला चालत असावे Happy

>>तेच तर सांगतोय ना सायो, जर वाचत असता तर तीन वर्षे आधीच हे समजले असते>> हे मला फेसबुकमुळे गेल्या तीन चार वर्षांपासून माहित आहे. ते कळायला तुझे लेखच वाचायला हवेत असं अजिबातच नाही.

अरे यार!
प्रत्येकच धागा हायजॅक करून पकवलंच पाहिजे का?

ऋ, यु आर नॉट गेटींग माय पॉइन्ट.... (चला आता पहले आप पहले आप खेळूयात का?)

लेख कशाबद्दल आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पद्धतीने सुरुवात करणारा मटा आहे. बास... कुठल्या गोष्टी कुठवर ताणायच्या याची लिमिट असते.

मूळ प्रश्न सांगू का काय आहे तो.....

तो हा आहे की "हे नऊ दिवसाचे नऊ रंग अमूकच आहेत आणि त्याची ऑर्डर हीच असावी हे कोण ठरवतं...?"

आता करा चर्चा मूळ विषयावर.....

नानाकळा,
मटा यांनी हे सुरू केले नाहीये या आशयाची मूळ पोस्ट माझी नसून मी फक्त आधीच्या एका पोस्टला प्लस वन देत मुंबईतल्या कॉलेजेसमध्येही चालायचे असे बोललो ईतकेच .... बाकी मटाचे मार्केटींग श्रेय हिरावून घ्यायची माझी जराही ईच्छा नाही.. असो Happy

हे नऊ दिवसाचे नऊ रंग अमूकच आहेत आणि त्याची ऑर्डर हीच असावी हे कोण ठरवतं...?"
>>>>>>
हे बहुतेक मटावालेच ठरवत असावेत.

मला प्रश्न पडलाय की दरवर्षी या रंगांची ऑर्डर सेम असते का?
माझा आज जुना लेख मी वाचला त्यात पहिल्या दिवशी येल्लो आणि दुसर्‍या दिवशी हिरवळ होती. यंदाही तेच आहे. दरवर्षी असाच क्रम असतो का?

जबरी मार्केटिंग आयडिया होती ही.

आता म्हणे लोकसत्ताने शब्दशः त्यांचे रंग दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे काही यांचे रंग निवडतात, तर काही त्यांचे, असे ऐकले Happy

> मजा म्हणून, एन्जॉय म्हणून ठिक आहे हो. फक्त त्याचे परंपरा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.
बाकी ठिके...
>> bang on..
मला येवढ्याकरता वगैरे नविन साड्या घेणारं पब्लिक चंगळवादी वाटतं.
मुळातच हे बेहएविअर फार इरॅशनल वाटते.
का? हा प्रश्न मला अनेक बाबतीत पडतो. असो.

Pages