जात दाखल्यावरची नडली

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 September, 2017 - 13:45

तो गेल्यावर गाडी अडली
जात दाखल्यावरची नडली

पदर फाटला आपुलकीचा
माणुसकी उघड्यावर पडली

फक्त एकदा मान तुकवली
सवय पुढे कायमची जडली

ओघळली आसवात स्वप्ने
उरली सुरली मनात सडली

गळे घोटले गेले होते
तरी एक इच्छा ओरडली

तिचे कुणीही ऐकत नव्हते
स्वतःशीच वेडी बडबडली

स्थान दिले मी मनात त्याला
मग नेमाने वारी घडली

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त एकदा मान तुकवली
सवय पुढे कायमची जडली

गळे घोटले गेले होते
तरी एक इच्छा ओरडली

मस्त... आवडली...

वाह !