मधुचंद्र

Submitted by अक्षय. on 17 September, 2017 - 12:42

मधुचंद्र

बंदिस्त अश्या त्या खोलीत
होता पसरला फुलांचा गंध
त्या गंधाला विसरुन सखे
झालो तुझ्यात मी धुंद

मग मी तुला जवळ ओढले
पाठीमागून घट्ट धरले
तुझे रोम रोम शहारले
तसे तू अंग चोरले

तुझ्या केसांची बट मागे सारुन
तुझ्या मानेवर मी ओठ टेकवले
माझ्या ओठांच्या स्पर्शाने सखे
अंग तुझे शहारले

तप्त ओठात ओठ हे गुंतले
श्वास श्वासात हळूच गुंफले
प्रीतीत डुंबलो चिंब होऊ प्रिये
धुंद प्रीतीची रात दे मला साथ

डोळ्यांची ही मौनभाषा
ओठी बांध फुले अबोली
ढळता पदर, ढळेल तोल
आज रातच पांघरली

ऊष्ण श्वास बोलत होते
हृद्यातली स्पंदने वाढत गेली
दोन क्षणांच्या ह्या खेळात
दोन अनोळखी जीव एक झाली
_अक्षय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ,
असा विषय हाताळण्याची हिंमत केली म्हणून सर्वात आधी अभिनंदन

छान

राजेंद्र देवी, बी.एस., निलेश८१, वैशाली अ वर्तक आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छान