बुलेट ट्रेन - मुंबई अहमदाबाद मुंबई

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2017 - 15:44

बघता बघता आपल्या डोळ्यांसमोर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावायला लागेल तो दिवस आता फार दूर नाही.
यानिमित्ताने मनात उठलेले प्रश्न
प्रश्न उठायचे कारण - बुलेट ट्रेननिमित्त होणारा अवाढव्य खर्च - तब्बल १.१ लाख कोटी !
आणि त्याचा मला पर्सनली काहीच न होणारा फायदा.
अर्थात मी टॅक्स भरतो म्हणून प्रत्येक गोष्टीचा फायदा मला व्हायलाच पाहिजे असे गरजेचे नाही, देशाचा विकास याला देखील आपलाच फायदा म्हटले पाहिजे.
पण बुलेट ट्रेन हि खरेच विकासासाठी आहे का? असल्यास कोणाच्या विकासासाठी? आणि तो देखील होणार आहे का?
माझ्या ऐकण्यात आले आहे की बुलेट ट्रेनचे तिकीट विमानाएवढेच किंवा किंचित जास्तच असणार आहे. जर हे खरे असेल तर किती लोकं या ट्रेनचा वापर करतील? याचा काही सर्व्हे काही स्टडी केला आहे का?
(माझ्या कानावर आलेली बातमी - सरकारी अनुमानानुसार सुरुवातीला वर्षाला 1.6 कोटी लोक या ट्रेनने प्रवास करतील, म्हणजे दिवसाला जवळपास 45000 लोक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जातील. - मला जरा हा आकडा जास्तीचा फुगवलेला वाटतोय. प्लीज कन्फर्म)
जर आजच्या तारखेला हा प्रकल्प फायद्यात जावा ईतके लोकं प्रवास करणार नसले तरी येत्या काळात ते वाढणार आहेत का? किंबहुना ते वाढावेत यासाठी काही योजना आहेत का?
आजच्या तारखेला हा प्रकल्प फारसा फायद्यात नसला तरी काही वर्षांनी जेव्हा देशातील महत्वाची सारे शहरे बुलेट ट्रेनने जोडली जातील तेव्हा ते देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे - मुंबई- अहमदाबाद रूट जास्त योग्य ठरेल ना. Recovery होऊ शकेल.
हा जर घाट रस्ता मुळे Construction prize जास्त लागत असेल तर कल्पना नाही.

परेळ एलफिस्टन ब्रिजवर झालेल्या दुर्दैवी घटनेचे प्रतिसाद बुलेट ट्रेन विरोधात उमटत आहेत.

राज ठाकरे यांनी मुंबईची लोकल ट्रेन व्यवस्था सुधारल्याशिवाय महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही अशी खुली चेतावणी दिली आहे.

अश्यात मोदींचा एक (बहुतेक जुना) विडिओ वायरल होत आहे ज्यात ते म्हणत आहेत की बुलेट ट्रेनची गरज आपल्याला फक्त दिखाव्यासाठी हवी आहे, भारताचे स्टेटस वाढवायला, जसे गरज नसताना कार घेतली जाते.
मी अजून पाहिला नाही तो विडिओ पण नवाकाळचे पहिले पान याच बातमीने भरले आहे.

एकंदरीत बुलेट ट्रेन सहजी होणार नाही अशी लक्षणे आहेत.

या बुलेट ट्रेनसाठी भारताला जपानकडून ०.०१ टक्के ईतके अविश्वसनीय नगण्य दराने कर्ज मिळाले आहे..
मला वाटतं हा प्रोजेक्ट जपानाच करत असला पाहिजे .
प्रोजेक्ट खर्च वाढवून जपान नफा कमवू शकतो

राजेश१८८, जपानच्या बँकांमध्ये पैसा अक्षरशः कुसतोय. बँक ऑफ जपान मध्ये (म्हणजे तिथली रिझर्व बँक) तिथल्या कमर्शियल बँकांनी पैसे ठेवले, तर त्यांना व्याज मिळण्याऐवजी, व्याज कापून घेतलं जातंय. तिथे कोणीही कर्ज मागत नाही. अशा वेळी हे ०.१% व्याजही जपानला फायदेशीर आहेच. शिवाय त्यांच्या उद्योगांना त्यातून काम मिळेल.
भारताला यातून नक्की काय मिळणार आहे?

खूप वेगाने धावणारी रेलवे भारतात पहिल्यांदा आली .असे पण railway चा वेग वाढवणे गरजेच आहे त्या द्रुष्टीने भारताचे
पहिले pavul

मुम्बई cst ते ठाणे 33 km अंतर आहे ते पार करायला slow train ला 50 min आणि फास्ट train 40 min लागतात .
म्हणजे 40/45 km per hour हेच स्पीड आहे train च.
रस्ते चांगले असतील तर रस्ता वाहतुक सुधा कमीत कमी 60 च्या स्पीड नि होवू शकते .

इंद्रायणी exp ला मुम्बई पुणे अंतर पार करायला 3 तास 20 min लागतात अंतर 192 km आहे म्हणजे सरासरी 60 स्पीड आहे
exp way वर गाड्या चे स्पीड 90 ते 100 असत .
ही उदाहरण खूप झाली

प्रस्तावित बुलेट train चे स्पीड 350km/ तास असेल .
100000 lakh करोड इतका खर्च अपेक्षीत आहे .बहुतांश railway मार्ग एल्वेटर प्रकार चा असेल त्या मुळे जास्त जमीन sampadit करायची गरज नाही .
खूप कमी इन्टरेस्ट नि कर्ज उपलब्ध आहेत
आता हेच अंतर पार करायला 7 tas लागतात बुलेट train 2 तासच lagtil.
आणि train ची capacity 15000 पेसेंजर्स ची असेल .
खर्च आरामात वसूल होईल चिंता नसावी .
ह्याच्या पूढे जावून मी असे म्हणेन की देशा अंतर्गत रेलवे फक्त kendra सरकारांनी चालवावी आणि राज्या अंतर्गत railway सेवा ही पूर्णतः राज्य सरकारांच्या अधिकारात असावी प्रतेक ठिकाणी केंद्र सरकार ची लुडबुड नको
महाराश्ट्र मधील महत्वाच्या मोठ्या शहरांच्या परिघात 200 ते 300 km paryantcha भाग स्पीड railway नि जोडावेत .
tya मुळे satara मध्ये रहाणारा व्यक्ती 45 min पुण्यात पोचेल .
नोकरी साठी त्यला पुण्यात राहायची गरज नाही .तो satara मध्ये राहून पुण्यात नोकरी शिक्षण करू शकेल .
आता शहरांत जो लोकसंख्येचा विस्फोट होवून ती बकाल झाली आहेत ती वाचवता येतील .
त्या साठी योग्य भावात गतिमान प्रवास काळाची गरज आहे
bullet train ही त्याची सुरवात आहे

नेहमी भविष्याचा विचार करणार नेता आहे तो बाकी पक्षाचे नेते 100 वर्षा पूर्वी कसा कोण्ही कोणावर अन्याय केला ह्यातून बाहेरच येत नाहीत ते काय देश प्रगती pathavar नेणार

असेल असेल. नोटाबंदीच्या वेळी दिसलंच.
नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 13:31
<<

तुमची नोटबंदीची जखम अजून ठसठसतेय, हे पाहून बरे वाटले. Lol

मुंबईत बोरीबंदर ठाणे या दरम्यान १८-१९ स्थानके आहेत. त्या प्रत्येक स्थानकात शिरताना आणि निघताना कमी करावा लागणारा वेग, प्रत्यक्ष थांबण्याचा वेळ आणि तीन तीन मिनिटांनी पाठोपाठ धावणाऱ्या गाड्या ह्यामुळे गाड्यांचा सरासरी वेग कमी राहातो. जलद गाड्या मोजक्या स्थानकांवर थांबत असल्याने त्यांचा वेग थोडा अधिक असतो. लोकांच्या सोयीसाठी स्थानके जास्त असावी लागतात. ओशिवरा(राम मंदिर) आणि नाहूर किंवा कोपर येथे वस्ती वाढल्यावर तेथे थांबे द्यावे लागले. लोकल गाड्यांची तुलना बुलेट गाडीशी करताच येणार नाही. बुलेटला महाराष्ट्रात फक्त चार थांबे आहेत. अधल्यामधल्या ठिकाणच्या लोकांना पन्नास साठ किलोमीटर दूरच्या स्थानकात जाऊन गाडी पकडावी लागेल. ह्या अंतर्भागात जोडरस्त्यांचे व्यापक आणि कार्यक्षम जाळे उभारल्याशिवाय लोकांना ह्या गाडीचा उपयोग होणार नाही. हा एलेवेटेड कॉरिडोर असणार आहे असे म्हणतात. म्हणजे हा एक स्वतंत्र कॉरिडोर आहे. अन्य कुठल्याही रूळमार्गावरच्या गाड्या या मार्गावर धावू शकणार नाहीत किंवा इथल्या गाड्या दुसऱ्या मार्गावर वळवता येणार नाहीत. हा मार्ग म्हणजे जमिनीचा एक लांबच लांब अखंड तुकडा असणार आहे. मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. ठाणे ते बिलाड टापूतल्या सुपीक जमिनींचे मालक या प्रकल्पाचे लाभधारी नसणार. शिवाय इथे वाढत्या वेगाने शहरीकरण आणि बृहन्मुंबईत सामिलीकरण होत असताना जमिनींच्या वाढत्या भावांचा फायदा त्यांना मिळणार नाही. बीकेसी अथवा ठाण्याहून अहमदाबादला जाणाऱ्यांनाच फक्त हा डेडिकेटेड मार्ग सोयीचा आहे. कारण या स्थानकात पोचणे त्यातल्या त्यात सोयीचे आहे. (बोइसर ते वापी ९७ कि. मी. आणि विरार बोइसर ६८ कि. मी.)त्यातूनही गाडीच्या दोन सेवांमध्ये वेळेचे खूप अंतर असेल तर दुरून येणाऱ्यांना खूप गैरसोयीचे होईल. म्हणजे प्रत्येक सेवा ही स्वतंत्र नसेल तर. एक लोकल चुकली तर लगेच दुसरी पकडता येते. सत्तर सेवा प्रतिदिनी असणार आहेत. एका दिशेने ३५. प्रत्येक सेवेसाठी आरक्षण असेल तर तेही गैरसोयीचे ठरेल. एकाच धर्तीच्या ट्रेनसर्विससाठी आरक्षणाची आवश्यकता नसावी. संगणकावर जितक्या आणि जिथे जागा असतील तितक्या भरल्यावर तिकिट देणे बंद करता येईल. असो. गैरसोयीचे अनेक मुद्दे आहेत.

>>गैरसोयीचे अनेक मुद्दे आहेत.<<

सोय्/गैरसोयीचे मुद्दे रिलेटिव आहेत, तुम्ही कुठुन बघता यावर अवलंबुन आहेत. देशाच्या भविष्याकरता या प्रोजेक्टची स्ट्रटिजिक वॅल्यु काय आहे, हे समजुन घेणं जरुरीचं आहे. विरोध करणं हा काहिंचा स्थायीभावच असतो; तो इवन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला देखील झाला होता...

पहिल्या पानावरचे आणि आताचा प्रतिसाद पाहता, बघायची जागा बदललेली दिसते.
राजेश१८८, खारफुटीची तोड व त्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल तुमचं अमूल्य मत मांडलं नाहीत?

नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 19:38
<<

अरबी समुद्रात भराव घालून इंग्रजांनी संपूर्ण मुंबई उभारली होती. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मुंबईचा विस्तार कैकपटीने वाढलाय, तर तुमच्या मते त्यावेळी किती खारफुटीची कत्तल व पर्यावरणाचे किती नुकसान झाले असावे ?

शंभर वर्षांपूर्वी आणि आता पर्यावरण विषयक समस्यांत आणि जाणिवेत काहीतरी फरक पडलाच असेल की नाही?
नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 20:14
<<

तुमचा सारखा विचार त्यावेळच्या लोकांनी केला असता तर आज तुम्ही बैलगाडीत फिरत असता. जुन्या वाहतुक व्यवस्था आज अपग्रेड केल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येच्या कारणाने त्या कोलमडून पडतील.

हा प्रयोग यशस्वी झाला तर पूर्ण देशात high स्पीड रेल्वे line टाकता येतील
स्पीड रेल्वे ची भारताला गरज आहे

विषय काहिही असो, काही लोकांची सुई अजूनही नोटबंदी वरच अडकली आहे.. Wink
असो.
बुलेट ट्रेन नक्कीच फायद्याची आहे, पण तो फायदा /परतावा लगेच एक दोन वर्षात मिळेल अशी अपेक्षा ठेवणे चूकीचे आहे. असे सर्वच मोठे प्रकल्प हे लाँग टर्म बेनिफीट च्या हिशेबाने ऊभारले जातात. (अपवाद- पुतळे) Happy
भारतात मात्र अजूनही रस्ते, माल वाहतूक, या साठी प्रचंड विकास व पुनर्बांधणीची गरज वाटते. बुलेट ट्रेन पेक्षा तूर्तास रस्ते, महामार्ग ई वर अधिक गुंतवणूक व विकास भर दिला तर थेट फायदा जास्त अधिक व लवकर मिळेल हे मात्र नक्की. Roads are first respondents/tier of supply chain.. which can significantly improve living stds and lower cost index.
पुन्हा भाजप्/एन्डीए निवडून आले तर मा. गडकरी साहेब या बाबतीत खूप मोठा विकास व बदल घडवू आणतील अशी आशा आहे. ज्या वेगाने व कुशलतेने त्यांनी गेल्या ५ वर्षात काही प्रकल्प मार्गी लावले आहेत, पूर्ण केले आहेत त्याला तोड नाही. He is certainlythe right man for the infrastructure mission.
त्या साठी म्हणूनच पुन्हा एकदा मोदी सरकार संपूर्ण बहुमतने सत्तेत येणे आवश्यक आहे हे वेगळे लिहायला नको. Wink
मतदार या सर्व गोष्टि लक्षात ठेवून मतदान करतील अशी आशा आहे.
ज्या दिवशी 'फुकट' नको पण आमच्या कर वसूलीतून ऊत्तम व्यवस्था सरकारने ऊपलब्ध करून द्यावी असा आग्रह सर्वसामान्य जनता धरेल त्या दिवसापासून भारताच्या राजकीय वे एकंदरीत नकाशाचा कायापालट होईल हे नक्की. पण ७० वर्षे फुकट खायची व कर न भरायची सवय असलेल्या बहुजन समाजाला हे सत्य ऊमगायला अजून अनेक दशके जावी लागतील. त्या दरम्यान मात्र, नोटबंदी, ई गवरनंस, सुरक्षा धोरण, समान कायदा... अशी अनेक ऊलथापालथीची धोरणे कदाचीत पचवावी लागतील.
अन्यथा नेहेमीचा सोपा मार्ग आहेच- फुकट देऊ करणार्‍यांना, बटाट्या मधून सोने देऊ करणार्‍यांना, फुकट पगार भत्ता देऊ करणार्‍यांना, आतंकवादी व धर्मांधांना मानवी हक्काखाली पोसणार्‍यांना... पुन्हा सत्तेत आणणे. म्हणजे आपला आपल्यापुरता झटपट फायदा होईल. पुढील पिढी, राष्ट्र वगैरे ची ऊगा चिंता नको. छान पूर्वी प्रमाणेच बेबंद व बेताल रहावे आणि आनंद घ्यावा.

मुंबई ते सातारा हे अंतर पार करायला 12 तास सुध्दा लागायचे exp way झाला आनी 6 तासात माणूस मुंबई मधून सातारा ला पोचू लागला ।
तो झालाच नसता तर आता वाहने एवढी वाढली आहेत की 24, तास लागले असते पोचायला

Pages