विराट कोहली हा क्रिकेटर म्हणून माझा आवडता खेळाडू आहे. अर्थात कित्येकांचा असेलच. पण एकेकाळी त्याचा अॅरोगन्स आणि अॅटीट्यूड माझा तितकाच नावडता होता. हल्ली त्या बाबतीतही आवडता झालाय असे नाही, पण नक्कीच वाढत्या प्रगल्भतेनुसार त्यात झालेला बदल जाणवतो. मात्र नुकतीच कानावर आलेली बातमी खरेच कौतुकास्पद आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/to-pract...
पेप्सीची जाहिरात करण्याच विराट कोहलीने चक्क नकार दिला आहे.
"जर मी पेप्सी पित नसेल तर ईतरांना प्यायला का सांगू?" - विराट कोहली.
आता हा नकार देताना त्याने कित्येक करोडोंवर पाणी सोडले असेल ते तर आलेच, पण माझ्यादृष्टीने पेप्सीच्या जाहीरातीला दिलेला नकार यासाठी महत्वाचा आहे कि हे पेय शरीराला घातक आहे हे समजल्याने मी स्वत: गेले चार-पाच वर्षे असली फसफसणारे पेये पिणे सोडले आहे. अन्यथा एकेकाळी मी देखील हे काहीतरी कूल असते या नादात अगदी रोजच पाण्यासारखे कोक-पेप्सी प्यायचो. त्यामुळे माझ्या आरोग्याची वाट लाऊन घेतली आहे. पोटाचे काही विकार मागे लागले आहेत. गेल्या दोनचार वर्षात जेव्हा जेव्हा हे प्यायचा मोह आवरला नाही तेव्हा तेव्हा दुसर्या दिवशी त्रास हा झालाच. कालांतराने हा पॅटर्न लक्षात येताच तो कधीतरी होणारा मोह देखील मी टाळू लागल. पार्टीमध्ये प्रत्येकाच्या हातात हार्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंकचा ग्लास असताना मी थंड पाण्याचा ग्लास धरून मिरवायला शिकलो आहे.
कधीकधी मलाच आश्चर्य वाटते की एकेकाळी दर दिवसाला सरासरी ३०० ते ४०० मिलीलीटर फसफसणारे पेय आतड्यात सोडणारा मी, आता हा संयम सहजपणे कसा राखू शकतो. पण याचे उत्तर फार सोपे आहे. पुढच्याच दिवशी लगेच त्याचा त्रास होणार आहे हे मला माहीत असते. त्यामुळे एखाद्या डायबेटीक व्यक्तीला जसे संभाव्य त्रासाचा विचार करता गोडावर नियंत्रण ठेवायला सहज जमत असावे तसेच मलाही हे जमते. पण ज्यांना आज हे आपल्याला पचते असे वाटतेय त्यांनीही कुठल्या भ्रमात राहू नका. आज नाही तर उद्या ही पेयं आपला रंग दाखवणारच. दारूचे दुष्परीणाम निदान आपल्याला माहीत तरी असतात आणि ते आपण मान्य तरी करतो, पण या पेप्सी, कोक वगैरेंना निरुपद्रवी समजत याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि कालांतराने ते आपले शरीर पोखरत जातात. शक्य झाल्यास वेळीच सावध व्हा.
जसे मी माझ्या जवळच्या लोकांना दारू पिण्यापासून परावृत्त करतो तसेच या सॉफ्ट ड्रिंक बाबतही त्यांना जागरूक करायचा वेळोवेळी प्रयत्न करतो. काही जणांना पटते, तर बरेच जण हसून पुढचा घोट पितात. कोहली सारख्या फिटनेसला जपणार्या आजघडीच्या सर्वोत्तम भारतीय खेळाडूने या जाहीरातीला नकार दिला आहे, या बातमीला जर प्रसिद्धी मिळाली तर या पेयांची एक नकारात्मक जाहिरात होईल आणि ही कशी आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात हे चार लोकांना कबूल होईल.
याचसाठी, धन्यवाद आणि अभिनंदन विराट कोहली !!
विराट कोहली यांचे अभिनंदन.
विराट कोहली यांचे अभिनंदन. कोक पेप्स्सी इत्यादि पेये खरेच आरोग्याला हानिकारक आहेत. त्यांचा सेल भारतात कमी होत चालला आहे. आपल्याकडे नारळ पाणी, ताक, घरी काढलेले फळांचे रस ( जास्त साखर न घातलेले) कोकम सरबत, जलजीरा, लिंबू सरबत असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाहिरातींच्या आधारे अति साखर व अनेक घातक रसायने असलेली ही पेये प्यायचा मोह टाळावा कोकाकोला प्यायल्यावर शरीरात काय होते त्याचे विवरण जालावर उपलब्ध आहे. शोधून लिहीन इथे.
पहिल्या दहा मिनिटात एका कॅन मधली दहा टी स्पून साखर तुमच्या रक्तात मिसळते, तुम्हाला अति साखरेने उलटी येत नाही कारन फॉस्फेरिक अॅसिडने तो स्वाद कंट्रोल होतो.
The liver then turns the high amounts of sugar circulating our body into fat. Within 40 minutes, the body has absorbed all of the caffeine from the Cola, causing a dilation of pupils and an increase in blood pressure. ... An hour after drinking the beverage, a sugar crash will begin, causing irritability and drowsiness.Aug 15, 2015
https://www.medicalnewstoday.com/articles/297600.php
ही माहिती कोक ची आहे पण त्यापेक्षाही जास्त साखर पेप्सीत आहे.
विराट् ने जाहिरात न करण्याचा निर्णय उत्तम आहे कारण अनेक इम्प्रेशनेबल तरूण तरुणी, मुले क्रिकेटर्स ना फॉलो करतात. विराटचे हेल्थ व फिटनेस रेजीम खरेच वाखाणण्याजोगे आहे. आर्थिक मोह नाकारण्याचे पण एक चांगले उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवले आहे.
ह्या धाग्याला यही है राइट चॉइस बेबी आहा. असे शीर्षक ही शोभले असते. वाइज आउल स्माइ ली.
छान! लेखाचा आशय आवडला. मीही
छान! लेखाचा आशय आवडला. मीही असे कुठले पेय पित नसल्याने जास्त रिलेट झाला. कोहलीची फलंदाजी आवडते, कोहली नाही पण या निर्णयासाठी त्याचे अभिनंदन आणि धन्यवाद!

प्रतिसाद संपला.
धन्यवाद
विराट कोहलीचे अभिनंदन.. योग्य
विराट कोहलीचे अभिनंदन.. योग्य निर्णय..
मी स्वतः सुद्धा कुठल्याही प्रकारचं शीतपेय पीत नाही.
अमा, माहीती असेल तर येऊद्या.
अमा, माहीती असेल तर येऊद्या. मी जवळच्या लोकांना हे प्यायला परावृत्त करतो, पण कधी माहिती शोधायला गेलो नाही कारण स्वत:च्या अनुभवानेच हे समजलेय. माहिती हाताशी असल्यास चार लोकांना आणखी परीणामकारक समजवता येईल.
आपण धाग्याचे शीर्षक छान सुचवलेत, तरी मी फसफसणारे पेय हे मुद्दामच शीर्षकात ठेवले कारण काय घातक आहे तर फसफसणारी पेयं घातक आहेत हे डोक्यात फिट बसावे.
कोहलीचे नावही मुद्दाम राहून दिले ते निव्वळ त्याचे कौतुक म्हणून नाही तर आजच्या तारखेला फिटनेसबाबत त्याच्यासारखे प्रसिद्ध उदाहरण दुसरे नाहीये. त्यामुळे आपसूक हे लिंक होईल आणि ते देखील लोकांच्या ध्यानात राहील.
अवांतर - विराट कोहलीने
अवांतर - विराट कोहलीने कुठल्याश्या फेअरनेस क्रीमच्या जाहीरातीलाही नकार दिला आहे. असे त्या बातमीत वाचले. वर लेखात मुद्दाम उल्लेख केला नाही, कारण विराट कोहलीने अमुकतमुक उत्पादनांना दिलेले नकार यावर फोकस ठेवायचा नसून शीतपेयांच्या घातकतेला हायलाईट करायचे होते. प्रतिसादांत लिहायला हरकत नाही, त्याबद्दलही कोहलीचे अभिनंदन. अमा यांनी म्हटल्याप्रमाणे - आर्थिक मोह नाकारण्याचे पण एक चांगले उदाहरण त्याने लोकांसमोर ठेवले आहे.
छान बोलके उदाहरण आणि उत्तम
छान बोलके उदाहरण आणि उत्तम लेख म्हणून कोहली सोबतच ऋन्मेष ह्यांचेही अभिनंदन.
जास्तीत जास्त तरुणाई कड़े ह्याचा संदेश जाणे हीच आजच्या घडीची नितांत गरज आहे.
प्रतिसादांत अनेक माहितिपुर्वक शास्त्रीय लिंक येतील तर त्याना लेखात समाविष्ट जरुर करा.
"जर मी पेप्सी पित नसेल तर
"जर मी पेप्सी पित नसेल तर ईतरांना प्यायला का सांगू?" - विराट कोहली.>>
+++१
मुळात जेव्हा जाहिराती मध्ये मोठ्या कलाकाराला बघितलं जातं तेव्हा आपसूकच ते उत्पादन विकत घेण्याचा लोकांचा(विशेषतः लहान मुले हट्ट धरतात) कल असतो.
आजकल बरेच मोठे हस्ती अशा जाहिराती करण्यासाठी नकार देतात तेव्हा बरं वाटतं.
अवांतर- विराट फिल्डवर चिडतो तेव्हा मुद्दाम पप्पा माझ्याकडे एक वेगळाच लूक देऊन चिडवून दाखवतात.
एक fan म्हणून आता ही बातमी पप्पांना दाखवयाला हवी ..
मग मजा येईल
http://www.thefitindian.com
http://www.thefitindian.com/soft-drinks-impact-on-health/
विराट चे अबीनंदन... कोक किंवा
विराट चे अबीनंदन... कोक किंवा पेप्सी पेक्षा बिअर जास्त हेलथी आहे.. सो से नो टू सॉफ्ट ड्रिंक्स अँड ड्रिंक बियर !
शीतपेयांच्या घातकतेला हायलाईट
शीतपेयांच्या घातकतेला हायलाईट करायचे होते
>>> शाहरुख खान ने एकदा मुलाखतीत म्हटले होते की तो रोज पेप्सी पितो, गेल्या दहा वर्षापासून तो पाण्याऐवजी पेप्सीच पितो.... (२००४ च्या सुमारास)
नानाकळा, तुम्हाला त्याने
नानाकळा, तुम्हाला त्याने फसवले असण्याची शक्यता आहे. पाण्याऐवजी पेप्सी कोणी पिऊ शकते का यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल का? कारण मागे मी कुठेतरी वाचलेले की अशी फसफसणारे पेयं तहान भागवू शकत नाहीत, किंबहुना हे शरीराची पाण्याची गरज आणखी वाढवतात.
च्रप्स, बीअर असो वा कुठलीही
च्रप्स, बीअर असो वा कुठलीही दारू, त्यांचे काही फायदे असू शकतात. पण दुष्परीणाम ही आहेतच. अति सेवनाचे अति दुष्परीणाम आहेत. आणि ते सर्वमान्य आहेत.
सॉफ्ट ड्रिंकबाबत तेच बरेच लोकांना माहीत नाहीत. किंवा सिरीअसली घेतले जात नाहीत.
उदाहरणार्थ अति मद्य प्राशन करणार्याला बेवडा, दारुड्या म्हणून हिणवले जाते. पण अति पेप्सी पिणार्याला कूल म्हटले जात असेल तरी नवल वाटणार नाही.
पुढे आपल्या आयुष्याशी बीअर पिऊन खेळायचे आहे की पेप्सी पिऊन हे ज्याचे त्याने ठरवावे, पण निदान दुष्परीणाम तरी सर्वांना ठाऊक हवेतच.
* जर माझे चुकत नसेल तर दारूच्या जाहीराती दाखवण्यावर बंदी आहे ना?
सिगारेटच्या जाहीरातीही बहुधा दिसत नाहीत.
तसेच सिगारेट पाकिटावर वैधानिक ईशारा असतो.
हे सर्व ज्या दिवशी अश्या घातक सॉफ्ट(!) ड्रिंक बाबत होईल तो सुदिन
नानाकळा, तुम्हाला त्याने
नानाकळा, तुम्हाला त्याने फसवले असण्याची शक्यता आहे.
>>>ह्म्म्म्म. ह्यात मी कुठून आलो दादा? असे प्रोवोकेटीव आणि वैयक्तिक हिणवणारे प्रतिसाद द्यायची गरज काय?
तुम्हाला # तुम्हा लोकांना
तुम्हाला # तुम्हा लोकांना
अश्या अर्थाने
गैरसमजाबद्दल क्षमस्व !
http://www.msn.com/en-in
http://www.msn.com/en-in/health/nutrition/40-ways-soda-is-killing-you/ss... । हे बघा. मी वेळ होईल तसे मराठी करण करून लिहेन. म्हणजे अनुवाद. सोडा ड्रिंक्स म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण. ते पेप्सी विधान मी पण स्तार डस्ट हार्ड कॉपी मध्ये वाचलेले आहे. तेव्हा सुद्धा एक कलाकार वगैरे पेक्षा एक मा णूस व बाप म्हणून त्यांनी खाण्याच्या सवई बदलल्या पाहिजेत असेच वाटले होते. फ्राइड का ग्रिल्ड चिकन पेप्सी व चेन स्मोकिन्ग असे ते विधान होते.
पण त्या लेव्हलचे कलाकार किंवा खेळाडू व्यक्तिमत्वे ह्यांचे स्पेशल हेल्थ व डाइ ट सल्ला गार असतात. त्यांच्या प्रोफेशन चे डिमांड वेगळे जीवनशैली अति ताणाची असते त्यामुळे आपण साध्या माणसांची त्याम्च्याशी तुलना करणे योग्य नाही. आपले आहार व आरोग्य मॅनेज करणे हे केले तरी पुरेसे आहे. मी तर घाबरून उसाचा रस पण दहा वर्शात प्यायलेला नाही. प्युअर शुगरच की ते. अंग मेहनत करणारे लोकच ते पचवू शकतात. आपण बैठा जॉब करतो. विराट सारखे फिटनेस रेजीम फॉलो केले तर कदाचित सहा महिन्यातून अर्धा ग्लास जमेल.
त्यात मुंबईत नाश्टा म्हणून वेळी अवेळी ऑफिसात खाल्ले जाणारे बर्थडे केक. समोसा, ढोकळा, बटाटे वडा बर्गर
पिझाअ हे पदार्थ व बरोबर फिझी ड्रिंक्स हे काँबिनेशन तब्येतीला घातक आहे.
हा एक वेगळा धाग्याचा विषय
हा एक वेगळा धाग्याचा विषय होईल, पण भारतीय आहारात प्रोटेन कमी आणि कार्ब्स वर जास्त भर दिलेला असतो.
छान! लेखाचा आशय आवडला. मीही
छान! लेखाचा आशय आवडला. मीही असे कुठले पेय पित नसल्याने जास्त रिलेट झाला. कोहलीची फलंदाजी आवडते, कोहली नाही पण या निर्णयासाठी त्याचे अभिनंदन आणि धन्यवाद! >>>>+१११११
अमा यांच्या पोस्टशीही सहमत. ...
विराट कोहलीचे अभिनंदन....
विराट कोहलीचे अभिनंदन....
पैसे देउन मी फक्त नारळाचे पाणी पितो. पण कंपनी मध्ये ट्रेनिंग / मिटिंग च्या वेळी ज्युस , पाणी एवजी सोडा घेतला जायचा. मग एकदा तुनळी वर एका सोडा कॅन मध्ये किती साखर असते ते प्रत्यक्ष बघितले. त्यानंतर फसफसणारे पेय घ्यायचे बंद केले.
विराट प्यायला की नाही प्यायला
विराट प्यायला की नाही प्यायला मला काही फरक नाही पडत.
मला आवडते मी तर थम्पसप पिणारच.
पाकिस्तानशी हरल्यामुळे
पाकिस्तानशी हरल्यामुळे दाढीवाले बाबा डोक्यात गेलेत. पण तरीही त्यांनी असला चांगला निर्णय घेतला असेल तर त्यांचे व धागा काढल्याबद्दल ऋन्मेषचे अभिनंदन!
मला आवडते मी तर थम्पसप पिणारच
मला आवडते मी तर थम्पसप पिणारच.
Submitted by प्राण on 17 September, 2017 - 12:01
>>>>>>>
प्रश्न आवडीनिवडीचा नाही तर आरोग्याचा आहे. सिगारेट ओढणारेही सिगारेटचे सारे धोके मान्य करून आपल्या आवडीखातर सिगारेट ओढतातच की.
ज्या सॉफ्ट ड्रिंक पिणार्यांना यातील धोके माहीत आहेत तरीही पितात अश्यांची सवय बदलणे तुलनेत कठीण आहे.
पण ज्यांना कल्पना नाही आणि यातील धोके लक्षात न घेता पितात त्यांना ते समजल्यास ते या नवीन माहितीच्या आधारे पुढे प्यायचे की सोडायचे हा निर्णय घेऊ शकतात.
कोहलीच्या हेतूबद्दल माहीती नाही, धाग्याचा हेतू एवढाच आहे
मग एकदा तुनळी वर एका सोडा कॅन
मग एकदा तुनळी वर एका सोडा कॅन मध्ये किती साखर असते ते प्रत्यक्ष बघितले.
>>>>
प्लेन सोड्यामध्येही साखर असते का?
रूनमेश- भारताबाहेर ( मोस्टली
रूनमेश- भारताबाहेर ( मोस्टली अमेरिकेत ) फसफसणार्या पेयाना सोडा म्हणतात.. जेनेरिक शब्द आहे तो सगळ्या सॉफ्ट ड्रिंक्स साठी
त्या ऐवजी कोकोनट वॉटर पीत जा.
त्या ऐवजी कोकोनट वॉटर पीत जा. थोडे पिऊन समाधान होते. आणखी आणखी प्यावेसे वाटत नाही.
मधून मधून थंडगार पाणीहि चांगले.
एकूण चौदा वर्षे दर महिना तीन लिटर स्कॉच व नंतर दोन वर्षे कोक पेप्सि केल्यावर गेले एक वर्ष आठवड्यातून एक लिटर कोकोनट वॉटर पितो.
डिप्रेशन गेले, अँक्झायटी गेली. मनःशांति वाढली. विसराळूपणा कमी झाला. हसायचे विसरलो होतो ते परत शिकलो. फार फार बरे वाटते.
चौदा वर्षे दर महिना तीन लिटर
चौदा वर्षे दर महिना तीन लिटर स्कॉच
>>> __/\__
अभिनंदन - कोकोनट वॉटर वर आल्याबद्धल !
Submitted by रश्मी.. on 17
Submitted by रश्मी.. on 17 September, 2017 - 16:22 >>> +111
शाहरूख खान या शितपेयांची
शाहरूख खान या शितपेयांची जाहिरात करायचा ना?
मुळात सर्वात प्रथम सायना नेहवालने शितपेयांची जाहिरात करण्यासाठी नकार दिला होता. मला तेव्हा तिचे जे कौतुक करावे तितके कमीच असे वाटले होते तिच भावना विराट बद्दल आहे.
यापुर्वी ही अमिताभ(ऑपरेशन
यापुर्वी ही अमिताभ(ऑपरेशन नंतर) , अक्षय कुमार वगैरे नी अश्या प्रकारच्या जाहिरीती करण्यास नकार दिला आहे.
विराट चे अभिनंदन.
शाहरूख फेमस असल्याने पटकन
शाहरूख फेमस असल्याने पटकन आठवतो, अन्यथा हृतिक सलमान आमीर रणबीर अमिताभ बच्चन...
सचिन द्रविड गांगुली वगैरे..
सारेच या पेयांची जाहीरात करायचे वा करतात..
जर सरकार याचा विरोध करत नसेल वा साधा वैधानिक ईशाराही देत नसेल तर एखाद्या सेलिब्रेटीने याची जाहिरात करू नये असा ह्ट्ट धरू शकत नाही. वा केल्यास त्यांना दोष देऊ शकत नाही.
पण जे नाकारतात त्यांचे कौतुक नक्कीच करू शकतो.
हे बघा संस्कार् मूर्ती संत
हे बघा संस्कार् मूर्ती संत कोहली ( मुंबईत आल्यावर भगिनी अनुष्का यांच्या आश्रमात राहणारे) कोठल्या पवित्र "तीर्थाची" जाहिरात करीत आहेत ?
https://youtu.be/xnR2bi_zczY
रॉयल चालेन्ज स्पोर्ट्स ड्रिंक - कोठे मिळते हे तीर्थ ? आम्हाल तर रॉयल चालेन्जर व्हिस्की माहित आहे .
तसेही कोठेही या स्पोर्ट्स ड्रिंक चा उल्लेख अन्ही फक्त जाहिराती आहेत .
अशा प्रकारे इतर वस्तूंच्या नावाने मद्य व इतर गोशिंच्या जाहिराती करण्याला सरोगेट जाहिराती म्हन्टतात.
माझा मद्याला विरोध नाही आहे .. पण मला ऋन्मेऽऽष चे अर्धवट माहिती असताना काढलेले धागे बघता हसावे कि रडावे काळात नाही
असो त्याला इंग्रजी हि येत नाही आणि बहुदा गुगल ची काही माहिती नसावी ..
आता त्याचे काहीतरी स्पष्टीकरण येईल .... होऊ द्या शंभरी !
Pages