मला काही सांगायचे आहे,.....

Submitted by वैशाली अ वर्तक on 15 September, 2017 - 23:39

पण सांगायचे राहून गेले!
निर्मला बोलकी. अगदी अवखळ
वहात्या झ-या सारखी बोलायची वा बोलणारी. एकदा बोलू लागली की तिला काय सांगू किती बोलू असे व्हायचे. अशी बोलक्या स्वभावाची .तिच्या समोर
च्या व्यक्तीला कायम श्रोताच व्हावे लागते ..सहज एकदा , एकदा कसले अनेकदा होते असेल तिचे .
मैत्रीणीला birthday wish करायला फोन केला. फोन उचलला .आssssणि झाले! ."काय ग काय म्हणतेस,बरेच दिवसात फोन नाही.नुसती म्हणतेस तुझी आठवण येते.पण फोन कधी करत नाहीस .का घरी पण येत नाहीस .कोठे भेटूया म्हटले तर नाही उत्तर ठरले असते. "
असे म्हणत तिने जे भाष्य (बोलणे) सुरू केले की तिच्या सर्व मैत्रिणी व त्यांच्या व तिच्या सासू नातवंडांच्या even शेजारी पाजा-यांच्या बद्दल गप्पा झाल्या पण फोन ज्या कारणाने केला होता तो विषय सोडून बाकीच गप्पा . आणि मग गप्पा करून फोन ठेवल्या वर थोड्या वेळा नंतर लक्षात आले की ,"अग बाई ,मी तिला फोन birthday wish साठी केला होता,आणि ते तर मला सांगावयाचे राहूनच गेले! मग काय पुन्हा पुन्हा फोन लावला, पण मग मात्र
तिचा फोन सतत बीझी येत होता. कारण तिच्या सारखे तिच्या मैत्रिणीचे बरेच well wisher होतेच ना.
कित्येकदा असे होते, सांगायचे असते ते राहूनच जाते. हो! आठवते का?अर्थात सर्व मालिकेत तिच त-हा असते .तसेच त्या "कुंकू " मालिके मधील जानकी ला खूप काही सांगावयाचे असायचे, पण सुरुवात करे पर्यंत वेळ जायचा. तिच्या आईची तब्बेत ठीक नाही .तिला खूप पैशाची गरज आहे. हे ती नव-यास कधीच सांगू शकली नाही. आणि हो पण त्या मुळेच सीरियल लांबते ना! वा आपणास मनोरंजन मिळते !ना. तेव्हा सांगायचे असे की अशा त-हेच्या व्यक्ती आजूबाजुला असतात कीं मुळ मुद्यावर येता येत नाहीत . मग मनात हुरहुर करत बसतात. आरे सांगावयाचे राहिले म्हणून.
तशीच एक वेडी प्रेयसी. वेडी म्हणजे प्रेम वेडी बर का! प्रियकराला रोज भेटत होती .मला तू आवडतोस म्हणून सांगावयाचे रोज नक्की करायची .पण रोजच राहून जावयाचे. घरी येऊन मनात
म्हणायची ,"शी बाई !आज पण नाही
जमले .सांगायचे राहून च गेले." शेवटी प्रियकरगावीं जात होता. स्टेशनवर सोडायला गेली. तेव्हा तरी पटकन बोलावे ना.? पण छे .शेवटी गाडीची सुटण्याची वेळ झाली. सिग्नल मिळाला. गाडी हलणार शेवटी हातवारे वरुन डम शो मधे करतात ना तसे करुन I love u
दर्शविले. ठीक झाले .प्रियकरास भावना तरी पोहचल्या. तो म्हणाला हो ss हो कळले. भा.पो.म्हणून ठीक झाले.पण, तेव्हा पण तोंडाने सांगावायाचे राहूनच गेले!
आपण मंदीरात जातो. तेथे असेच
होते. देवाजवळ काय काय मागावयचे
ते नक्की करतो. हो ! अहो देवच तर हक्काचा आहे ना. ज्याच्या जवळ सर्व मागण्या आपण मागू शकतो. व त्या पण कुणास पण ऐकू न येता मनातील ईच्छा प्रगट करु शकतो. पण भक्ती भावाने हात जोडून डोळे मिटून देवाजवळ मागावयास जावे तेवढ्यात "ए चला पुढे व्हा. गर्दी करू नका." म्हणून पूजारी ओरडतो. गर्जना करतो. व देवा जवळ पण सांगावयाचे राहून जाते.
असो . माझ्या सारखे बाकीच्या सख्यांना पण सांगते तुम्हास पण काही लिहावयाचे,बोलायचे ,सांगायचे असेल ते सांगून टाका , लिहून टाका नाही तर हूर हूर राहिल की ,"मला पण सांगायचे होते पण राहून गेले.....

Group content visibility: 
Use group defaults

मालिका जास्त पाहू नये हा अनाहूत सल्ला.
स्पष्टपणे मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता असे सांगावे. बाकीच्या गोष्टी नंतर.

तुम्हास पण काही लिहावयाचे,बोलायचे ,सांगायचे असेल ते सांगून टाका , लिहून टाका
>>>>>
+७८६

आवडला लेख Happy