Healthy बाप्पा!!!

Submitted by मण - मानसी on 8 September, 2017 - 07:21

असे काही लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे.काही चुकले असल्यास कृपया सांभाळून घ्यावे.
धन्यवाद!!!

आज सकाळी मॉर्निंग वॉक गेले होते.माझा मॉर्निंग वॉक म्हणजे माझ्या घराच्या मागेच असलेल्या नदीवर फिरून येणे सकाळची मस्त थंड हवा, नुकताच उजाडत असलेल्या सूर्यचा पडणारा तो केशरी प्रकाश आणि पक्षांची ती किलबिल हे सगळं मला फक्त पुलावर अनुभवायला मिळत.....
तर, नेहमी प्रमाणे मी वॉक साठी गेले.....तशी मी आज थोडी उशीराच गेले होते गणपती विसर्जनाने दमले होते ना....
पूलावरून फेर फटका मारून मी परत निघणार एवड्यात मी कोणाचा तरी आवाज ऐकला आवाज ओळखीचा नव्हता आणि मला आजूबाजूला कोणी दिसले पण नाही आवाजाचा एकदा कानोसा घेतला पण परत काही आवाज आलाच नाही.मी माझ्या वाटेने चालू लागले तर परत काही आवाज आले आता एक नाही चांगले चार पाच आले जणू कोणी तरी हसतेय, बोलतेय असे जाणवले.
त्या आवाजाच्या दिशेने चालू लागले तर ते आवाज तर गणपती विसर्जणाच्या कुंडातून येत होते आत डोकावून पहिले तर अहो आपलेच सगळ्यांचे गणपती,आपले बाप्पाच होते तिथे. सगळ्या बाप्पांची मीटिंग चालली होती बहुतेक.लाल,पिवळा,केशरी असे वेगवेगळे कध (पीतांबर) नेसलेले कोणी फुलात बसले होते तर कोणी पाटावर पण सगळ्यांच्या हातात मोदक मात्र होते.सगळे गप्पा मारत होते आपआपल्या घरच्या कहाण्या सांगत होते कोणी काय करत होत कोण कस होत कोणाची मुलगी कशी गोड होती तर कोणाची बायको कशी छान होती कोणी मोदक कसे खूप गोड केले तर कोणाचे मोदक कसे तुटलेच नाहीत.मला हे सगळं ऐकताना फार गम्मत वाटत होती.पण मला एक कळत नव्हतं हे सगळे बाप्पा एकदमच बोलत होते.कोणी कोणाचं ऐकतच नव्हतं फक्त बोलत होते आणि ते पण डोळे बंद करून.
असाच बराच वेळ गेला मला कळेचना काल माझे बाप्पा छान वाटत होते आणि आज असे सगळे गोंधळ का घालत आहेत.मग एका सिंहासनावर बसलेल्या गणपती हाताने काहीतरी गोल फिरल अहो दुसर काही नाही आपल्या पाण्याचा कोक होता तो तस सगळं पानी त्या कुंडातून बाहेर पडलं.आता सगळ्या गणपतींनी आपले डोळे पुसले आणि उघडले,बघते तर काय, एक सलग सगळ्यांचे डोळे लाल झालेले मी तर घाबरलेच असे का झाले असावेत यांचे डोळे? मी मोठी कोड्यात पडले. पण आता सगळे गनोबा शांत झाले होते कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं कारण नुकतच त्यांना कळलं होत की आपण कितीही बोललो तरी समोर कोणाला काहीच ऐकू जात नाहीए.कुंडामध्ये एकदम शांतता पसरली होती कोणीच कोणाशी काही बोलत नव्हते.थोड्याच वेळात तिथे विष्णु सारखे दिसणारे कोणीतरी प्रकट झाले हो प्रकटच झाले कारण ते मागे पुढे कुठून त्या कुंडा मध्ये गेले असते तर मला कळलं असत न.आणि ते सगळ्या गणपतींच्या कानाला हात लाऊन काहीतरी बोलू लागले. तसाच त्यांनी डोळ्याला हात लाऊन पण काहीतरी बोलले.आता आपले बाप्पा मला परत ताजे तवाने दिसले जसे मी घरी आणताना होते अगदी तसे.
आता सगळे बाप्पा मिळून त्या विष्णु सारख्या देवाची आभार मानू लागले तेव्हा समजले ते तर आपले तर मेडिकल सायन्स चे गुरु धन्वंतरी आहेत.तेव्हा धन्वंतरी देवाला बोलले "देवा माझे कसले आभार खरे दुख:हरता तर तुम्ही या मानव जातीचे दुख हरण्यासाठी ब्रह्म लोकातून या परलोकात येता आणि जाताना हे लोक काय देतात तुम्हाला? हे असे गुलाल,रंग यामुळे सुजलेले डोळे आणि त्या मोठ्या मोठ्या DJ च्या भिंतीमुळे हे बहिरे पण?" " देवा मी मागचे वर्षी पण बोललो आहे नका जाऊ तुम्ही पृथ्वीवर खूप त्रास्स होतो तुम्हाला या मोठ्या मोठ्या आवाजाचा आणि त्या रंगांचा."
या बोलण्यामुळे मी थोडी घाबरलेच खरच बाप्पा आले नाहीत पुढच्या वर्षी तर? पण लगेच बाप्पा काहीतरी बोलू लागले तसे मी त्या कुंडाकडे माझे कान टवकरले.
माझे बाप्पा बोलले "तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे धन्वंतरी पण मी माझ्या त्या भक्तांसाठी जातो जे मनोभावे माझी पूजा करतात.अहो माझ्या भक्तन्ना कस माहीत असणार DJ मला त्रास्स देतो ते तर भक्ति भावाने लावतात.त्यांना खुश झालेल बघितले की मी माझा त्रास्स विसरून जातो"
"एक विनंती आहे गणेश" धांवन्तरी
"बोला "
"गंगा मातेला होणारा त्रास्स दिसला तुम्हाला म्हणून मानवा जातीला तुम्ही शाडूची प्रतिकृती बनवण्याची सुबुद्धी दिलीत.आता माझी विनंती समजून घेऊन या वर्षी ह्या DJ आणि रंगांचा वापर करू नका ही बुद्धी द्यावीत. गणराया माझी ही इछा पूर्ण करावीत."

माझी अंगावरची चादर कोणीतरी काढून घेत बोलत होत,"मिष्का उठ ना मोदकाच सारण बनव आज बाप्पा त्यांच्या घरी जाणार, मिष्का उठ खूप नाचायच आज आणि पांढरेच कपडे घाल गुलाल,रंग छान वाटतो त्यावर" म्हणत अनिष्का ताई मला उठउन गेली.

मी मात्र बिछान्यातच विचार करत राहिले खरच माझ्या बाप्पा चे डोळे सुजले तर आणि कान बहिरे झाले तर?
मग मात्र मी सगळ्यांना सांगून फक्त टाळ,विना,फूल आणि आमच्या तोंडून "गणपति बाप्पा मोरया" हा नाद एव्हड्यानेच माझ्या बाप्पा ना निरोप दिला.

दुसर्या दिवशी मॉर्निंग वॉक च्यावेळी मी मुद्दाम कुंडात डोकावून पहिले नकळत मला गणपती बाप्पा खुश दिसले.

गणपती बाप्पा मोरया!
मंगल मूर्ती मोरया!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी लिहिलयं.. Happy
वर लिहिलेल्या गोष्टींचा खरच विचार केला पाहिजे...............

छान

मस्त लिहिलय. Happy
मला आमच्या गणपतीच विसर्जन आठवलं. आमच्या गावात पुर्ण आळीचे गणपती एकत्र विसर्जनाला निघतात. पण कसलाही गोंधळ होत नाही. मस्त टाळ आणि अभंगाच्या तालावर रांगेत सर्व गणपती विसर्जनाला जातात. गुलाल पण अजिबात नसतो. पण खूप मजा येते.

छान कल्पना आहे.

बाप्पा अगदी समोर दिसले ... तरी यावर्षी मुंबईत DJ च प्रमाण कमीच होत... बहुतेक "बंदी" मुळे असेल.

https://www.youtube.com/watch?v=CJmKc5bNriQ हे आठवलं .. फार वर्षांपूर्वी पाहिलेलं.

धन्यवाद !
कऊ,भाग्यश्री१२३,दिपक०५,अक्षय,अनिष्का,मयूरी.

@ अंकि,

माझ्या गावाकडे पण असाच केल जात गणपती विसर्जन आणि गावातले सगळे लोक गणपती घरीच शेतातल्या मातीचा बनवतात.
खूप मज्जा येते.

माझी आजी नेहमी आम्हाला ग्रंथ,पुस्तक गणपतीच्या दिवसात वाचायला लावायची, ती अस म्हणायची की 10 दिवस बाप्पा बुद्धीचा दरबार मांडतात तो जास्त घेईल तो जास्त हुशार होईल.