धोका देवू लागले

Submitted by शिवाजी उमाजी on 7 September, 2017 - 07:44

धोका देवू लागले

दिवस न् रात्र दोन्ही सारखेच होवू लागले
अपघाताने अन् गोळीने जीव जावू लागले

शोधण्यास मारेकरी यंत्रणा चौफेर लागली
अपराधी यंत्रणेच्या मागे मागे धावू लागले

कोणा म्हणावे परके कोणा आपले म्हणावे
काय करील कर्म कुंपणच शेत खावू लागले

शिक्षणाचा जरी प्रसार होवो येथे कितीही
बाजार अंधश्रद्धेचे हाऊसफुल होवू लागले

घालून केशरी कफन्या वाढवून लांब दाढ्या
भोगून सुखे सारी धर्माला धोका देवू लागले

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29471/new/#new

Group content visibility: 
Use group defaults