ऑल इस वेल बाप्पा~~~~

Submitted by Swapnaa on 4 September, 2017 - 11:16

ऑल इस वेल बाप्पा~~~~
बस थोडीशी माणुसकी, आपलेपणा, वेळ, दक्षता कमी पडतोय....

शहरांतल्या सगळ्यांसाठी :
"काँक्रिटच्या जंगलात
कमी झाली निसर्गाची छाया,
२,३ बीएचके च्या भिंतींत
आटली नात्यांची माया" ,

खेडे गांवातल्या सगळ्यांसाठी :
"घरांत हवं AC,
दारापुढें चार चाकी
स्वछता गृहाशी,
त्यांना घेणं देणं च नाही" ,

सध्याच्या युवांसाठी :
"सगळ्यांच्या नजरेत
आम्ही दोघं राजाराणी,
मात्र आमच्या खोलीत
रमतो स्वतःच्या च भ्रमणध्वनीत" ,

बालवर्गासाठी :
"पटांगणावरचे नको खेळ
चायनीज वस्तूंचे वेड,
सणावारांना खायला भेळ
कसलाच नाही ताळमेळ" ,

तरीही बाप्पा तू आलास की, सगळे एकदम
सेंड करता, समस, मेल,,
अन, बाप्पा तू निघालास की, सगळे विभक्त
इंमेडिएट हरवतात, सहज इन्व्हिसीबल....

पण बाप्पा ऑल इस वेल ~~~~
कवी - स्वप्ना

Group content visibility: 
Public - accessible to all site users