भारतातील फ्लॅट चा पार्किंग लॉट भाड्याने देण्याबद्द्ल माहिती हवी आहे.

Submitted by sneha1 on 4 September, 2017 - 01:09

नमस्कार !
मला थोडी माहिती हवी आहे. आमचा पुण्यामधे बावधनला फ्लॅट आहे, सध्या तिथे कोणी राहत नाही. तिथे राहणार्‍या शेजार्‍यांनी आमचा पार्किंग लॉट भाड्याने मागितला आहे. असे करणे योग्य आहे का? असल्यास किती भाडे मागावे? ह्यामधून पुढे काही अडचणी येऊ शकतात का?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहेरच्या व्यक्तिला देता येत नाही पण सोसायटीतल्या व्यक्तिला देऊ शकता. महिना अडीच ते तीन हजार भाडे मिळेल. समंजस व्यक्तिंसोबत व्यवहार असल्यास अडचणी येण्याची शक्यता दिसत नाही.

माणूस चांगलं असेल तर नक्कि द्या.
एवीतेवी पार्किंग रिकामं दिसलं तर लोक बेकायदेशीर पणे दडपून गाडी लावायला चालू करतातच.
कोणी सरळ माणूस शिस्तीत विचारुन रेंट देऊन करत असल्यास चांगले.

सोसायटीला मध्ये घ्या. म्हनजे सोसायटीची परवानगी काढा. तशीही ती काढावी लागतेच म्हणा. पुढे वाद उद्भवल्यास रेकॉर्ड राहते.करार रगिस्टर करा लीव्ह अँड लायसेन्सचा. हल्ली ऑनलाईनही करता येतो

सोसायटीला मध्ये घ्या. म्हनजे सोसायटीची परवानगी काढा. तशीही ती काढावी लागतेच म्हणा. पुढे वाद उद्भवल्यास रेकॉर्ड राहते.>>>>>>> +१

काय लोक असतात! चार पैसे जमवायला पार्कींग लॉट भाड्याने???>>>
त्यात वाईट काय? Uhoh

सिंजी त्यांच्या जागी तुम्ही स्वतःल ठेवा आणि विचार करा असा करून सिगारेटचा खर्च सुटत असेल तर का नको द्यायला भाड्याने?

पैसे जमवण्यासाठी असं नव्हे पण आपण कष्टाने मिळवलेली वस्तू इतरांना अशीच द्यायची? Uhoh
अशीच (भाडं वगैरे न घेता) जरूर द्यावी पण त्या व्यक्तिशी तुमची तितकी जवळिक आणि विश्वास असेल तरंच.
अन्यथा जागा मालकाने ही पार्किंग चे बकायदा पैसे दिलेले असतात बिल्डरला.. मग ते असे परत मिळवले तर काय गैर?
तसं तर मग घराचं ही भाडं घ्यायला नको.. ते पण एक प्रकारे पैसे जमवणंच झालं नाही का? फरक इतकाच की फ्लॅट मध्ये माणसं राहतात आणि पार्किंग मध्ये गाडी.

माझा आक्षेप चारपैशासाठी स्वतःला जगाच्या नजरेत मख्खीचूस म्हणून घेण्यावर आहे.

माझा आक्षेप चारपैशासाठी स्वतःला जगाच्या नजरेत मख्खीचूस म्हणून घेण्यावर आहे.

जागा रिकामी पडून आहे तरी शेजारच्यांना वापरु देत नाहीत्/अगदी भाड्याने सुद्धा देत नाही असे म्हणणारे सुद्धा लोक असतात...
मख्खीचूस म्हणणारे तर गरजेला चार पैसे काय एक पैसा सुद्धा द्यायला येणार नाहीत.
लोक काय म्हणतील याचा विचार करुन काहीही होणार नाही.

माझा आक्षेप चारपैशासाठी स्वतःला जगाच्या नजरेत मख्खीचूस म्हणून घेण्यावर आहे.
>>तुमचे धागे, प्रतिक्रिया कधी पटले नव्हते पण आता राहवल नाही म्हणून बोलतेय..
स्नेहा यांनी स्वतः ला मख्खीचूस सिद्ध करवून घ्यायला धागा काढला नाही.
माबोकर हे नेहमी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत योग्य सल्ला देतात.
जर त्याना फ्लॅट चा पार्किंग लॉट भाड्याने देण्याबद्द्ल माहिती हवी आहे तर जाणकार माहिती देतीलच.
तुम्ही काढलेले धागे आम्ही सहन केले आहेत , काहींनी सिरीयस होऊन प्रतिक्रिया सुध्दा दिल्या.
.या धाग्यात तर वावग अस काही नाहीयं.

सोसायटीत आजूबाजूला किती जागा उपलब्ध आहे जास्तीच्या पार्किंगसाठी ? त्यावर अवलंबून आहे पार्किंगचे किती भाडे मिळेल.
मी बालेवाडीत राहते. आमच्या सोसायटीत आम्ही महिना पाचशे देतोय भाड्याचे. हे लॉट्स सोसायटीनेच भाड्यावर दिले आहेत. वर्षाचे एकदम भरतो.
माझे सासूसासरे ठाण्यात राहतात. त्यांच्या सोसायटीत महिना तीन हजार भाडे येते पार्किंग लॉटचे.

वर कुणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे सोसायटी कमिटीची लेखी परवानगी घेऊन मगच पुढे जा.

@ sneha1....... रेरा अ‍ॅक्ट येण्याआगोदर बिल्डर्स ना पार्कींग विकण्याची कायदेशीर परवानगी नव्हती. जर तुमचा फ्लॅट रेरा अ‍ॅक्ट येण्यापुर्वी घेतला असेल तर सर्व पार्कींग सोसायटीच्या मालकीची असेल. त्याच प्रमाणे पार्कींग चे भाडे वसुल करण्याचा हक्क देखिल सोसायटीचा असेल

असाईन मेन्ट डीड मध्ये पार्किन्ग तुम्हाला दिले असेल तर सोसायटीचा काय संबंध भाडे घेण्याचा? हो परवानगी मात्र लागेल. कन्सेप्ट असा आहे की फ्लॅट असलेली बिल्डिंग सोसायटीच्या मालकीची असते. तुमचा फ्लॅट चे शेअर्स तुमच्या नावावर ट्रान्स्फर होतात. तुम्ही फ्लॅट ' विकता ' म्हणजे शेअर्स ट्रान्स्फर करता. त्याला खरेदीखत न म्हणता असाईन मेन्ट डीड म्हणतात. त्यात फक्त ऑक्ञुपन्सी ट्रान्स्फर होते मालकी नाही. मालकी सोसायटीची असते त्यामुळे फ्ल्टवर कोणतीही प्रक्रिया करताना सोसायटीची परवानगी आवश्यक असते. अगदी गच्चीला ग्रिल ठोकायलाही

@ sneha1....... रेरा अ‍ॅक्ट येण्याआगोदर बिल्डर्स ना पार्कींग विकण्याची कायदेशीर परवानगी नव्हती. जर तुमचा फ्लॅट रेरा अ‍ॅक्ट येण्यापुर्वी घेतला असेल तर सर्व पार्कींग सोसायटीच्या मालकीची असेल. त्याच प्रमाणे पार्कींग चे भाडे वसुल करण्याचा हक्क देखिल सोसायटीचा असेल>>>>
open parking असेल तर. जर पर्किग शेड असेल किंवा गराज असेल तर मात्र विकता येत होते.
पण तसेही घराच्या बाबतीत भारतात बरेच नियम पाळले जात नाहीत. सोसायटी पण बरेच नियम पाळत नाहीत. त्यामुळे सोसायटीच्या परवानगीने भाड्याने देण्यास हरकत नाही

माझा आक्षेप चारपैशासाठी स्वतःला जगाच्या नजरेत मख्खीचूस म्हणून घेण्यावर आहे.>> त्यात मख्खीचूस काय ? कठीण आहे. समोरच्या व्यक्तीला गरज आहे . तो त्याच भाडं हि द्यायला तयार आहे. मग द्यायला काय हरकत आहे ?. अशीच फुकट मागत नाहीये ना ? मला वापरायला द्या . किव्वा मी वापरू का ? म्हणून विचारून . कुठलीही गोष्ट कुणाला फुकट देऊ नये त्याची किंमत राहत नाही लोकांना. भले तुम्हाला त्या पैशाची गरज नसेल किव्वा त्या पैशावाचून तुमच अडत नसेल तरीही. साधं भिकाऱ्याला पैसे देतानाही आपण म्हणतोच ना भीक घालू नका. मग त्याची सवय होते. काही काम करून पैसे कमवण्याची वृत्तीच लोप पावते. तसच आहे हे . कुठलीही गोष्ट फुकट देऊ नये. स्वतःची हक्काची जागा आहे ती .

>>त्यात मख्खीचूस काय ? कठीण आहे.
हो ना. आणि पार्किंग वापरायला देणं म्हणजे काही विरजणाला ताक देण्यासारखं आहे की काय!

भारतात जी जागा 'दुसरा वापरत नाही ती आपलीच' अशी कन्सेप्ट आहे.
बिल्डिन्ग ला हल्लि प्रशस्त मोठे कॉरिडॉर आणि चार फ्लॅट असतात.पब्लिक आपल्या फ्लॅट कडे येणारी सोसायटी ची जागा असलेला कॉरिडॉर सेफ्टी डोअर लावून बंद करुन स्वत: शू शेल्फ ठेवायला किंवा सोफा ठेवायला वापरतात.(त्यांनी एरवी शू शेल्फ किंवा सोफे ठेवावे,ते हलवता येतात. पण एकदा दार टाकले की तुम्हि ती जागा सर्व बाह्य जगाला नो एन्ट्री करता.)
बिल्डर ने ती जागा कॉरिडॉर प्रशस्त दिसावा, इमर्जन्सी च्या वेळी निघताना गर्दी होऊ नये इ. विविध कराणाने दिलेला असतो.पण ती २ फुट बाय ३ फुट जागा बिनधास्त भिंती किंवा डोअर टाकून आपली बनवताना लोकांचा आटिट्युड 'त्यात काय मग? माझ्या घरासमोर ची जागा आहे.दुसरं कोणी वापरणार आहे का? मग मी वापरतो' असा असतो.
अश्या सेट अप मध्ये आप्ले रिकामे पडलेले पार्किंन्ग लोकांनी फुकट आपल्या बापाचे समजून परस्पर वापरत बसण्यापेक्षा रितसर भाडे आणि स्तॅम्प पेपर अग्रीमेंट करुन रेंट आलेले कंजूसपणाचे नाही.