अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - मामी

Submitted by मामी on 2 September, 2017 - 06:51

खुषखबर, खुषखबर, खुषखबर!

सर्व प्रथम आमच्या मायबाप ग्राहकांची माफी. आमच्या आधीच्या उत्पादनाबद्दल - बालकांसाठीच्या ' वर्धक दूध पावडर' बद्दल - तक्रारी आल्याने आम्ही त्या उत्पादनाची कसून तपासणी केली असता ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. 'वर्धक' मुळे बालकांची उंची न वाढता कपांची वाढत होती हे आम्ही मान्य करतो. आम्ही तेव्हाच ते प्रॉडक्ट बाजारातून परत घेतले.

पण, आता आम्ही पुन्हा एकदा नव्यानं तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, आमचे नवे उत्पादन - 'वर्धक-धक पावडर'. आणि या उत्पादनामागची प्रेरणा आहे आमचे एक ग्राहक श्री. स. दा. तत्पर.

"आमच्या 'वर्धक' पावडरीनं उंची वाढते तर लांबी का नाही वाढणार?" असा दृष्टीकोन ठेऊन तिचा यशस्वीरीत्या 'लोकल' उपयोग करून आमच्या उत्पादनाची वेगळीच महती आम्हालाच कळवणारे श्री. स. दा. तत्पर हे आता कंपनीच्या बोर्डावर आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली आता आम्ही आमचे नव्या स्वरूपातील उत्पादन ' वर्धक-धक पावडर' घेऊन येत आहोत.

वापरा ' वर्धक-धक' आणि बना आनंदी, समाधानी ग्राहक.

(सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users