STY 3

Submitted by संयोजक on 1 September, 2017 - 16:31

नैनिताल जवळच्या डोंगरांमधे जेथे कॅम्प व आजूबाजूला सहज गाणी म्हणत फिरण्यासारखी जागा आहे अशा एका ठिकाणी मिस लाजो आणि मिस लिली या दोघी एक कॅम्प चालवत असतात. कॅम्पचे सुपरवायझिंग, कॅम्प अॅडमिनिस्ट्रेटर मि. पंडित ("पंडितजी") वर लाइन मारणे, व इतर वेळेस सतत पोळ्या करणे यात त्या नेहमी गर्क असतात. तशा दोघी बहिणी पण दरवर्षी एकमेकींमधे आपापले गट सर्वात भारी करण्याची कॉम्पिटिशन असते. ती हेल्दी असते, त्या बनवत आणि सतत खात असलेल्या पदार्थांचा अपवाद वगळून. उन्हाळा नुकताच सुरू झालेला असतो. एक बॅच फुल स्विंग मधे असते व नवीन बॅच ची तयारी ऑफिस मधे सुरू असते. त्या दिवशी सगळा आचरटपणा नेहमीप्रमाणे सुरू असताना रजिस्ट्रेशन रूम मधे एकदम दोन तीन बाजूनी वारा सुटतो, मागे लता चे आSSSS ऐकू येते व पंजाबी म्युझिक वाजते. त्या रूमच्या दोन बाजूला असलेल्या दोन दारांमधून एकाच वेळेस दोन एकसारख्या दिसणार्‍या मुली दाखल होतात. रजिस्ट्रेशन च्या वेळेस दोघीही आपले नाव व आडनाव, वय आणि जन्मतारीख एकच सांगतात. पूजा मल्होत्रा. आई वडिलांचे नावही तेच. सिमरन आणि राज मल्होत्रा. पत्ता एकीचा भारतातला व एकीचा अमेरिकेतला, हे सोडले तर बाकी सगळे सेम. या सीन्स मधे भारतीय पूजा समोर आली की मागे सतार वगैरे वाजते, तर अमेरिकन पूजा आली की रॉक म्युझिक. दोघींना दाखल करायला आलेले नोकर आपलीच पूजा ही खरी पूजा हे एकमेकांना फालतू विनोद करत सांगतात. आणि दोघांचेही बरोबर असते.

कारण - पाच साल पहले....

पूजा-१ व पूजा-२ जेव्हा जन्मल्या तेव्हाच ऑलरेडी तिच्या आई वडिलांमधे वितुष्ट आलेले होते. राज वेगळा राहात होता. यांचा जन्म झाला तेव्हा जी दाई होती तिच्या भावाच्या बायकोला मूल हवे होते म्हणून यातले एक पळवायचा दाईचा इरादा होता. डिलीव्हरीच्या ऑपरेशन च्या वेळेस अंजली मल्होत्रा शुद्धीवर नव्हती. त्यामुळे तिच्या काही लक्षात नाही. आणि जुळे झाले आहे हे तिला सांगितलेच नाही. दाईचा भाउ दवाखान्यात तोतया नातेवाईक होउन आला व त्याने आणि दाईने मिळून डॉक्टरला आधी किडनॅप केले व २-३ दिवस बांधून ठेवले एका गोदामामधे. मग एक दोन दिवसांनी घरी गेल्यावर एका मुलीला पळवायचा प्लॅन होता. पण हे सगळे सुरू असताना भावाची बायको प्रेग्नंट आहे असे निष्पन्न झाले त्यामुळे भगवान की दयासे भावाचा इण्टरेस्ट संपला.

मग काही दिवस नक्की काय करायचे या पेचातून दाईने दोन्ही मुली आलटून पालटून आईकडे देत वाढवल्या. २-३ वर्षाच्या होईपर्यंत दाई वगळता कोणालाच पत्ता नव्हता की दोन आहेत. खेडेगावातील मोठे घर आणि पारंपारिक कर्मठ कुटुंब, त्यामुळे ही गोष्ट सहज लपून राहात होती. त्यात दोन्ही मुली दिसायला सेम टू सेम. मग एक दिवस राज पुन्हा अंजलीची मनधरणी करायला येउ लागला माफी मागत. त्यालाही पूजाचा लळा लागला. ते दोघे दर रविवारी अप्पू घर मधे जात. पण आईच्या जीवनात तेव्हा दुसरा एक पूर्वीचा केवळ अच्छा दोस्त आर्यन धवन आता "अच्छा दोस्त++" झाला आहे असा राजचा समज झाला. त्यामुळे राजला राग येउन त्याने मुलीला आपल्याकडे द्यायची मागणी केली. प्रकरण कोर्टात जाते की काय अशी शंका आल्यावर दाईने अंजलीला तू काळजी करू नको मी हे सोडवते अशी खात्री दिली. आणि परस्पर एक मुलगी बापाबरोबर पाठवून दिली. त्यामुळे एका पूजा अंजलीकडे व एक पूजा राजकडे, दोघांनाही "पूजा" आपल्याकडेच आहे असेच वाटत राहिले.

राज अंजलीवर रागावलेला असल्याने "माझा प्रेमावरचा विश्वास उडालाय" अर्थाचे एक गाणे एका पार्टीत गाउन लोकांची पार्टी स्पॉईल करून लगेच ते शहर व देस छोडके गेला अमेरिकेत पूजाला घेउन. तेथे एक दोन वर्षांत तो एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा व्हाइस प्रेसिडेण्ट झाला व रोज ऑफिस मधे आजूबाजूला असलेल्या ब्लॉण्ड्स बरोबर फ्लर्टिंग करत उरलेल्या वेळात काम करू लागला. पण नंतर एका समर मधे भारतात शेतात पिवळी फुले फुलू लागल्यावर देश आपल्याला बोलावतोय असे वाटल्याने व वेळीअवेळी सनई ऐकू येउ लागल्याने दोघे सुट्टीवर परत आले. तिला इथे वेळ कसा घालवायचा म्हणून नैनिताल च्या कॅम्प मधे घालायचे ठरले. इकडे अंजलीने तेवढ्यात स्वतःची कंपनी काढलेली होती व ती दररोज सहकार्यांबरोबर त्यात डावीकडून उजवीकडे वर जाणार्या ग्राफ्स वर लेझर पॉइण्टर मारून काहीतरी बोलायची. तिला अचानक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटींग आल्याने पूजा चे काय करायचे प्रश्न पडला, पण "स्कूल के सब फ्रेण्ड्स" तिकडेच जाणार असल्याने तिलाही त्याच कॅम्पमधे ठेवायचे ठरले.

बॅक टू टूडे:
आता ऑफिस मधे हे नक्की काय प्रकरण आहे यावर चर्चा सुरू झाली. ती करायला मिस लाजो, मिस लिली व पंडितजी. यातील मिस लाजो वरून फटकळ पण आतून चांगली, मिस लिली टोटल सज्जन आणि पंडितजी मनाने चांगले पण टोटल कार्टून.. यांचे असे ठरते की हे नुसते शोधायचेच नाही, तर अंजली व राजलाही परत एकत्र आणायचे. कारण अनेक वर्षांपूर्वी ते दोघे लहान असताना याच कॅम्पमधे यायचे. त्यांचे एक दरवर्षीचे गाणेही होते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंडळी ह्या STY शीर्षक नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तर तुम्हाला स्कोप आहे कि तुम्ही STY हवे तसे वास्तवाकडे झुकणारे करू शकता किंवा completely illogical बनवू शकता. आपण नेहमीच हिंदी फिल्म डायरेक्टर्स ना दोष देत असतो कि 'काय वाट्टेल ते दाखवतायेत' तर आम्ही तुम्हाला एक तद्दन फिल्मी सुरूवात करून दिलेली आहे, तुम्ही तुमची कल्पना शक्ती नि लेखन कौशल्य पणाला ह्याला वास्तवादी बनवू शकता. तुमच्या कलाप्रमाणे मग शेवटी STY ला शीर्षक द्या, होउ दे खर्च !!!

नियमावली:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
४) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई वडिलांचे नावही तेच. सिमरन आणि राज मल्होत्रा...
बाकी सगळी कडे..अंजली झालंय..

रोज ऑफिस मधे आजूबाजूला असलेल्या ब्लॉण्ड्स बरोबर फ्लर्टिंग करत उरलेल्या वेळात काम करू लागला Lol Lol Lol

छान आहे फिल्मी स्स्टोरी..

भारी आहे सुरुवात !!
आता कुणी वास्तववादी लिहिले नाही ना तर मी पुन्हा कुणाला तरी इच्छाधारी नागिन करीन हां Wink

त्या दाईला इच्छाधारी नागिन बनवायचं. म्हणजे नंतर तिने केलेला प्रकार ऐकून 'यही वो नागिन है जो हमारे हसते खेलते एकत्र रहनेवाले परिवार को डस गई' असा डायलॉग टाकता येईल.

लाजो, लिली आणि पंडितजी हे कोडे सोडवण्याचा विचार करू लागले. काहीतरी प्लॅन करणे आवश्यक होते. त्यामुळे रात्री १२ वाजता त्यांचे शेकोटीपाशी भेटायचे ठरले. पण इकडे अमेरिकेत आणि मुंबईत त्याच वेळी राज आणि अंजलीच्या मनात एकमेकांविषयी विचार आला, 'या सगळ्या परिस्थितीला दुसरी व्यक्ती जबाबदार असल्याने मैं उसे कभी माफ नही करुंगी/करुंगा'... अजूनही राज अंजलीचा राग निवळला नव्हता. त्यामुळे पूरी कायनात त्या दोन लहानग्या पूजांना अलग करायला एक झाली. आतापावेतो खरेतर त्यांनी एकमेकींना डेअरी मिल्क देऊन दोस्ती करून घेतली होती. पण इतक्या लौकर त्या मैत्रिणी झाल्या तर श्रेयनामावलीआधीच 'इंटर्मिशन'ची पाटी आल्यासारखे होईल. म्हणून अचानक पाऊस सुरू झाला, वादळ आले, शेकोटी विझली आणि कॅम्पमध्ये टोटल हलकल्लोळ माजला. सर्व मुलांना रातोरात घरी परत धाडले गेले. दुसऱ्या दिवशी लाजो, लिली आणि पंडितजींना कळले की, कॅम्पचे भयानक नुकसान झाले असून रिनोव्हेशनला किमान दहा वर्षे लागतील. पूजा नि पूजाच्या अख्ख्या बॅचने पैसे तर आधीच भरले होते आणि कॅम्प तर आता दहा वर्षांनीच शक्य होता. शुद्ध मनाच्या लाजो, लिली आणि पंडितजींनी असे ठरवले की, कॅम्पचे रिनोव्हेशन झाल्यावर हीच बॅच पहिल्यांदा येईल. तशी त्यांनी मेल्स संबंधित लोकांना पाठवली व कामाला जुंपून घेतले. कॅम्पच्या तिरक्या झालेल्या पाटीपाशी एक फकीर गात होता...
'तू है कमाल मौला, तू है कमाल...
तेरी कुदरत कमाल, तेरी सल्तनत कमाल'
*****
आज दहा वर्षे लोटली आहेत. लाजो, लिलीच्या केसांत एकेक पांढरा पट्टा आला आहे. पंडितजींचे केस मात्र जेट ब्लॅक आहेत. कॅम्प पुन्हा उभा झाला आहे. आज संध्याकाळी सहा वाजता सर्व मुले येणार आहेत. पूजा आणि पूजासकट..

सहसा असल्या जुळ्यांमध्ये एक महा आगाऊ, पैशाचा गर्व झालेली, भांडखोर पण तरीही लव्हेबल (म्हणजे मोहब्बते मधली इशिका धनराजगिर) आणि एक शांत, क्यूट आणि सहनशील वृत्तीची (म्हणजे मोहब्बते मधली ती प्रीती) असते. भारतात आईकडे राहणारी पूजा प्रीती सारखी झाली असती, पण तीसुद्धा इशिका धनराजगीर सारखीच झाली याला कारणीभूत झाला एक प्रसंग!

इंडियन पूजाला ढोल खूप छान वाजवता येत असे. एका गणेशोत्सवात ती आपल्या टीमसह पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवायला आली. तेव्हा टीमचा फॉर्म भरताना तिने वडिलांचे नाव 'राज मल्होत्रा' लिहिलेले एका मुलीने पाहिले. आता ही मुलगी (आपण तिला संजना म्हणू) जनरलच पूजावर जळत असे त्यामुळे ते नाव वाचून तिने कुत्सित हास्य केले. पूजाचे वडील हे तिची शाळेची ऍडमिशन होण्याआधीपासूनच अमेरिकेत जाऊन बसल्याने तिच्या शाळाप्रवेशाला, पीटीएला कुठेच ते कधीच आले नव्हते. खुद्द पूजानेदेखील त्यांचा फोटोही कधीच पाहिला नव्हता. कारण अंजलीने स्वतःच्या हातांनी राज की सब यादें मिटा दी थी.. पूजा सोडून! शिवाय कंपनी सुरू करायला अंजली त्या खेड्यातून दाई माँ, आर्यन धवन, शेरू कुत्रा, चुल्हाचौका करणारी जमुनामौसी आणि अर्थात पूजा इतक्या सगळ्या लोकांसोबत मुंबईला शिफ्ट झाली होती. त्यामुळे खेड्यातल्या घरातली यादेंसुद्धा पूजा पाहू शकली नव्हती.

'वडिलांचे नाव राज मल्होत्रा? इतर देशांत प्लेसहोल्डर नेम म्हणून 'जॉन डो' वापरतात तसे इथे तू राज मल्होत्रा वापरलेले दिसते...' संजनाच्या या कुत्सित बोलण्यामुळे पूजाचे टपोरे डोळे काठोकाठ पाण्याने भरले आणि इमोशनल होऊन तिने ढोल वाजवणे चालू केले...

'दुनिया में कितनी है नफरते (संजनाच्या छद्मी हास्यवाल्या चेहऱ्याचा क्लोजप)
फिरभी दिलोमे है चाहते (वर्गातल्या रोहन कपूर या लहानपणीपासूनच सिक्स पॅक ऍब्ज असलेल्या हँडसम मुलाचा हसरा क्लोजप)
मर भी जाये प्यारवाले
मिट भी जाये यारवाले
जिंदा रेहती है उनकी मोहोब्बते..
(संजना सोडून टीममधली प्रत्येक व्यक्ती पूजाच्या मागून एक डावीकडे, एक उजवीकडे असा उभी ठाकण्याचा स्लो मो 'एकीचे बळ' सीन..) मागून पूजाच्या डोक्यावर जणू आपला वरदहस्त आहे, असे भासवणारा विसर्जनाला जाणाऱ्या गणेशमूर्तीचा शॉट..

अशा प्रकारे संजनाला तर गप्प केले पूर्ण टीमने. पण अंजलीला कळले की हे काही खरे नाही. असेच डोळे पाण्याने भरून फॅमिली गीत गात राहिली तर पूजाचा या दुष्ट दुनियेत निभाव लागायचा नाही. मग तिने आपले विश्वासू खानचाचा आणि ब्रिगेन्झा अंकल यांना पूजाला ट्रेनिंग देऊन टफ बनवण्याचे काम सोपवले. पण त्यात या दोन्ही सहृदयी व्यक्तींकडून लाडाचा अतिरेक आणि चुकांचे कौतुक झाल्याने इंडियन पूजाही इशिका धनराजगीर सारखी झाली. (ती ढिनच्याक पूजा झाली नाही हे राज अंजलीचे नशीब)

क्रमशः

दाई माँ, आर्यन धवन, शेरू कुत्रा, चुल्हाचौका करणारी जमुनामौसी आणि अर्थात पूजा >>> Lol

त्यामुळे खेड्यातल्या घरातली यादेंसुद्धा पूजा पाहू शकली नव्हती. >>> हो कारण ती यादें लिटरली तिच्याबरोबर घेउन आली होती शहरात Happy

इतर देशांत प्लेसहोल्डर नेम म्हणून 'जॉन डो' वापरतात तसे इथे तू राज मल्होत्रा वापरलेले दिसते...' >>> हे कहर आहे Happy

लहानपणीपासूनच सिक्स पॅक ऍब्ज असलेल्या हँडसम मुलाचा >>> Lol

धमाल अ‍ॅडिशन श्र!

Anjali ani raj che lahanpaniche song lajo panditji ani lily he tighe milun donhi poojana ani rohan la shikvtat. Rohan var donhi pooja marat astat he sangayla nakoch. India walya poojacha adhipasun crush ahe ani rohan matr chammkchallo walya american pooja var love at first site houn marat asto. Tighe hi camp chya gathering mdhe anjali raj fem song mhntat camp fire kartana..tevha saglyana parents na pan bolavlele aste. . Song aikun raj anjli gahivarun ekmekankade baghtanach...........
Pay ghasrun pandit camp fire madhe padu lagto..tyala vachvayla rohan, tyala vachvayla american pooja tyacha shirt pakdte.... odhatanit shirt fatun rohan chya 6 pyak che darshan ghadun prekshak sukhavtat... Itkyat camp cha juna nokar bombalto ki dar varshi ya fire la konitari bali miltoch..karan to camp haunted asto... He Ikun ame.pooja pandit ani ro. Doghanahi khechun baher kadte ani swing houn aagit padta padta emotional vaky fekte...

Le poja samBhal apne pyaar ko.... Rohan pooja ko kabhi chodke mat jana....lamblachak bhashan thokun ti ekdachi aagit padte. .. raj anjli ro. Ani ind. Pooja sAgle aa karun putlyasarkhe baghatana ha scene sampto...
Kramashaha....,,

Sorry श्रध्दा मराठीतून टाईप करण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलवरून लवकर टाईप होईना।खूप वेळ लागतो आणि भरभर टाईप होत नाहीये। माझं लिखाण वाचता येतंय का ? परत टाईपायला बराच वेळ लागेल म्हणून आत्ता करत नाही। next time try karen।।।