सावरू कितिदा

Submitted by vilasrao on 31 August, 2017 - 14:47

आणले अवसान उसने मागवू कितिदा
चेहरा आणून उसना मी हसू कितिदा

जे कटाक्षातून आहे तीर सोडत तू
हे विचारू का तुला मी मरू कितिदा

रोजही निर्धार करतो बोलण्या जेव्हा
तू पुढे ये ना जरा मी घाबरू कितिदा

त्या तुझ्या गल्लीत दिसलो जर कुणाला मी
घेत मग नजरा मुरब्बी आबरू कितिदा

वादळा आता तुझी भिति ती मला नाही
मी कधी पुसतो तुला की सावरू कितिदा

विलास

Group content visibility: 
Use group defaults