नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by कविता९८ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

कैच्या कैच मालिका....
ती मेनका सायको आहे..आणि समीर एकदाही तिला खडसावून सांगत नाही की बाई गं....तू बॉस आहेस तर बॉस सारखीच रहा... माझ्या वैयक्तीक आयुष्यात कशाला ढवळाढवळ करतेस? आणि टॅटू काढला म्हणून काय कुणी मेमो देतं का...हिच्या वरचे सगळे साहेब काय मेले का?
समीर त्यांना जाऊन का नाही सांगते? आता ती व लता मिळून समीर चं लग्न मोडायच्या मागे आहेत.....काहीही!!!!!
सिरेलीं मधली पात्रं अशी घडाघडा बोलतच का नाहीत देव जाणे !!! आत्ता आई आजी लता शी बोलत असतात आणि आत्ताच लगे लताला त्या मेनकेचा फोन आला की ती जरा बाजूला जाते व कुण्णाला कळत नाही.... Uhoh

अतिशय निर्बुद्ध सिरीयल आहे >>> अनेकवचनात लिही ना हे वाक्य, कारण झी मराठी वरच्या सगळ्याच मालिका इल्लोजिक्ल / निर्बुद्ध / इरिटेटिंग असतात. वेब सिरिज पहाव्यात त्या पेक्षा. बर्‍याच चांगल्या कथा चालु होत्या/ आहेत.

झी वरच्या घाण निगेटिव्ह मालिका असा अवॉर्ड ठेवावा ..त्यात बर्याच मालिका बसतिल..
१) खुलता कळी:- स्टार्ट तो एंड हिरो हिरोइन मनापसुन हसले पण नाही साधे..
२) हीच मालिका.. :- ब्रेक अप नावातच आहे मग अगदी एक एपिसोड विदाउट ब्रेक अप किंवा होणार्या नव्या ब्रेक अप ची नांदी न घेता येत नाही...
३) नवर्याची बायको पण घ्याच
Angry

जीव रंगला पण घ्या.
ती शाळेत जाते, तो तालमीत जातो असेच एपिसोड चाललेत

मला ह्या सिरीयल मधलं अजी हे पात्र खुप आवडत
तिची बोलण्याची पध्दत तर काही औरच
ही सीरियल मी फक्त त्या आजीचे संवाद एकण्यासाठीच बघतो

या मालिकेतील रजनीश प्रधान या नटाचे नाव काय? दिसायला आकर्षक व्यक्तिमत्व आणि आवाजाचे चढ उतार सांभाळून खूप सुंदररितीने तो संवादफेक करतो.

>>>या मालिकेतील रजनीश प्रधान या नटाचे नाव काय? दिसायला आकर्षक व्यक्तिमत्व आणि आवाजाचे चढ उतार सांभाळून खूप सुंदररितीने तो संवादफेक करतो.>> मी बघत नाही पण प्रोमो बघून त्याच्या साठी बघितला एपिसोड...
खरंय...मस्त वाटला तो... लीड पेयर पेक्षा हाच भारी वाटला... रोहिणी हट्टंगडी, सत्या, आणि हा ...

माधव देवचाके
सरस्वती सिरीयल मधे मंदबुद्धी मुलाची भुमिका केलेली पण ते सिरीयल वालेच त्याला कुठल्यातरी शाळेत टाकून विसरले.

चांगला अ‍ॅक्टर वाटतोय तो. मीरावर बदाबदा संकटं कोसळवून झाली, आता जरा काहीतरी बराबर की टक्कर दाखवा म्हणावं लेखक-दिग्दर्शकांना.

यातला समीर अचान्क एवढा कसा बदलला? stand वगैरे घेतोय अगदि. >>>> नक्की कुठली सिरियल सम्पतीये? ही की मानबा? कारण जनरली झीमच्या सिरियलस शेवटच्या घटका मोजत असल्या की त्यातील पात्रे अचानक विचित्र आणि आश्चर्यकारकरीत्या चान्गले वागायला लागतात.

मेनका, लता, नि आजी यांच्या बुद्धीबळाच्या डावात समीर मीरा रजनीश ला नुसते हत्ती घोडे नि बाकीचे लोक प्यादी आहेत!
आजी म्हणते काही काही माणसे नुसती पाहूनच अजिबात आवडत नाहीत तशी मेनका आहे. नि लता ला बहुतेक मीरा तशीच वाटते.
मीरा वर मात्र प्रचंड टेन्शन कायम! ती नि समीर दोघे अमेरिकेत पळून का येत नाहीत? इथे काही घरच्या लोकांना नसत्या भानगडी करायची सवय नसते.
अरे हो, सध्या इथे एच १, एच४, इएडी असले कसले तरी घोळ चालू आहेत ना! इंग्लंड नाहीतर ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड मधे जा! पटकन! किती दिवस आई बाबांना धरून बसणार? ते सगळे त्यांची काळजी घ्यायला समर्थ दिसताहेत. अगदीच वाटले तर मधून मधून व्हिजिटला जावे. पण असल्या टेन्शनमधे आयुष्यातले सोन्याचे दिवस का वाया घालवावेत?

कारण जनरली झीमच्या सिरियलस शेवटच्या घटका मोजत असल्या की त्यातील पात्रे अचानक विचित्र आणि आश्चर्यकारकरीत्या चान्गले वागायला लागतात... Lol +१

मीरा बोलताना चेहेरा किती वेडावाकडा करते !>>>+१

मला तिची बहिण अजिबात आवडत नाही. फार चोंबडी आहे. - मीराची>>>+१

आई सुधारते आहे म्हणजे संपेल आता ही मालिका.

पण मीराचे लग्न १५ दिवसाच्या आत आहे म्हणे.
मी खूप उशीरा बघायला सुरुवात केली पण त्या मेनकेला या समीरशीच का लग्न करायचे आहे- त्या कुटुंबाने तिचे असे काय घोडे मारले आहे की ज्यामुळे तिला त्यांचा सूड घ्यायचा आहे?

Pages