नवीन मालिका "तुझं माझं ब्रेकअप"

Submitted by _K_ on 31 August, 2017 - 12:21

झी मराठी वर 18 सप्टेंबर पासून रात्री 8.30 वाजता तुझं माझं ब्रेकअप ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Sainkeet Kamat (राखेचामधील अभिराम)and Ketaki Chitale हे मुख्य पात्र आहेत.

Group content visibility: 
Use group defaults

ते आलं लक्षात.. मला विचारायचं होतं की खरंच असं cold war आहे का पार्लेकर आणि डोंबिवलीकरांमध्ये?
cold war पेक्षा पार्लेकर खरंच स्वतःला भारी समजतात का डोंबिवलीकरांपेक्षा

रियली डोन्ट नो, पार्लेकर सांगू शकतील.

मला माहिती असलेली काही माणसे पार्ल्यातून डोंबिवलीत सेटल्ड होऊन रमलेली आहेत आणि डोंबिवलीला नावं न ठेवता एकरूप झालेली आहेत, अर्थात मी किती बोटावर मोजक्या माणसांबद्दल सांगतेय. पण एक ओळखीची त्यातली तिची सख्खी बहीण ऍड, मुवि क्षेत्रात आहे आणि पूर्वी सिरियल्स पण केल्यात.

मला मात्र कौतुक आहे पार्ल्याचं. मुंबईत आपली वेगळी ओळख टीकवून आहे ते शहर. बरीच मोठी माणसं दीली आहेत ह्या शहराने.

बरी वाटतिये मालिका. हिरो आणि हिरविणीचे कपडे आवडले. नाही तर इतर मालिकांमधे सुरवातीपासुन शेवटापर्यंत एकाच प्रकारचे कपडे घालतात.

इथे चान सलवार-कमिज, गोव्यात शॉर्ट्स किंवा वनपीस, नाईटी. आवडलं हे.

छान आहे सीरिअल , मीरा चे ड्रेस मस्त आहेत . एकंदर सर्वांचे कपडे छान आहेत .
सतत ची भांडणे जरा बोर होतात पण त्यावर तर सीरिअल आहे .

एक दोन बघितले सिरियलचे. मला वाटल हि नायिका झीमच्या इतर नायिकान्पेक्षा वेगळी असेल. पण कसल काय? अतीचान्गली, अतीगोड वै वै आहे हि सुद्दा. मला समुद्र खुप आवडतो, नातेवाईकामध्ये राहण्यातच खरी मजा आहे. ई. तेच ते ग्गोड नायिकेचे टिपिकल बोलणे. Uhoh

समीरच्या आत्याचे कपडे आणि ईमिटेशन ज्वीलरीपण छान असते. हिरविणीच्या बहिणीला कुठेतरी बघितलंय कदाचित नाटकात. हिरविणीला सरकारी नोकरी आणि नव-्या्यापेक्षा जास्त पगार असतो मग समीरची आई कशाच्या जोरावर ब्लॅंक चेक वगैरे देऊन येते. खूप माणसं आहेत मालिकेत, कुणाची कोण काही कळत नाही, त्या जाडूबाई मालिकेसारखी.

दोन कुटुंब आहेत. समीरच्या घरात त्याचे आई, बाबा, आत्या आणि काका. मीरच्या घरात तिचे आई, बाबा, बहिण, काका, काकू आणि त्यांचा मुलगा.

भिकार आहे सिरियल. जी काही चुकून डोळ्यावर पडते त्याने ही अत्याचार होतात. पहात तर नाहिच. पण चुकून सुद्धा चॅनल सर्फ करताना या सिरियलचा एखादा बरा सिन डोळ्यांना दिसत नाही. सतत फक्त आणि फक्त नॉन्सेन्स.
त्यातल्या त्यात ती उदय टिकेकर ची आई पहायला बरी वाटते, दिसते ही छान आणि तिच्या साड्या सुंदर आहेत.

उदय टिकेकर ची आई नाही ती...बायको ए!
आणि सिरीयल बरी चाललीय.....म्हणजे नाकपुड्या फुलवून पुन्हा नाकात बोलणार्‍या नायिकेला पहण्याचा पेशंस तुमच्यात असेल तर! हिरो ठीके. ती अगदीच बुटकी, सतत सानुनासिक बोलणारी वतीदात वेडेवाकडे असणारी आहे. त्यापेक्षा तिची सासूच स्मार्ट आणि मस्त वाटते.

उदय टिकेकरची आई Rofl हो अगदीच काहीतरी दिसते पण ईथे काही लोकांना राग येतो असं बोलल्यावर म्हणून नाही बोलले. हिरवीणीची बहिण छान दिसते पण ती बंडखोर वाटते आणि अशा हिरवीणी नाही चालत झीला. मीराची काकू म्हणते चांगला चेक मिळत होता तर परत पॅचअप करायला निघालीये. घरातल्या घरात एवढं राजकारण. असं या लेवलचं असतं का कधी. विजय निकम पहिल्यांदा निगेटीव्ह भूमिकेत दिसताहेत.

अरे पण ज्यांचा ब्रेकप होतोय ते दोघं तर मी १-२ वेळा एकमेकांशी फोन वर गुलूगुलू बोलताना पाहिले की.. मग माशी नक्की कुठे शिंकलिये? Uhoh
एक सिन पाहिला त्यात तो लहान भाऊ हिरविनिला जोक सान्गत अस्तो ती कुठेतरी निराळीकडे घुसून माझ्याशी नोर्मल बोला, नोर्म ल बोला म्हणत होती.. इतका नकली अभिनय अरारा

हिरवीणीची बहिण झाल्ये ती जुयेरेगा मधल्या आदित्यच्या बहिणी सारखी दिसते जरा. तिचं लग्न झालं आहे की नाही ह्या मालिकेत ?

तिचं लग्न झालं आहे की नाही ह्या मालिकेत ?>> हो आणि ती सुद्धा नवर्‍याला सोडून माहेरी रहायला आली आहे.

अरे पण ज्यांचा ब्रेकप होतोय ते दोघं तर मी १-२ वेळा एकमेकांशी फोन वर गुलूगुलू बोलताना पाहिले की.. मग माशी नक्की कुठे शिंकलिये?>> अश्यावेळी नेमके घरातले कोणीतरी विरुद्ध पार्टीच्या घरी जाऊन भांडून येतो असे दाखविले आहे. त्यातून आता सोडचिट्ठीतून हिला मिळणार्‍या पोटगीतून मुलाचे शिक्षण करायचा काका-काकूचा मनसुबा आहे.

एक सिन पाहिला त्यात तो लहान भाऊ हिरविनिला जोक सान्गत अस्तो ती कुठेतरी निराळीकडे घुसून माझ्याशी नोर्मल बोला, नोर्म ल बोला म्हणत होती.. इतका नकली अभिनय अरारा>>+१ तो भाऊ नॉर्मलपणे विनोदच सांगत असतो ना Lol

ती हिरवीण जी (वेडीवाकडी) तोंडं करते ते बघवत नाही.>>>+१ हो.
रोज पडका आणि रडका चेहरा दाखवायचा आहे तर गोड/सुंदर नायिका घ्यायला हवी होती.

गोड चेहऱ्याची नायिका का घेतली नाही? ती हिरवीण अगदीच वाईट आहे .
मी अर्थात बघत नाहीच . मला ती हिरवीण अजिब्बात आवडत नाही Wink Happy

अंजली बै किती गोड दिसतात हिच्या मानाने...!! नाही का? क्लोज अप्स मधे तर अंजली फारच सुंदर दिसते...

अंजली चे दुधाचे दात पडलेच नाहीत असे वाटते ....साधीच छान दिसते ...glamorous look मध्ये इतकी चांगली दिसत नाही ...

अंजली खरोखरी सुम्दर दिसते. अ‍ॅक्चुली सुंदर नाही पण रेखिव आहे ती.
त्या ढेरपोट्या सुयश मध्ये हिने काय पाहिले देव जाणे Uhoh

हो..मलाही नाही आवडत तो..डोळे नेहमी लालच असतात ..चेहऱ्यावर खोटं स्माइल....त्याच्या पेक्षा उंच असेल अंजली Uhoh

मी एक दोन भाग बघूनच सोडून दिली. डायलॉग्स मधे तोचतोचपणा आहे. एकाच अर्थाचं रटाळ गोल गोल बोलत रहातात.
त्यापेक्षा जाडुबाई जोरात मधे जरा चांगल्या शाब्दिक कोटया असतात...त्यातही अतिशयोक्ती होते कधीतरी पण बरी आहे.

Pages