Need help...

Submitted by मिनु१६ on 31 August, 2017 - 07:05

Hi All, I need your help, I am 32 years old women cheated in the relationship, he lie me about his age and other things, we have a kid. I am not happy with him he doesn't spend time with me, no love, no outing, very short tempered, want me to wear the clothes he likes only. I am fed up in this relationship but only because of my kid i m here. I dont want my kid suffer because of our mistakes, please guide.

Now, I am in dilemma that I should continue with this relationship or not, I am very sad and unable to take any decision. We had a love marriage, inter-cast, I know its my mistake but now I regret each and every day. I have taken decision to marry this person going against my family. This is love marriage and intercast . After marriage I realise it was not love it was just attraction and this person doesnt love me, he also hide his real age from me before marriage, he is 12-13 years older than me I know it after marriage. I feel cheated but the marriage was against my family and I dont have any other option so I tried to go with it. Now after 12 years of marriage I have 9 year old kid, my husband who is 13 years older than me is very boring person, dont take me and my kid out, just work and work full day and is busy in his own activities like gardening, stitching etc. Even no love and romance in our life he just complete the physical relation as a work no emotions in it. I am feeling lost, lonly and cheated. When I see my friends who had arrange marriage with same age 3-4 years age difference between couples are very happy, they hang out with kids, spend time with each other then I feel very bad that why I have taken decision of marriage. Now my parents talk to me but the relation is not as before they are very hurt by my decision that I eloped and get married with this person. Otherwise he is ok, fulfill all the husband duties but I dont feel connected with him, no bond or relationship.

Please help me what to do? i m totally confused unable to concentrate on work. My husband is a good guy no dirnks, smoke any other things but he is very workholic, when try to talk he never listen and tell me he is doing all this for our kids future, his childhood his family was not financially well so now he is working and working to give best to our kid, but we both are working and financially stable I told him some time with family is also essential but he doesnt understand.

Group content visibility: 
Use group defaults

you mean me to get rid of my husband? or he to ged rid of me? I know some of you will think what a foolish lady, her husband is good, working for family, everything is good but she want to separate, but only a lady or I can imagine the lonely nights, no one with you when you want someone's support or emotional need after a bad day or situation. Everyone want some change in daily life but in 12 years of marriage he never take me out for a movie or anywhere. He is never there for me I feel very lonely.

(सॉरी कुठेही पाचकळ मारायचा मोह आवरत नाही, हा माणूस 12 किंवा 13 वर्षं यंग दिसायला काय काय करतो ते विचारून मला कळवा)

ऑन सिरीयस नोट
12 किंवा 13 गॅप नसलेले आणि तरीही फक्त स्वतःत, स्वतःच्या कामात गुरफटलेले बरेच लोक आजूबाजूला पाहायला मिळतील.
कधीकधी पैसा मिळवणं इज अ बिग बीच.इतके तास आणि डोकं आणि शब्द कामात घालावे लागतात की घरी येऊन परत दुसरयाला आवडत्या ऍक्टिव्हिटी करणे, गप्पा मारणे याला एनर्जीच नसते.
जमल्यास आपले सर्व कंसर्न एकदा शांतपणे बोलून बघा.फरक पडेल.
फॅमिली सपोर्ट नसताना आणि लहान मूल असताना नात्यातून बाहेर पडणे, सर्व गोष्टीत,सर्व निर्णयात,पोरांच्या सर्व माईलस्टोन्स मध्ये एकटेच असणे यात प्रचंड खंबीर कॉन्स्टिट्युशन लागते.तो लास्ट रेझोर्ट ठेवावा(निदान मूल असताना तरी) असे वाटते.

are u financially self adequate?? if so,leave that work jackass!!
I think you should move on and explore your life ,make relationship with other man of your age.to do this you should be careful about your child's future.
and yes ,u are still young .try to patch up with u r family.
good luck and don't be afraid to experiment, whole life is an experiment. best luck!!!

माझ्यामते तुम्ही जे वर लिहिलंय ते बर्‍यापैकी फर्स्टेशन मध्ये लिहिलेलं वाटतं आहे. जरा शांत डोक्यानी विचार करा. परिस्थितीचा सर्व बाजूंनी आढावा घ्या. प्लस मायनसेस काय आहेत, होऊ शकतात ते पाहा. जोडीदाराशी, घरच्यांशी, बोलून चर्चेनं मार्ग निघाला तर उत्तम.
तुम्ही कितपत अ‍ॅडजस्ट होता आहात आहे त्या परिस्थितीमध्ये ते ही पडताळून पाहा. जोडिदार घर आणि भविष्य सिक्युअर करण्याकरता धडपडत नसेल कश्यावरून? कळकळीचा आग्रह - चर्चा करण्यातून मार्ग निघू शकतो. समुपदेशकांकडे मदत मागता येईल.

सेपरेट होणं सोपं आहे पण एकट्याला निभावून नेणं कठीण आहे.
मोस्टली सगळे कायदे बायकांच्या बाजूनी आहेत; तरीही कोर्ट कचेर्‍या करणं वाटतं तेव्हढं सोपं नक्कीच नाहीय. जॉब करत असाल तर वेळ काढणं फार जिकिरीचं होतं.
म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये सोडवणार असलात तर सोपंय. केस चालवायची म्हटली तर किमान ५/७ वर्ष खेटे मारावे लागू शकतात. अर्थात परिस्थितीनुसार हे बदलेल.
--
(सख्ख्या) नातेवाईकाचा घटस्फोट पाहिलेला
योकु

मला वाटतय की दोन्ही बाजुने खुप कम्युनिकेशन गॅप पडली आहे...
एकदा वयाचा मुद्दा बाजुला ठेवुन शांतपणे विचार करा.नेहेमी बायकोला चित्रपट किंवा फिरायला घेउन जाणारे लोक चं चांगले असतात असं नव्हे.बायकोला हे सगळं देउन दुसर्या बाजुन तिला फसवणारे पण असतात.तुमचा नवरा व्यसनी नाही,घरासाठी च काम करतोय ही खुप मोठी जमेची बाजु आहेच की.
तुम्ही एकदा शांतपणे सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा.प्रेमविवाह आहे म्हणताय म्हणजे लग्नापूर्वी एकमेकांच्या प्रेमात पडला होतात तेव्हा तुमच्यात संवाद होत असतीलच.त्याची आठवण त्यांना गोड बोलुन करुन द्या.सुखी संसारासाठी फक्त पैसा नव्हे तर एकमेकांसोबत वेळ घालवावा लागतो ते प्रेमाने सांगुन बघा.
स्वत:हुन पुढाकार घेउन एखाद्या दिवशी बाहेर जायचा आग्रह करुन बघा.तुमचे पती कुठल्या डीप्रेशन किंवा anxiety मुळे असं वागत आहेत का हेही जाणून घ्यायला लागेल.तसं असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीत स्वारस्य वाटत नाही.स्वत: भोवती कोष विणुन घट्ट मिटुन घेतात माणसं स्वत:ला.खरतर अशावेळी त्यांना जास्त मदतीची गरज असते.
असेल तर दोघे मिळून एखाद्या कौन्सेलर चा सल्ला घेता येतो का बघा.
नातं तोडणं हे समस्येवरचं उत्तर मला तरी वाटत नाही.बरेच प्रश्ण बोलल्याने सुटतात.

जी व्यक्ती 12-13 वर्षे लहान मुलीला वय लपवून आपल्या प्रेमात पाडते ती बोलीबच्चन असावी असे वाटते. किमान तो एक स्मार्टनेस, एक्टीवनेस तरी हवा. गेला बाजार सोशलनेस किंवा असलेच काही गुण. असे एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात (या शब्दाबद्दल क्षमस्व) ओढणे सोपे नाही.
असे खरेच असल्यास अशी व्यक्ती नंतर अचानक कशी बदलली हे कोडे आहे. कधी उलगडायचा प्रयत्न करा..

मॅरेज सर्टिफिकेटवर वय असते ना ? तेंव्हा समजले नाही का? लग्न करण्यापुर्वी कोण कुठे किती वर्षे होता , कुठे कधी डिग्री पास झाला, बरोबरचे बॅचमेट्स कोण , इ चर्चा होतेच. तरीही १०-१२ इतका फरक समजला नाही, याचे आस्चर्य वाटते.

कुटुंब सल्लागारकडे जाऊन या. आधी एकट्या मग गरज पडली तर दोघे. >> +१

जर नवरा शारिरीक / मानसिक त्रास देत नसेल आणि तुम्ही कमवत असाल तर हा नुस्का वापरा..
घरी आंनदी वातावरण ठेवा. तुम्ही छंद जोपासा. स्वतःला आणि मुलाला व्यग्र ठेवा.. घरकामाला बाई ठेवा.. बाहेरची घराची कामे तुम्ही करा..
Trendy/ Outgoing रहा... नवरा जेव्हा तुम्हाला आणि मुलाला असं बघेल (खर्चासकट) तर तोपण तुम्हाला Join होईल..

Age is one factor but it is not only factor to make married life successful.
When you are happy, world around you look happy and vice versa.

कुटुंब सल्लागारकडे जाऊन या. आधी एकट्या मग गरज पडली तर दोघे.>> अगदी बरोबर...तुमच्या समस्येच्या सर्व बाजू समजून घेवून तज्ञ व्यक्तीचा सल्ला महत्वाचा आहे. इथे सर्व मदत करतीलच, परंतू भिन्न लोकांच्या भिन्न विचारांनी अजूनच गोंधळ वाढण्यापेक्षा यातील तज्ञांचा सल्ला घ्या. प्रश्न एकाचा नसून ३ व्यक्तींचा आहे.

you mean me to get rid of my husband? or he to ged rid of me? I >>> नाही तुमची या परिस्थितितुन लवकरात लवकर सुटका व्हावी असे वाटते. वर् कोणीतरी म्हट्ल्याप्रमाणे फ्रस्ट्रेशन मध्ये लिहिलय असे वाटते. जर तुम्ही स्वत्: जॊब करत असाल आणि विश्वासघाताची भावना घेऊन एका शीघ्रकोपी अरसिक माणसाबरोबर तब्बल १० वर्ष्र संसार केला असेल तुम्ही खुपच् सक्षम आहात तुम्ही स्वत्: यातुन मार्ग्ग् काढु शकता तुम्हाला सल्ल्याची गरज नाही.

>> माझ्यामते तुम्ही जे वर

>> माझ्यामते तुम्ही जे वर लिहिलंय ते बर्‍यापैकी फर्स्टेशन मध्ये लिहिलेलं वाटतं आहे. जरा शांत डोक्यानी विचार करा. परिस्थितीचा सर्व बाजूंनी आढावा घ्या. +१

तुम्हाला मुख्य समस्या "वयाचा फरक" हि आहे का? कि "नवरा कंटाळवाणा आहे" हि आहे? बहुदा "नवरा कंटाळवाणा आहे" हीच समस्या असावी असे तुमच्या एकूण लिखाणावरून जाणवते. वयाचा मुद्दा फ्रस्ट्रेशनमधून आला असावा. असो.

"सिनेमा नाटकाला वर्षानुवर्षे न जाणे, अजिबात रोम्यांटिक नसणे, फक्त आणि फक्त काम करत असणे" असे असलेली खूप जोडपी आसपास आहेत. पण बायकांची त्याविषयी फारशी तक्रार नाही असेही काही जोडप्यांमध्ये आहे. तर इतर अनेक जोडप्यांमध्ये बायका न बोलता सहन करत आहेत असेही दिसून येते. तुम्ही मध्ये एके ठिकाणी "ठरवून विवाह केलेले माझे काही फ्रेंड सुखाने संसार करत आहेत" असे लिहिले आहे. हे मला थोडे महत्वाचे वाटते. तुम्ही तुलना कराल तर दु:खच वाट्याला येईल. ते फ्रेंड येऊन तुम्हाला कॉम्प्लेक्स देत असतील ("बघ आमचे किती छान सुरु आहे. तुझे खूप वाईट वाटते गं" वगैरे वगैरे) तर सर्वात प्रथम अशा फ्रेंडना कटवा. कितीही जवळचे असले तरी आता त्यांना थारा देऊ नका. प्रत्येकाने आपले आयुष्य आपल्या ठिकाणी राहून जगावे. तुलना करू नये. त्यामुळे "फ्रेंडचे तसे आहे तर माझे असे का" हा विचार अजिबात डोक्यातून काढून टाका. नवरा मारहाण करतो, कामधंदे करत नाही, व्यसनी आहे, बाहेरख्याली आहे, शिवीगाळी करतो इत्यादी काहीही कारण नाही. मग शांतपणे विचार करून नक्की तुम्हाला काय डाचत आहे ते शोधून काढा.

१. तुम्हाला एकटीला बाहेर जायला परवानगी नाही असे तुम्ही लिहिलेले नाही. नवरा त्याच्या कामात नेहमी बिझी असतो. अशा परिस्थितीत अनेक स्त्रिया सोसायटीत मैत्रिणी होऊन महिला मंडळ वगैरे काढून लाईफ मस्त एन्जॉय करत असतात. तो ऑप्शन ट्राय केला आहात का?

२. भरपूर लेखन वाचन करणे आणि फार फार तर एखाद्या सामाजिक कार्यात स्वत:ला गुंतवून घेणे हा सुद्धा पर्याय आहे.

३. वैवाहिक सुख अजिबात नाही वगैरे विचार मनात येतायत? अनेकजणांना/जणींना वाटते अफेअर केले तर वैवाहिक सुख मिळेल. आणि इथेच ते चुकतात. अफेअर केल्याने सुख मिळत नाही उलट भूक वाढते आणि समस्या निर्माण होऊन अनेकदा शेवट विदारक होतो. सगळ्यात प्रभावी उपाय आहे वर्कोहोलिक होणे! वर्कोहोलिक असणे वाईट नाही. तुम्हीही वर्कोहोलिक व्हा. चोवीस तास स्वत:ला कार्यात गुंतवून ठेवा. घरच्या घरी काहीतरी उद्योग सुरु करा (लोणचे, पापड बनवणे पासून शिवणकाम करणे पर्यंत काहीही जे तुम्हाला मनापासून आवडते असे). तो उद्योग वाढवायचा ध्यास घ्या. फक्त त्यावर आणि त्यावरच विचार करत राहा. तुमच्या प्रोडक्टचे हजारो ग्राहक कसे निर्माण होतील हे पहा. सुरवातीला आठेक दिवस जड जाईल. पण हारू नका. पण नंतर तुमचे तुम्हाला स्थित्यंतर जाणवायला लागेल. खूप नामी उपाय आहे हा.

तुम्ही स्वतःची स्पेस्,आयडेन्टिटी का निर्माण करत नाही? एवढेच नाही तर मुलात व वडिलांत काय नाते आहे? त्याला अपले बाबा बोरिंग वाटतात का? बाहेर जाणे ही यशस्वी जीवनाची व्याख्या नाही. स्वतः जॉब करण्यचा प्रयत्न केला आहे का? अन आणखी एक..... ज्यांनी लग्नच केले नाही अशांचा... केवळ प्रत्येक विषयावर पचकलेच पाहिजे अशांचा सल्ल्ला घेवू नका.
या नात्यात जोपासण्या जो गे अनेक सकारात्मक मुद्दे आहेत.
नाते तोडू नका...
इनामदारांचा सल्ला अत्युत्तम आहे!!!! +१११११११

शीर्षकातील वेरी अर्जंट काढा आधी...
हि समस्या अशी नाहीये की लागलीच सुटली पाहिजे. तशी ती सोडवायलाही जाऊ नका.
थोडा वेळ घ्या.. थोडा वेळ द्या..

तुम्ही तुलना कराल तर दु:खच वाट्याला येईल.
>>>
+ 786

हे फार महत्वाचे आहे.
हेच मी माझ्या गर्लफ्रेंडलाही कित्येकदा सांगत असतो. कधीही दुसरया कपलमध्ये किती प्रेम आहे आणि ते किती मजा करतात वगैरे वगैरेशी आपल्या जोडीची आणि आपल्या आयुष्याशी तुलना करू नकोस.
मुळात लोकं ईतर लोकांसमोर आपल्या आयुष्यातील चांगला पार्टच हायलाईट करून ठेवतात. त्यांचे ईतर प्रॉब्लेम आपल्यापेक्षाही किचाट असू शकतात. कोणी फेसबूकवर दर महिन्याला ईथेतिथे फिरून आलो म्हणून फोटो टाकत असेल तर गरजेचे नाही की त्याचे लाईफ हॅपनिण्ग असावे. मधल्या तीस दिवसांत दैनंदिन जीवनात ते अशक्य बोरींग लाईफ जगत असण्याची शक्यता असतेच.
तुमच्या नवरयाला कोणते व्यसन नाही हे देखील कित्येकांनी तुमचा हेवा करावे असे आहे. जोडीदाराच्या या व्यसनांनी त्रस्त आणि रोजची कटकट अशी कित्येक जोडपी पाहिली आहेत. तोंडाला दारूसिगारेटचा वास मारणारया रोमांटीक नवरयासोबत झोपणे हे देखील बरेच त्रासदायक असते असे अनुभवाचे बोल ऐकलेत.

हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी, या बाईत काहीच गटस् नाहीत, सर्व अपेक्षा नवर्याकडून. आत्मपरीक्षण करणे आवश्यक.

मला वाटतंय तुम्ही अति विचार करताय ...
My husband is a good guy no dirnks, smoke any other things but he is very workholic, >>> हे तर चांगलंच आहे ना ...
tell me he is doing all this for our kids future >> ह्यात वाईट काहीच नाही ... उलट अभिमान वाटायला हवा कि तो भविष्यासाठी झटतोय ...
जरा नवर्याच्या बाजुनेपण विचार करा ..may be त्यालाही तुम्ही म्हणताय ते सर्व हवे असेल फिरायला जाणे , फॅमिलीसोबत वेळ घालवणे वगैरे ... पण भविष्यातल्या अनिश्चितीमुळे म्हणा किंवा for secure grt future तो हे सर्व तडजोड करत असेल ... त्यामुळेही तो चिडचिडा , boring झाला असेल ... त्यालाही तुमच्याप्रमाणेच कोणीही घरचे नसतील ... त्यालाही समजून घ्या .. वेळ जाऊ द्या थोडासा .. आणि सर्वात महत्वाचे दुसर्यांकडे पाहणे सोडा.. स्वतःच्या आतमध्ये डोकवा... काही दिवस facebook whatsapp पूर्णपणे बंद ठेवा आणि स्वतःच्या आणि मुलाच्या आवडीच्या गोष्टी करा...

हे फार महत्वाचे आहे.
हेच मी माझ्या गर्लफ्रेंडलाही कित्येकदा सांगत असतो. कधीही दुसरया कपलमध्ये किती प्रेम आहे आणि ते >>
किती ते गफ्रे, शाखा आणि तेच तेच, माबो ची गत मला पब्लिक टॉयलेट सारखी झालिये असं वाटतय कोणताही धागा उघडा हे आहेच. रुन्म्याचा धागा उघडत नाही पण दुसरिकडे पण घाण असतेच, स्किप करतो पण एखादी ओळ नजरेखालुन जातेच.

तुम्हाला या लग्नात निगेटिव्ह वाटणार्‍या गोष्टी एका बाजूला आणि पॉझिटिव्ह वाटणार्‍या गोष्टी एका बाजूला असं लिहून काढा. जर पॉझिटिव्ह गोष्टी जास्त भरल्या तर आत्मपरिक्षण करा. निगेटिव्ह भरल्या तर एकट्याने अथवा दोघांनीही कौटुंबिक सल्लागाराकडे जाऊन मदत घेणं उत्तम.
वयाने मोठे पुरूष रोमँटिक नसतात किंवा, चित्रपटाला/नाटकाला/फिरायला एकत्र गेले तरच 'कनेक्शन' होते असे नव्हे. त्यासाठी संवाद हवा.

ज्यांनी लग्नच केले नाही अशांचा... केवळ प्रत्येक विषयावर पचकलेच पाहिजे अशांचा सल्ल्ला घेवू नका. >> हे पटलं.. Happy
वरती ईनामदार यांनी लिहिलेली पोस्ट खुप आवडली...

मला अशा विषयावर सल्ले देणे पटत नाही. म्हणुन मी फक्त वाचनमात्र रहाणार होते. पण
<<<ज्यांनी लग्नच केले नाही अशांचा... केवळ प्रत्येक विषयावर पचकलेच पाहिजे अशांचा सल्ल्ला घेवू नका. >> >> हे वाचुन रहावलं नाही. काहीही आहे हे.
लग्न केलं नाही म्हणुन सल्ला चुकीचाच देणार का ते?

काहीही आहे हे.
लग्न केलं नाही म्हणुन सल्ला चुकीचाच देणार का ते? >> +1. मीदेखील त्यावर आक्षेप घेणार होते पण धागाविषय तो नसल्याने जाऊदेत म्हणलं.

Thanks to all of you for sharing your reviews, I am very much thankful to you all.

Yes, I was going through some frustration in my working life and it was affecting my family life. I wanted a break from all this and wanted some tension free days, but husband don't have time for it. As स्मिता श्रीपाद said there was communication gap and I learned lot from all the replies from इनामदार , दक्षिणा , सच६४८६, ऋन्मेऽऽष, योकु, mi_anu, रेव्यु, राजू७६, thanks all.

Just like many of you said its very easy to break up but its always good to patch up, and I am going to do it and this will also good for our kid, Thanks all of you once again and this platform is really helpful.

लग्न केलं नाही म्हणुन सल्ला चुकीचाच देणार का ते?
>>>>>
चुकीचाच असे नसावे पण त्यात अनुभवाची कमी असणे साहजिक आहे.
धागाकर्त्यांना कोण विवाहीत आहे आणि कोण अविवाहीत आहे याची कल्पना नसावी. त्यामुळे प्रत्येक प्रतिसाद / सल्ला देणारयाने आपली वैवाहीक स्थिती नमूद करणे ऊचित राहील.

आपला आनंद दुसर्‍यावर अवलंबून आहे असे मानणारे लोक कायम दु:खी राहतात.
यापेक्षा जास्त बोलत नाही. गुडलक!

विपश्शना शिबीर करा दहा दिवस....

आपण स्वतः बोरिंग किंवा भांडकुदल आहेत का याचे पण परीक्षण करा.. नक्की काय रिसन आहे की नवरा टाळतोय...
काही चुका तुमच्या असायची पण शक्यता आहे.. स्वतःपासून सुधारणा सुरू करा..सगळे व्यवस्थित होईल... माफ करा पण एका बाजूने ऐकून नवऱ्याला दोषी ठरवणे योग्य वाटत नाही आहे.
जर तुमच्यात नसेल इस्सु तरि हळूहळू ऍडजस्ट करा नवऱ्यासाठी थोडा.. तुम्ही थोडा ऍडजस्ट करा..नक्कीच तो पण करेल...
शुभेच्छा !!!

its always good to patch up, and I am going to do it...>>> छानच ... आणि शुभेछा !!!

चुकीचाच असे नसावे पण त्यात अनुभवाची कमी असणे साहजिक आहे. >> प्रत्येक गोष्ट अनुभवून त्यातून शिकण्यासाठी संपुर्ण आयुष्य कमी पडेल असं कुणी एक महान व्यक्ती म्हणून गेली आहे. माणसाने स्वतःच्या अनुभवातून तर शिकावेच, पण दुसर्‍याच्या अनुभवातून पण शिकावे. त्यामुळे लग्न न झालेली व्यक्ती अयोग्य सल्ला देऊ शकते हे अज्जिबातच पटले नाही. माझ्या कित्येक मैत्रिणी (अविवाहित) कौटुंबिक सल्लागार आहेत. (याची गरजूंनी नोंद घ्यावी) आणि त्यांची प्रॅक्टिस उत्तम सुरू आहे.

त्यामुळे प्रत्येक प्रतिसाद / सल्ला देणारयाने आपली वैवाहीक स्थिती नमूद करणे ऊचित राहील.--> ह्या स्टेटस चा इथे काय संबंध? Uhoh उगिचच आपली पर्सनल माहिती इथे पुरवायची?

त्यामुळे प्रत्येक प्रतिसाद / सल्ला देणारयाने आपली वैवाहीक स्थिती नमूद करणे ऊचित राहील.--> ह्या स्टेटस चा इथे काय संबंध? Uhoh उगिचच आपली पर्सनल माहिती इथे पुरवायची?>>> + १०० कैच्यकै..

धागाकर्त्यांना कोण विवाहीत आहे आणि कोण अविवाहीत आहे याची कल्पना नसावी. त्यामुळे प्रत्येक प्रतिसाद / सल्ला देणारयाने आपली वैवाहीक स्थिती नमूद करणे ऊचित राहील.>>> Lol हे बेस्ट. तु काय लिहिशील मग? Lol

Just like many of you said its very easy to break up but its always good to patch up, and I am going to do it and this will also good for our kid >> all the best मिनु१६. नक्की मर्ग निघेल यातुन....
सगळं लवकर ठीक होवो ही सदिच्छा.

माफ करा, इनामदारांचा सल्ला चांगला असला (कामात भयंकर व्यग्र होणे) तरी या परिस्थितीत जरासा धोकादायक वाटला. मुलाचे दोन्ही पालक अतीव्यस्त झाले तर मुलाला अजुन अवघड जाईल. तो अजुन लहान आहे. त्यामुळे समन्वय साधावाच लागेल.
तुम्हाला ही परिस्थिती बदलून सकारात्मक व्हावी याकरता शुभेच्छा. पहिली पायरी या बद्दल चर्चा करणे तुम्ही सुरु करताय याबद्दल अभिनंदन.

कैच्यकै आहे हे खरेय, पण सर्वांनी आपले वैवाहीक स्टेटस दिलेच पाहिजे असे गरजेचे नाही. धागाकर्त्याच्या दृष्टीकोनातून विचार करा, त्याला किती सोयीचे पडेल.
उदाहरणार्थ, मी उद्या ईथे एक धागा काढला. मला सर्दी जाहली आहे, उपाय सुचवा. तर अ ब क ड ते झ पर्यंत उपाय सुचवले जातील. मी गोंधळून जाईन. पण तेच मला समजले की "ब" औषध सुचवणारा आयडी डॉक्टर आहे, तर साहजिकच मी त्याच्या सल्ल्याला प्राधान्य देईन. त्यातही मला समजले की "ड" औषध सुचवणारा गुरांचा डॉक्टर आहे तर मी त्याचे आधी ऐकेन. मॉरल ऑफ द स्टोरी काय तर प्रत्येकाचे सल्ले कितीही प्रामाणिक असले तरी कोणाच्या सल्ल्याला किती वेटेज द्यायचे हे धागाकर्ता ठरवू शकतो ना. अन्यथा गूगाळून मिळवलेले सल्ले आणि मायबोलीकर मित्रांकडून मिळवलेले सल्ले यात फरक तो काय... बाकी वरचे पुन्हा रीपीट करतो, सर्वांनीच सल्यासोबत आपले वैयक्तिक डिटेल दिलेच पाहिजे असे गरजेचे नाही. पण जर ते प्रोफाईलमध्ये लिहिले असेल वा लपवण्यासारखे नसेल तर द्यायला हरकतही नाही.

म्यारीड, सिंगल, घटस्फोटित,विधुर, विधवा इत्यादी स्टेटस पब्लिकली देणे सगळ्यांनाच शक्य आहे असे नाही... रुन्मेषभाऊ..

I am very young to advice you on this case but still i would like to give some advice.

First of all dnt think much ..dnt get frustrated in any situation..

Be calm..it was your decision may be its gone wrong but still you have room to make it correct..

As you wrote, your husband quite a good person only things is that he is just workholics.

May be he lost his love and feelings, try to help him find out..

Make Feel him more loveable person on this earth...love him more way you do earlier..

He ll be realise soon.. make some changes in you to feel him how much you care for him..

He ll listen defenately listen you slowely slowely..
Believe yourself and believe your love..

And yes forgive him abt his past mistakes..

कुठलही नातं कधीच तकलादू नसतं..ते बिघडलं तर रिपेअर करा...तुम्ही 12 13 वर्षे संसार केलाय..काहीतरी फिलिंग असणारच ना...त्याशिवायच का केला आहे इतकी वर्ष संसार..
वेळ द्या थोडा..समजाऊन सांगा.. समजाऊन घ्या..

जमलचं तर स्पष्ट बोला त्यांच्याशी तुमची घुसमुट..

चिडून, वैतागून, इथे सोशल साईड वर सल्ले मागून काहीच होणार नाही.. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात..
तुमच्या जीवनाला आकार तुम्हालाच द्यायचा आहे..

आणी साॅरी टू सेय धिस पण इथे चांगला सल्ला देणारे खुप कमी आणि त्यावर भलताच किस काढणारे खुप जास्त लोक आहेत..

जमल्यास विपश्यना करायला जा...

खुप मदत होईल तुम्हाला. .परिस्थिती बदलेल की माहीत नाही पण त्याला सामोर कसं जायचं हे नक्कीच उमजेल तुम्हाला..

तुमचा संसार पुन्हा फुलावा याकरिता मी प्रार्थना करेन तुमच्यासाठी...

कोणाच्या सल्ल्याला किती वेटेज द्यायचे हे धागाकर्ता ठरवू शकतो ना. >> मग ते दिलेल्या सल्ल्यावरून पण ठरवता येऊ शकतेच की, त्यासाठी स्टेटस ची काय गरज? Uhoh
आणि डॉक्टर असेल तर उत्तम औषध च देईल ही अन्धश्रद्धा आहे, नुसता पुस्तकी डॉक्टर असू शकतो. मग सगळेच डॉक्टर प्रसिद्ध झाले असते.

मग ते दिलेल्या सल्ल्यावरून पण ठरवता येऊ शकतेच की, त्यासाठी स्टेटस ची काय गरज?
>>>>
कसे ठरवणार? जो विचारत आहे त्याला यातले काहीच माहीत नसेल तर तो हे कसे ठरवणार?

आणि डॉक्टर असेल तर उत्तम औषध च देईल ही अन्धश्रद्धा आहे, नुसता पुस्तकी डॉक्टर असू शकतो.
>>>>
प्रोबॅबिलिटी !
सामान्य लोकांनी केलेले आजाराचे निदान आणि डॉक्टरकीची पदवी घेतलेल्याने केलेले निदान यात शक्यता कोणाच्या बाजूने जास्त असेल?

धागाकर्त्यांना कोण विवाहीत आहे आणि कोण अविवाहीत आहे याची कल्पना नसावी. त्यामुळे प्रत्येक प्रतिसाद / सल्ला देणारयाने आपली वैवाहीक स्थिती नमूद करणे ऊचित राहील.>>> Lol हे बेस्ट. तु काय लिहिशील मग? >>> सिरियसली तू काय उत्तर देशील रुन्म्या उर्फ़

श्री,
मी कमिटेड आहे
जे विवाहीत असणारेही असतातच असे नाही Happy