कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे

Submitted by संयोजक on 30 August, 2017 - 01:57

कविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे

तर यंदाच्या गणेशोत्सवात बुद्धीच्या देवाला नमन करून मनातल्या ह्या कविला बाहेर पडू द्या.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत.
आम्ही आपल्याला कवितांसाठी काही शीर्षके देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक शीर्षकांवर किती कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही. शीर्षक कवितेमधे आलेच पाहिजे असा आग्रह नाही. शीर्षक रुढार्थानेच वापरायला हवे असे बंधन नाही.
थोडक्यात काय तर 'होऊ दे खर्च'

चौथे शीर्षक :
"तुझे ते खळखळून हसणे"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हटल
तर ती खळखळुन हसते
हो किंवा नाही काहीही सांगत नाही
फक्त्त् थोडी अबोल होते

ती अबोल झाली की
माझ्या जीवाची तगमग होते
माझी होणारी तगमग पाहुन
ती पुन्हा खळखळुन हसते.

मस्त !!!!

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले
बट त्यातली हळुच डोळ्यावर पडे
नयन तुझे पाणीदार
स्वप्नातच दंगलेले
कांती तुझी गव्हाळी
जणू गव्हाला सोन्याची झळाळी
अशी नखरेल तुझी अदा
ज्यावर आहे मी फिदा
आवर तुझ्या रुपाला
नको पाहूस तू अशी
नको करू असा नजरेचा वार
नको तुझे ते खळखळून हसणे
हाल मनाचे माझ्या होतात फार

छान Happy

खळीच्या खळाळ हास्याला पुरेसे रेंगाळू दे ना जरा
तुझे ते मधाळ माधुर्य जिभेवर सांडू दे ना जरा
खट्याळ लटक्या रागाला चिडू दे; भांडू दे ना जरा
बघुनि ना बघण्याचा खेळ मांडू दे ना जरा Happy

घडले आणि बिघडले जे जे त्यावेळी दोघांत
विखरुन गेले कधीच सारे काळाच्या ओघात
बेसावध क्षणि नजर शोधते तरिही तुझेच डोळे
कोलाहल भवतीचा विझवत तुझेच हास्य खळाळे

तुझे खळखळुन हसणे अन..
निर्झराचे खळखळुन वाहणे
दोन्ही भावते मना....

तुझे खळखळुन हसणे अन..
निर्झराचे खळखळुन वाहणे
दोन्ही भावते मना....

पाहिले जेव्हा तुला, होतो मी एकटा
नीटस बांधा, मंदशी चाल, लांबसडक शेपटा
सामसूम रस्ता, झाडांची कमान
सोबत विचारायला निमित्त छान

वाटलं, भराभर गाठू, एकत्र चालू
गाडी पुढे न्यायला, थोडसं बोलू
काय होईल, काय नाही, कोणाला अंदाज ?
धाडस तर करू, पहिल्यांदा आज !

वेग वाढवला पण गाठता येईना
ठरल्या बेताला सोडावंही वाटेना
कसंबसं एकदाचं गाठलं मी तुला
धडधडत्या काळजाला दिलासा दिला

चेहरा नीट पुसला, दडपण मनात
मोबाईल केला मुका, खिशात गेले हात
हळूच म्हटलं, 'मिस', आणि तू वळलीस
काय सांगू काळजाचा ठोका चुकवलीस

हिरवेशार डोळे नि चमकते सुळे
भीतीने गारठून पाय पडले लुळे
शक्यच नाही मी जन्मात विसरणे
तेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे

हिरवेशार डोळे नि चमकते सुळे
भीतीने गारठून पाय पडले लुळे
शक्यच नाही मी जन्मात विसरणे
तेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>> एक नंबर जमलय हे ... Happy

हिरवेशार डोळे नि चमकते सुळे
भीतीने गारठून पाय पडले लुळे
शक्यच नाही मी जन्मात विसरणे
तेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे >>>> Rofl Rofl Rofl

हिरवेशार डोळे नि चमकते सुळे
भीतीने गारठून पाय पडले लुळे
शक्यच नाही मी जन्मात विसरणे
तेव्हाचे, तुझे ते खळखळून हसणे>>>

ओह... अगदी हसणे भिडले!

प्रेमरंग

Submitted by र।हुल on 22 August, 2017 - 22:39
नजर भिरभिरते त्याची
गंमत मजला वाटते
बघुनी त्याला मी
बावरून कधी जाते

खळखळून तिचं हंसणं
वेड मजला लावतं
थरथरल्या ओठांनी
अबोल काही बोलतं

गंभिर त्याचं बोलणं
आधार कधी बनतं
साधंच त्याचं वागणं
भारावून मला टाकतं

सुंदर तिचं दिसणं
बघत रहावं वाटतं
हळूच तिचं लाजणं
भान माझं हरवतं

त्याचं वेड हे लावणं
हलकेच मिठीत घेणं
रंगवेड्या स्वप्नांना
हळूवार कवटाळतं

अलगद बाहूंत येणं
स्वप्नांत हरवून जाणं
तिचं समर्पित हे होणं
नव्यानं प्रेमात पाडतं

―₹!हुल/ २२.८.१७

ती माझ्या कडे बघून खळखळून हसली ×२
हसली रे हसली एक पोरगी फसली
साठवलेले आठवले म्हणून पाठवले Rofl

तिची आहे एकच मागणी
हवीय तिला सुंदर वहिनी
सांगती दादा, दे आणोनी
हसरी बाहुली खळखळूनी

Pages