अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारे चूर्ण:एकदाच खा,खालीच पाहा - mi_anu

Submitted by mi_anu on 28 August, 2017 - 10:38

"काय गं गांडूळे, कुठे चाललीस लगाबगा?"
"माझा हनी गांडूळ स्वीटी भेटणारे आज स्टारबक्स च्या भिंतीच्या फटीत.मागच्या वेळी आम्ही डी मार्ट ला भेटलो होतो तेव्हा म्हटलं त्याला, पुढच्या वेळी जरा बर्या ठिकाणी भेटू.नेहमी काय मेलं पैसे पैसे करायचं?"

"काय गं, भेटलीस का तुझ्या त्या गांडूळराजाला?आणि चेहरा का असा दिसतोय रडवेला?"
"वाट लागली गं माझी!!स्टार बक्स ला गेले तर तिथे ठरलेल्या फटीत 20 फुटी किंग कोब्रा!!!आधी वाटलं कोणी गुंड मवाली आला पाळतीवर.किंचाळलेच जोरात!तर हा म्हणे मीच आहे.डी मार्ट मध्ये एक फ्री ट्रायल चूर्ण दिलं म्हणे सेल्समन ने दुधातून.संपवायचं म्हणून.आणि त्याचा हा असा इफेक्ट!!!हरवला माझा डार्लिंग आणि हरवली माझी लग्नाची स्वप्नं. जातेय मी ब्लु व्हेल खेळायला.फेसबुकवर माझं प्रोफाइल मेमोरियल बनव हां नक्की!!"

गांडूळ गांडुळीची ताटातूट झाली, तशी तुमची आमची न होवो!!नेहमी सर्व कुटुंबासाठी एकत्रच मोठा पॅक घ्या!!!

जीराफिमीन: कम्प्लिट प्लांड ग्रोथ.एकदाच दुधातून घ्या, आणि कायम जगाला बघायला मान खाली घाला!!

एकच डोस, परिणाम ठोस!!
जीराफीमीन ची यमी टेस्ट, बघता बघता पर्वती चा एव्हरेस्ट!!
बघतोस काय नाक मुरडून,जीराफीमीन खाऊन देईन पायात चिरडून!!

आजच आणा, प्रमोशनल ऑफर 99999 रुपये 87 पैसे फक्त.
मनाने बुटके असलात म्हणून काय झालं?शरीराची उंची वाढवायची ही अप्रतिम संधी गमावू नका!त्वरा करा!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खी: खी:
>>>> मनाने बुटके असलात म्हणून काय झालं?>>>>>>> फुटले!!!! Lol Lol Lol