STY - तीन देवीयां...

Submitted by संयोजक on 27 August, 2017 - 23:59

आज त्या तिघीही प्रचंड खुष होत्या. बाटलीचा कॉर्क टप्पं आवाज करून ऊघडताच ऊडणार्‍या फेसाळ शँपेन सारखा पूर्ण बंगल्यात तिघींचा युफोरिआ ओसंडून वहात होता. मोकळे सोडलेल्या लांब सिल्की केसांसहित माना गरागरा फिरवत बेडवर ऊड्या मारणे, ऊश्या फाडून त्यातली पिसे खोलीभर ऊडवणे, आवाज चिरकेपर्यंत वरच्या पट्टीत ओरडणे असे अविरत पणे चालू होते. मग्रुरी, गर्व, अभिमान त्यांच्या आखीव रेखीव आणि गोर्‍या मुलायम चेहर्‍यावरच्या रंध्रारंध्रातून ठिबकत होता. दि मोस्ट ईलिजिबल बॅचलर, विराट कोहलीने ने एका गुडघ्यावर बसत, चार्मिंग चेहर्‍याने जगातली सर्वात महागड्या हिर्‍याच्या अंगठीची डबी त्यांच्यासमोर ऊघडत 'Darling, will you please marry me?' विचारले असते तरी कदाचित त्या तिघीही त्याला 'You should have bought a better ring, baby' म्हणत कुत्सितपणे हसल्या असत्या. चॉकलेट बॉय रणवीर कपूरने हात हातात घेवून त्यावर हकलेच किस करत, त्याच्या मोठ्या पाणीदार डोळ्यांतून प्रेमाची श्यपथ देत अतिशय रोमँटिक आवाजात हलकेच 'Sweetheart, will you be mine forever' विचारले असते तरी त्या तिघीही अतिशय मग्रुरीने 'please try some other time, pretty boy' म्हणत त्याच्या गालावर हकलीशी चापटी मारत फिस्कन हसल्या असत्या.
आणि का नाही त्यांनी असे करावे? त्यांचा हक्कंच होता तो, शेवटी मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड आणि मिस अर्थ स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्वं करण्यासाठी निघालेल्या आजच्या घडीला भारतातल्या सर्वात सुंदर स्त्रिया होत्या त्या तिघीजणी. त्यांच्यापेक्षा कांकणभर कमीच सुंदर, अश्या माजी सुंदर्‍यांनी करोडो प्रेक्षकांसमोर मानाचे मुकूट त्यांच्या डोक्यावर चढवले होते. आज भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात त्यांच्याशी सलगी करण्याची सुप्तं ईच्छा भरून राहिली होती. जॉन हॅम, बेनेडिक्ट कंबरबॅच, फवाद खान सारख्या जगातल्या सर्वात हँडसम, चार्मिंग आणि सक्सेसफुल जजेस समोर त्यांच्या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेची चुणूक दाखवण्यासाठी त्या ऊत्सुक होत्या. मग का असू नये त्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व?

प्रिया सेन, सना मिर्झा आणि डायना जेकब तिघिंनीही आपापल्या स्पर्धांसाठी वेगवेगळ्या देशात प्रयाण करण्याआधी एकदा भेटून आपले आजवरचे अद्वितीय यश साजरे करण्याचा बेत आखला. प्रियाच्या मढ आयलंडच्या बंगल्यात त्या तिघी भेटल्या तेव्हा काही मिनिटातंच तिथे दोन गोष्टींचा पूर आला - हेवी मेटल संगीताचा छप्परतोड आवाज आणि शँपेन. दोन तास हेवी मेटलवर अंगातला प्रत्येक स्नायू दुखेपर्यंत घरभर नाचून, शँपेन ऊडवत एकमेकांना भिजवून झाल्यानंतर आणि ऊरलेली शँपेन रिचवल्यानंतर त्यांना भूक अनावर झाली. तिघींनाही बाहेर जाऊन चायनीज खाण्याची जबरदस्तं हुक्की आली. पुढच्याच क्षणाला मढ आयलंडच्या त्या बंगल्यातून एक मर्सिडीझ लफ्फेदार वळण घेत बाहेर पडली आणि मार्वे रोडवरून टँजेरिन कॅफेच्या दिशेने भरधाव निघाली. गाडीच्या ऊघड्या काचांतून समुद्रावरून भणाणा येणारा चेहर्‍यावर आदळताच, शँपेन आपले खरे रूप दाखवायला लागली. तिघीही गाडीतून डोके बाहेर काढत, ओरडत, गाणी म्हणत जात असतांना वेटोळे मारत सावजाला आपल्या कवेत घेणार्‍या अजगरासारखी शँपेन त्यांना आपल्या कह्यात घेत आपल्याच तालावर नाचवू लागली.

*------------------------

पाशाच्या हातभट्टीवर पहिल्याच धारेची नारिंगी ढोसून, चमेलीच्या फडावर गाणे बजावणे ऐकून, मोगर्‍याची माळ घातलेल्या हाताने बीडी पीत हलत डुलत, बाबल्याच्या गळ्यात गळा घालून निघालेला मक्या म्हणाला, 'तुला सांगतो बाबल्या खाज असते ना खाज लई अतरंगी असते राव... जेवढी अवघड जागा ना तिथंच जास्तं येते बघ.'

'खरं बोलला तू मक्या, आता मलाच बघ ना निकाह करायची किती खाज होती. एक नाही दोन नाही चांगल्या तीन तीन शाद्या बनवल्या पण काय बी ऊतार नाही पडला' एक हात मक्याच्या खांद्यावर आणि दुसर्‍याने बाटली तोंडाला लावत बाबल्या बडबडला.

'बाबल्या, तू लकी हायेस बेट्या. पण माझं काय? एकदा बी लगीन नाही झालं राव माझं' असे म्हणतांना मक्याचे डोळे खरंच पाणावले होते आणि तो बाबल्याचा हात सोडून दु:खावेगाने थिजून रस्त्यातंच ऊभा राहिला.

तोवर पुढे गेलेला बाबल्या मागे वळत हसत ओरडत म्हणाला, 'हे हे मक्या तू रडतोय काय यड्या, अरे ज्यानं खाज दिली तो खाजवायला हात बी देतो होतील की तुझे बी तीन लगीन. हॅ हॅ हॅ असं रडतात व्हय रे... थांब मी मी तुझा व्हेडोच काढून पाठवतो तुझ्या आईला.'

तेवढ्यात करकचून मारलेल्या ब्रेकचा कर्कश्य आवाज करत एक मर्सिडीझ मक्याच्या दिशेने आली. कानांचे पडदे चिरत जाणार्‍या कर्कश्य आवाजाने आणि चेहर्‍यावर पडलेल्या हायबीमने मक्या जागीच थिजला. तोंडातल्या बीडीकडे नेलेला त्याचा हात बीडीपर्यंत पोचण्याआधीच मर्सिडीझ त्याच्या पर्यंत पोचली सुद्धा. मक्याच्या कंबरेवर एक नाजूकशी चापटी मारण्याआधीच थिजल्यासारखी ती जागेवर थांबली. मक्या मात्रं
घाबरल्याने तोल जाऊन मटकन खालीच बसला. बसतांना त्याच्या कोपराला थोडे खरचटले आणि तोंडातली बीडी बाजूला फेकली गेली, ह्याऊपर मक्याच्या पोटातली दारूसुद्धां कणभरही हिंदकळली नसेल.
त्याला पडतांना बघून आपल्या हातून हे काय होऊन बसले अश्या विचाराने प्रचंड घाबरलेल्या त्या तिघीही जणींची शँपेन खाडकन ऊतरली.
लगोलग गाडीतून ऊतरत त्या मक्याच्या दिशने धावल्या. त्याला ऊठवत, 'सॉरी सॉरी, माफ करा चूक झाली' म्हणत त्याचे कपडे झटकू लागल्या.

आपल्या अंगावर ह्या पोरींनी गाडी घातली पाहून मक्याचा पाराच चढला, 'श्रीमंतांच्या माजलेल्या पोरींनो तुम्हाला गरिबाच्या जीवाची किंमतच नाही. चला पोलिस टेशनात सटवीच्यांनो, तुम्हाला धडाच शिकवतो आता' म्हणत तो ओरडू, भेकू लागला.

'नाही नाही, आम्ही तुमची पुन्हा माफी मागतो, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो हवे तर पैसेही देतो पण पोलिस स्टेशन नको! प्लीज पोलिस स्टेशन नको' म्हणत त्या केविलवाण्या चेहर्‍याने मक्याची विनवणी करू लागल्या.

तसा मक्याला अजून चेव चढला 'मला नको तुमचे पैशे, आता आपण पोलिस टेशनात जाणार, मग मी सायबाला सांगून जेल मधीच टाकणार हाय तुम्हाला' तो त्यांच्यासमोर बोट नाचवत म्हणाला.

'तुम्ही सांगाल ते आम्ही करू, पण पोलिस स्टेशन नको, आमचं करियर खराब होईल हो' त्या अजूनच दीनवाण्या होत म्हणाल्या.

'त्ये कॅरियर फिरियरचं मला सांगू नका, तुम्हाला पोलिस टेशनात जायचं नसण तर तुम्हा तिघिलाबी आत्ता हिथल्या हिथं माझ्यासंग लगीन लावावं लागन, मगंच मी तुम्हाला हिथनं जाऊ देईल, त्याबिगर मी ह्या गाडीवरून ऊतरणार नाय म्हणजे नाय' म्हणत मक्या गाडीच्या बॉनेटवरंच ठाण मांडून बसला.

'काय लग्नं, अहो काय डोकं बिकं..' असे सना रागानं म्हणतं असतांनाच डायना अणि प्रिया ने तिचा हात जोरात दाबला.

डोळे मोठ्ठे करत तिने त्यां दोघींकडे बघत 'क्काय ए' असे दबक्या आवाजात विचारले.

तेव्हा तिच्याही पेक्षा दबक्या आवाजात त्या दोघी तिच्या कानात म्हणाल्या 'अगं तुला कळंत नाही का तो पिलेला आहे.. त्याच्याशी काय डोकं लावत बसलीयेस... तो म्हणतो तसं करूया आणि सटकू ईथून पटकन'
बॉनेटवर बसलेल्या मक्याची अजूनही गरीबी, श्रीमंती, माज, पोलिस टेशन अशी निरंतर बडबड चालूच होती.

सना परत मक्याकडे वळून म्हणाली, 'अहो पण मी मुस्लिम आहे. मग कसे करणार मी लग्नं तुमच्याशी?'

'त्यात काय मग सोप्पंय की. मी तीन वेळा कबूल, कबूल, कबूल म्हण्तो तुम्ही बी तीन वेळा म्हणा, झालाच मंग निकाह.
म्हणा की आता माझं झालंय कवच म्हणून'.. मक्या डोळे मोठ्ठे करत मोठ्याने खेकसला.

तसे सना दचकली आणि पटकन डोळे गच्चं बंद करत तिने तीन वेळा 'कबूल, कबूल कबूल' म्हणून टाकले.

'हां हे बेस झालं. आता व्हा बाजूला. ओ गळ्यात क्रॉस वाल्या मॅडम आता तुमची बारी ह्या की फुडं अशा. तुमच्यात काय म्हणत्यात कबूल ला?' सनाला बाजूला सारत मक्या डायनाकडे बघत म्हणाला.

'आय डू!' , डायना रागाने दुसरीकडे बघत म्हणाली.

'काय? आईडू?', मक्याच्या भुवया थेट कपाळभर पसरल्या.

'हो आय डू!' डायना दात ओठ खात म्हणाली.

'हॅ हॅ हे बरंय लग्नालाच आई आणि डू हॅ हॅ हॅ.. बरं ते किती येळा म्हणायचं असतंय?' , मक्या आतून गुदगुल्या झाल्यासारखं अंग घुसळत म्हणाला.

'एकदाच!' डायनाच्या हाताच्या मुठीही एव्हाना आवळल्या गेल्या होत्या.

'एकदाच? मग तर आपलं दोनदा म्हणून झालं की, हे सुद्धा बेस्टंच झालं.
ओ स्लीवलेस वाल्या मॅडम आता तुमचा नंबर, या की जरा फुडं आन जरा अंगभर कपडे घालंत जावा की.
बोला तुमचं काय करायचं?' मक्या एकदम अधिकारवाणीने बोलला.

'माझं काय? मी तर हिंदू आहे. ईथे सात फेरे घ्यायला अग्नी नाही, सिंदूर नाही, गळ्यात घालायला हार नाही. आपले लग्नं नाही होऊ शकत, दोन झाली ना तुमची ती पुरे झाली.' प्रिया ओवरस्मार्ट बनत म्हणाली.

'ओ, मला काय पिलेला समजता काय? आँ? असंच बरं सोडीन तुम्हाला. लगीन व्हणार म्हणजे व्हणारंच त्ये बी आत्ता हिथंच.
हे पहा माझ्या फुटलेल्या कोपराचं रगात, त्येच सिंदूर हाये आणि मी तुमच्या भांगेत भरणार... हा अस्सां
माझ्या हातातला मोगर्‍याचा गजरा हाये ना त्योच घालतो तुम्हाला हार म्हणून... हा अस्सा
आणि माझी पेटलेली बीडी पडलीये ना त्योच हाये अग्नी आपण तिलाच सात फेरे मारू .... धरा माझा हात... हांग आश्शी.
लई ब्येस वाटतंय बघा.. शेवटी ह्या मक्याचं लगीन झालंच आणि त्ये बी तीन तीन...येय येय येय', मक्या एकदम रंगात येऊन स्वतःभोवतीच गिरक्या घेत नाचू लागला.

'अहो झाले ना आता आपले लग्नं जाऊ द्या ना आम्हाला', सना काकुळतीला येऊन म्हणाली.

'होय होय, जावा जावा! मक्या त्याचा शबुद कधी फिरवत नाही. पण आपलं लगीन झाल्याचं ध्यानात ठिवा बरंका....' मक्या एकदम जंटलमन सारखा बोलला.

मक्या बोनेट वरून ऊतरताच मर्सिडीझ सूळ्ळंकन गेली आणि मक्या रस्त्यावरच गिरक्या घेत नाचत राहिला. एवढ्या वेळ रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला हे सगळं नाट्यं आ वासून बघणारा बाबल्या त्याचा फोन नाचवत धावतंच मक्याकडे आला. 'ए मक्या मी तुझ्या लग्नांची व्हेडो कॅसेट बनवली, ए मक्या मी तुझ्या लग्नाची व्हेडो कॅसेट बनवली.'

नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सशल Lol
>>तंदूरी चिकन, फिश फ्राय, खारवलेले नट्स, तिघींकरता स्पेशल म्हणून हेल्दी व्हेज्जीज् आणि योगर्ट डिप आणि हमस, मटण बिर्याणी, तिघींकरता सॅलॅड्स , गज्जर का हलवा आणि ह्या तिघींचा लाडका डेअरी फ्री डाएट चॉकोलेट केक.>> इतकं लिहून अजून कोणीही रेसिपी काय ? यो. जा.टा. , हमस च्या ऐवजी ग्वाक चांगली वाटेल असल्या कमेंंट कशा नाही टाकल्या?

हा सगळा धांगडधिंगा चालू असताना मध्येच त्यांच्या एजन्ट ला आठवण झाली, की इकडे आपण ह्या तिघींनां वठणीवर आणण्यासाठी आलो आहोत. त्याने एकदम स्वतःचा नाच थांबवत तिघींकडे हिंदी सिरीयल्स प्रमाणे तीनदा बघत म्युझिक सिस्टीम कडे एकेक पाऊल जोरात टाकत चालायला लागला.

एजंटची दमदार पाऊले बघून पुढे काय होणार ह्या भितीने तिघींच्या मेंदूवरचे प्रेशर वाढायला लागले. ज्या क्षणी एजंटने झटक्यात म्युझिक सिस्टिमची वायर प्लग मधून खेचली त्यासरशी हेवी मेटलचे संगीत बंद पडल्याने तिघीही मेंदूवरचे प्रेशर वाढल्याने गर्भगळीत होत, आ वासून चक्कर येऊन पडल्या. एजंटला हे अगदीच अनपेक्षित होते. त्याने पटकन तिघिंचा बीपी चेक केला तेव्हा तो अतिशय लो निघाला. मक्या म्हणाला ह्या तिघिंनाही रक्ताची गरज आहे. पण अश्या ठिकाणी आता रक्तं कुठून आणणार ह्या विचारात असतांनाच मक्याने त्याच्या तीक्ष्ण दातांनी मनगटावरची शीर चावली. रक्ताची एक चीळकांडी त्याच्या चेहर्‍यावर ऊडाली आणि दुसर्‍याच क्षणी त्याने मनगटातल्या रक्ताची धार आळीपाळीने तिघींच्या ऊघड्या तोंडात धरली. विषपुत्रं मक्याच्या गरम रक्ताचा स्पर्श जीभेला होताच त्या तिघीही शॉक लागल्याप्रमाणे ऊठून बसल्या. बघणार्‍याला त्या अगदी झोपेतूनच ऊठल्यासारख्या भासल्या असत्या पण त्यांच्या वागण्यात एक सूक्ष्म बदल झाला होता. त्या दर तीन सेकंदानी आपली जीभ सापासारखी बाहेर काढू लागल्या. हो त्या तिघीही हा विषकन्या झाल्या होत्या. मक्याच्या रक्ताने त्यांना नवसंजीवनी दिल्याने त्या आता पूर्णपणे मक्याच्या मांडलिक झाल्या होत्या.
ज्या रात्री मक्याने त्या तिघिंशी लग्न केले लग्नाचा तो मुहूर्त 'सैतानाची लग्नवेळ' म्हणून आधीच कुप्रसिद्धं होता आणि आता ज्या मुहूर्तावर मक्याने त्यांना रक्तं पाजून नवसंजीवनी दिली ती वेळ 'सैतानाला आहुती देण्याची' वेळ होती. साडेसातशे वर्षांपूर्वी पूर्व युरोपातल्या रुमेनियातल्या एका चर्चमध्ये ड्रॅक्युला (ज्याचे खरे नाव ब्रॅम स्टोकर होते) आणि त्याच्या तीन हडळींना तीन अतिशय शूर गावकर्‍यांनी (वॅन हेलसिंग, विक्टर फ्रँकेस्टाईन आणि अब्राहम लिंकन) गावकर्‍यांनी क्रुसावर चढवून मारले होते. तेव्हाच ड्रॅक्युलाने सैतानाची प्रार्थना करीत त्याच्या आत्म्याला पुन्हा
प्रूथ्वीतलावर जन्म मिळण्यासाठी साकडे घातले होते. त्याच ड्रॅक्युलाने मक्याच्या रूपात पुन्हा जन्म घेतला होता आणि स्वतःचे रक्त पाजून त्याच्या तीनही हडळ प्रेयसींनाही त्यांच्या मागच्या जन्माची आठवण करून दिली होती.
ह्या जन्मी मक्याच्या रूपातल्या ड्रॅक्युलाचे केवळ एक आणि एकंच जीवनध्येय होते. आपल्याला आणि आपल्या तीन प्रेयसींना क्रुसावर चढवून ठार मारणार्‍या त्या तीन वँपायर हंटर्सचा बदला. वॅन हेलसिंग, विक्टर फ्रँकेस्टाईन आणि अब्राहम लिंकन ज्यांची ह्या जन्मातली नावं होती बेनेडिक्ट कंबरबॅच , जॉन हॅम आणि फवाद खान.

दुसर्‍याच क्षणी त्याने मनगटातल्या रक्ताची धीर आळीपाळीने तिघींच्या ऊघड्या तोंडात धरली. >>> Lol
बर्गा तुझे चरण कुठे आहेत _/\_ Proud

लोल! भारी चालू आहे ! Rofl

>> बेनेडिक्ट कंबरबॅच , जॉन हॅम आणि फवाद खान
नका हो ह्या तिघांना काही करू Lol They are too handsome to be killed Proud

झाले मग. मक्या उर्फ ड्रॅक्युलाने रक्त पाजताच तिघींना गेल्या हडळजन्मातली आठवणी पुन्हा आल्या!
सुडाने त्या नव्याने पेटून उठल्या .
मग सना बनली सदाफ आणि फवाद च्या मागावर पाकिस्तानात रवाना झाली.
डायना बनली सोफी आणि कंबरबॅच च्या मागे लंडन ला गेली.
प्रिया बनली प्रियांका चोप्रा आणि जॉन साठी अमेरिकेला गेली.

सीन १
सदाफ एका मुशायर्‍याला गेली. तिथे फवाद येणार अशी माहिती मक्याने तिला दिली होती. हातात पुस्तकं घेऊन मुद्दाम लक्ष नाही असं दाखवत दरवाजातून बाहेर यायची आणि फवाद च्या आत येण्याचे टायमिंग बरोब्बर साधत तिने त्याला धडक दिली आणि पुस्तके खाली पाडली. दोघांमधे मेरे महबूब तुझी.... वाला सीन झाला. इथे फवाद चे भावूक डोळे पाहून सदाफ स्वतः लाच विसरली. तिला उठून उभे राह्ता येईना इतके पायातले त्राण गेल्यासारखे फीलिंग आले. जन्मजात प्रेमळ फवाद ने तिला फिल्मी स्टाइल मधे उचलले आणि स्वतःच्या गाडीतून आपल्या घरी नेले.
आणि आपल्या बेड वर झोपवले. असो, पुढचे डीटेल्स अनावश्यक आहेत.

सीन २
विंबल्डन ला टेनिस मॅच सुरु होती. प्रेक्षकांत सुपर्ब फिटिंग चा ग्रे कलर चा सूट घालून स्ट्रॉबेरी अँड क्रीम आपल्या मॅनिक्युअर्ड बोटांनी आणि कमानदार ओठांनी चाटणार्‍या कंबरबॅच वरून तरुणी - स्त्रिया- बायांची नजर हटत नव्हती. पण त्याच्या नजरेला पलिकडच्या स्टँड मधे बसलेल्या आणि नुतकेच स्ट्रॉबेरी चे पैसे देताना भेटलेल्या फ्लोरल लाँग ड्रेस आणि नाजूक हॅट घातलेल्या सोफी शिवाय कुणी दिसत नव्हतं. ही कमाल तिच्या सौंदर्यची होती की सोफीने त्याच्या क्रीम्च्या बोल मधे टाकलेल्या मादक पदारथाची होती ते सोफी आणि कंबरबॅचलाच ठाऊक.
पण इतके सांगता येईल की ते दोघे त्याच्याच जाग्वार मधून त्याच्या घरी जाताना पापाराझींनी पाहिले.

सीन ३
जॉन आणि प्रियांका एका ऑडिशन साठी एले ला एकाच वेळी पोहोचले. प्रियांकाचा लिमो ड्रायव्हर अर्थातच आला नव्हता. मग जॉन आणि प्रियांका जॉन च्याच गाडीने एअरपोर्ट वरून बाहेर पडले. पण ठरलेल्या वेळेला ऑडिशन ला ते दोघेही पोहोचले नाहीत याचा कुणी परस्पर संबंध जोडला नाही.

दरम्यान मक्याने तिघींना स्टेटस अपडेत्ट देत राहण्यास सांगितले होते. तिघींना छोटे मायक्रोफोन पण दिले होते.
पण ... गेले २ आठवडे तिघींनीही काही अपडेट दिले नव्हते. मायक्रोफोन पण बंद असावेत. जणू काही तिघीही पार हरवल्या होत्या!

नाथांची जॅग ( हाय ) न विसरल्याबद्दल धन्यवाद. जरा दोन शब्द त्या से* जॅगबद्दल लिहिले असतेस तर बशीतून हाकललं असतं का तुला Happy

बर्ग - क्या ट्विस्ट है कहानी में ! खतरनाक ....

Happy डोकेबाज लोक...

संयोजक, कधीतरी एखादी गोष्ट खरोखर वास्तववादी लिहायला सांगाकी. मजा येईल.

डोकेबाज लोक...
संयोजक, कधीतरी एखादी गोष्ट खरोखर वास्तववादी लिहायला सांगाकी. मजा येईल.
<<
+१
गेल्या काही वर्षात ऑलऑल मोस्ट दर वर्षीच आपण सगळे व्हँपायर्स, हडळी, मत्सकन्या, रामायण , महाभारत , इ. टाइम मशिन वर सवार असतो, थोडं वेगळं फँटस्यांमधून बाहेर येऊन फॉर अ चेंज रिअ‍ॅलिस्टीक (पण तरीही क्रेझी अर्थात )आवडेल .

संयोजक, कधीतरी एखादी गोष्ट खरोखर वास्तववादी लिहायला सांगाकी. मजा येईल..+१.
तेवढं मनावर घ्या प्लीज.. एखादी वास्तववादी गोष्ट येऊ द्या.

माझ्या मते लोक वास्तववादी लिहिण्यापेक्षा काल्पनिक लिहिणे अधिक पसंत करतात कारण ते जास्त सोपे पडते. तुम्ही STY बघितलीत तर लक्षात येईल कि इथे लिहिणारे क्वचितच इतर सिरीयस वास्तववादी लिखाण करत असतात, ते वास्तववादी STY लिहितील असे वाटते खरच ?

असामी +१
वास्तववादी STY मध्ये मजा येणार नाही आणि लिहिणारे पण फारसे नसतील.

गेले २ आठवडे तिघींनीही काही अपडेट दिले नव्हते. मायक्रोफोन पण बंद असावेत. >> हे लोकांनी फारच सिरियसली घेतलं बहुतेक Proud
मूळ एसटीवाय एकदम वास्तववादी आही की! लोकांनी त्याला कसं वळण द्यायचं हे संयोजक कसं काय सांगणार?
पर्सनली मला पण हे अचाट एसटीवाय बोर होतात.

अरे एस्टिवाय वाचण्यासाठी असतात हे कुणी सांगितलं तुम्हाला Wink ते लिहिण्यासाठी असतात Happy
लिहिणार्‍याला मजा येते गोष्टी कशाही खेचायला. तुम्ही पण लिहून बघा म्हणजे कळेल. फँटसीच लिहा असे काही नाही , काहीही लिहा.

Pages