अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती - आयुर्वेदिक कपडे- भरत.

Submitted by भरत. on 27 August, 2017 - 06:38

रेडियो कमर्शियल

आई गं! वैतागले मी या कपड्यांना!

अगं असं झालं तरी काय?

आता काय सांगू? 10,000 steps a day केलं, आय एफ डाएट केलं, तरी हे कपडे दिवसेंदिवस घट्टच होतात !

अगं, पण तू पलाशचे डिझायनर आयुर्वेदिक 'मेदोहर' कपडे का वापरत नाहीस? त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेटेस्ट फॅशनच्या, आयुर्वेदिक गुणांनी युक्त डिजायनर कपड्यांसाठी आजच भेट द्या पलाश आयुर्वस्त्रम डॉट कॉमला.
वेगवेगळ्या व्याधींवर उपचारांसाठी विविध प्रकारात उपलब्ध.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते. >>> Lol

जमली आहे Happy

भारी Lol
अजुन एक आयडिया - आता कोणीतरी मसाज करणार्या आयुर्वेदिक कपडयाची पण जाहिरात काढा .

मस्त! Lol
इथे खरंच काही लोक निओप्रीनचे बेल्ट / अंतर्वस्त्रे घालतात चयापचय वाढवण्यासाठी.
तुम्ही खुशाल निओप्रीनची आयड्या आयुर्वेदकालापासून आमालाच म्हायती होती असं सांगू शकता. Proud

मस्त Happy

त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होऊन चयापचय क्रिया वेगाने झाल्याने मेदोहरण तर होतेच , शिवाय रक्ताभिसरण सुधारून त्वचाही कांतिमान होते. >>> Lol
जमलीये.

मस्त !