200 रुपयांची नवीन नोट बाजारात आली!

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 August, 2017 - 08:51

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात !

500 आणि दोन हजारानंतर अखेर दोनशे रुपयांची नोटही बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. नव्हे कालपासूनच चलनात आली आहे. आपल्या खिश्यात पोहोचायला जरा वेळ लागेल.

या दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

100 रुपयानंतर थेट 500 आणि त्यानंतर थेट दोन हजाराची नोट, यामुळे या चलनात मोठी तफावत जाणवते. त्यामुळे दोनशे रुपयांची नोट आणली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

200 च्या नोटेची वैशिष्ट्ये:

1) नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो
2) नोटेवर स्वच्छ भारताचा लोगो
3) नोटेचा आकार 66 mm × 146 mm
4) अंधाना नोट ओळखता येणार
5) नोटेवर हिरव्या रंगात ‘RBI’, ‘भारत’, ‘India’ and ‘200’
6) नोटेचा रंग तेजस्वी पिवळा आहे.
7) तुर्तास एटीएममध्ये सुधारणा केल्याखेरीज यात उपलब्ध होणार नाहीत.

याच सोबत 50 रुपयांचीही नवी नोट येणार आहे.
50 रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. तसेच सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.

एखादी नवीन नोट बाजारात आली कि तिचे रंगरूप काय असेल हा सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय असतो. कोणी काहीही म्हणा, आपल्या मालकी हक्काच्या कोरया करकरीत नोटा बघण्यासारखे नेत्रसुख नाही जगात. मनालाही एक थंडावा मिळतो.
आणि म्हणूनच यानिमित्ताने मनात उमटलेले सामान्य प्रश्न -
एखादी नवीन नोट बाजारात येताना तिची डिजाईन कशी असावी हे कोण ठरवते आणि कश्याच्या आधारावर?
देशाच्या करन्सीवर स्थान पटकावने यासारखा सन्मान जगात दुसरा कुठला नसावा. मग ते व्यक्तीसाठी असो वा वस्तूसाठी वा एखाद्या योजनेसाठी.. व्यक्तींमध्ये हा मान वर्षानुवर्षे महात्मा गांधींनाच मिळतो आहे. यावरून वादही बरेचदा होतो. भारतात दुसरा कोणता महापुरुष त्या योग्यतेचा नाहीच का असा प्रश्न बरेचदा उचलला जातो. पण मला वाटते जर एखाद्या नवीन नोटेवर गांधीजींऐवजी दुसरया कोणाला स्थान दिले तर वाद उद्भवतील आणि ते संभाव्य वाद टाळायलाच दुसरा विचारही केला जात नसावा. अन्यथा एकदा का तसे केले तर आमच्या जाती धर्माचा महापुरुष नोटेवर का नाही याची आंदोलने सुरू होतील. अगदी सुपर्रस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांकडूनही तशी मागणी होऊ शकते किंवा परवाचा तो संत बाबा राम रहीम यांच्या भक्तांकडूनही आंदोलन पेटू शकते. त्यामुळे हा निर्णय पटतोच.

पण याऊपर ज्या चिन्हांना आणि योजनांना त्या नोटेवर स्थान दिले जाते ते कोण आणि कुठल्या निकषांच्या आधारे ठरवते? साधे नोटांचा रंग आणि डिजाईन कोणाच्या कल्पक बुद्धीतून निघतो आणि त्याला मान्यता द्यायचा अधिकार कोणाकडे असतो? कारण त्यात कधी काही मतभेद वा वाद झाल्याचे कानावर आले नाही याचेही एक आश्चर्य वाटते.

असो २०० च्या नोटेचे स्वागत ! खूप गरज होती..

-- कोणी तरी नोटेचा फोटो टाकल्यास आवडेल. मी आठवडाभर ताण्त्रिक कारणाने तसे करू शकत नाहीये.
धन्यवाद,

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५५ कोटी मोठे की १५ लाख ???
आणि मी मोदीभक्त आहे असे कुणी सांगितले? जर मी मोदीभक्त असतो तर मी मोहनदास करमचंद गांधी यांचा द्वेष केला असता का? कारण मोदीसुद्धा गांधीप्रेमी आहेत. म्हणून तर 'स्वच्छ भारत' च्या लोगोमध्ये गांधी यांचा चष्मा आहे ना? बाकी मी माझा गांधीद्वेष स्वतःहून प्रकट केलाच नव्हता. अन्य एका आयडीने तसे वक्तव्य केल्याने मी प्रतिसाद दिला.

धागा खूपच भरकटतो आहे, म्हणून त्याला मूळ विषयावर आणण्यासाठी हा प्रतिसाद:
कागदी नोटा लवकर जीर्ण होतात, फाटतात, त्यांचे आयुष्य कमी असते म्हणून मध्यंतरी प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा विचार सुरु होता, त्याचे पुढे काय झाले? खरेतर ही चांगली संधी होती प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची.

अरे पण छोट्या नोटांमुळे भ्रष्टाचार वाढतो ना? ते कुठे गेले हायवे, सर्विस रोड, ऑपरेशन, पेशंट वगैरे बेताल बडबड करणारे...?

डिनॉमिनेशन अर्थात, नोट्/नाण्याचे मूल्य किती असावे, याचे नियमन कसे करतात हे माझ्या काळी प्रायमरी शाळेत शिकवले जात असे.

आमच्या काळी १ पैसा, २ पैसे, ३ पैसे यांचीही नाणी होती, अन त्यांना किम्मत होती. अर्थात, १ पैशाला काही वस्तू विकत मिळत, अन राऊंड ऑफ टू नेक्स्ट रुपया असे होत नसे.

तर,

कमीत कमी नाणी अथवा नोटा वापरून कोणताही आकडा बनवता येईल, व सुट्टेही देता येतील, अश्या किमतीच्या नाणी/नोटा चलनात आणतात, असा तो नियम होता. आजकालच्या हुश्शार जेट ली किंवा उत्सर्जीत पटेलांसारखे डोके त्याकाळच्या लोकांना नसावे, असा अंदाज आहे.

उदाहरण म्हणजे, पूर्वी
१ पै, २ पै, ३ पै, ५ पै, १० पै, २० पै, २५ पै उर्फ ४ आणे, मग डायरेक्ट ८ आणे उर्फ ५० पैसे, अन मग १ रुपया.
यात उगंच बाराण्याचं नाणं कुणी काढलं नव्हतं.
अन याच क्रमाने नोटाही होत्या. त्यात ३ रुपयांची नोट नव्हती. तशीच २५ रुपयांचीही नव्हती.

२००० च्या नोटांचे सुटे देण्याची वेळ ज्यांच्यावर येते, त्यांना या नोटेचा बोजडपणा जाणवतो. तसाच बोजडपणा २०० रुपयांच्या नोटेत आहे. उगंच आम्ही काही नवे करीत आहोत, हे दाखविण्यासाठी,

१. मठ्ठ डिनॉमिनेशनच्या नोटा चलनात येत आहेत.

२. त्याच सोबत नोटांचा आकार आहे त्या एटीएम मशिनीत बसणारच नाही असा आहे.

३. म्हणून या नोटा डायरेक्ट बँकेतूनच मिळतील असा 'फतवा' आहे Lol

असो. दिवाळी येतेच आहे, भक्तांनी या नोटा लक्ष्मीपूजनात ठेवाव्यात असे सुचवितो. Wink

होय...

.
<<
दुर्दैवाने मूळ प्रतिसाद पाहण्यातून सुटला, पण याचे उत्तर द्यावेच लागते.

आधी ४. नंबर अ‍ॅड करतो,

४. अब्जावधी रुपये सामान्यांच्या खात्यातून मिनिमम बॅलन्स नाही म्हणून दंडाखातर चोरणार्‍या बँकांकडे एटीएम मशीन कॅलिब्रेशन करणार्‍या कंपन्यांचे पैसे फक्त काही करोड थकलेत.
>>
पण हे आजकाल नॉर्मल आहे. भक्तांना हे दिसत नाही, अन इतरांना दिसू नये म्हणून स्मोकस्क्रीन्स उभारायची कामे आजकालचे नव"अँटी"बुद्धीजीवी करीत आहेत.. सिमिलर उदाहरण = माणसांची मुले मरतात तेव्हा ऑक्सीजन सप्लायरचे पैसे सरकारकडे काही लाखांत थकलेले असतात, अन त्याच वेळी १०० कोटी रुपये गायींच्या अँब्युलन्ससाठी त्याच सरकारने खर्च केलेले असतात... आता तर "त्या" मुसलमानाविरुद्ध एफायारही दाखल केलाय! Rofl

Pages