अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 26 August, 2017 - 05:46

‘सोन्या हट्ट करू नकोस. आईचं नाही ऐकणार का बाळा?’
‘मी नाही जा'
‘बघ बाबा आले. आता त्यांनाच काय ते सांग'
'काय झालं ग?'
‘बघा ना, सकाळपासून एकच धोशा लावलाय'
'काय झालं रे?'
‘बाबा, मला दूध पाहिजे'
‘दूध? का रे?'
‘आज मी दोन ऋषीकुमारांना कसलंसं चूर्ण दुधात घालून पिताना पाहिलं. बघता बघता ते माझ्यापेक्षा उंच झाले. आता ते मला चिडवून जीव नकोसा करतील. द्या ना मला दूध आणून'
'अरे पण दूधच का हवंय? पाण्यात घालून घे की'
'नाही बाबा. ते चूर्ण दुधातून घेतलं तरच त्याचा परिणाम होतो म्हणे'

वाचलंत? साक्षात चिरंजीवी अश्वत्थाम्याने आपली उंची वाढवायला आमची पावडर वापरली होती. तुम्हीसुध्दा ऋषीमुनींनी सिध्द केलेली, फक्त हिमालयात आढळणार्‍या १०८ वनौषधींनी बनलेली स्वदेशी, सुरक्षित, पूर्ण प्रभावी 'हाईट प्लस' पावडर वापरा आणि फक्त एक महिन्यात २ फुट उंची वाढवा. आजच संपर्क साधा १ ८०० ४२० ४२०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुराणाशी सांगड घालायची छान कल्पना आहे

पण पूर्ण जाहीरात हिंदीत झालीय. पुर्ण हिंदी वा ईंग्लिश नको असा नियम वाचल्याचे आठवतेय. जरा कन्फर्म कराल का..

मी नियम पुन्हा वाचले पण त्यात असा उल्लेख दिसत नाहिये. पण ही साईट मराठी असल्याने भाषांतर करून जाहिरात पुन्हा टाकते. धन्यवाद!

नियम चेक करालच, पण फ्रॅन्कली सांगायचे तर एखादी बॉलीवूड स्टाईल फिल्मी जाहीरात असती तर तिची मजा वाढवायला फिल्मी हिंदीचा वापर योग्य ठरला असता. पण अश्या कल्पनेवर आधारीत जाहीरात मराठीत लिहायला काहीच हरकत नव्हती.
या अपेक्षा सर्वांकडूनच आहेत.
बाकी चूभूद्याघ्या Happy

निर्झरा - चित्र / फोटो तुम्ही स्वतः काढलेले असावे. बाहेरचे चित्र वापरायचे असल्यास ते प्रताधिकारमुक्त असावे लागेल . नाही तर हिम्स्कूल म्हणतात त्याप्रमाणे चित्राशिवाय जाहिरात करता येईलच,
पवनपरी ११ - वर नियम क्र. ५ पहा.
नविन लेखनाचा धागा उघडायला या पानाच्या उजव्या हाताला या ग्रूपमधे नवीन लेखन करा >>लेखनाचा धागा अशी लिन्क आहे ती पहा.
योग - प्रवेशिका मुख्यत्वे मराठी मधे असेल आणि थोडे फार इतर भाषांचे शब्द आल्यास चालू शकेल. संपूर्ण इंग्रजी किंवा संपूर्ण हिंदी टाळावे. >>> संयोजकांची पोस्ट स्पष्टीकरण देणारी

स्वप्ना,
नियमात नाही पण प्रतिसादात ही संयोजकांची पोस्ट सापडली -
"
योग - प्रवेशिका मुख्यत्वे मराठी मधे असेल आणि थोडे फार इतर भाषांचे शब्द आल्यास चालू शकेल. संपूर्ण इंग्रजी किंवा संपूर्ण हिंदी टाळावे.
"

असो, तुमचा जाहीरात मराठीत करण्याचा निर्णय योग्यच. मराठीत अजून काही छान कोट्या सुचू शकतील. ही या भाषेची ताकद आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा Happy

छान !
फक्त एक महिन्यात २ फुट उंची वाढवा. >>> Lol

बाबो
2 फूट
मी येऊ का घ्यायला
सॉलिड लिहिलंय