खडक माळेगाव

Submitted by Khadak malegaon on 24 August, 2017 - 10:30

५.भौगोलिक स्थान :-
खडक माळेगाव भौगोलिक स्थान हे नाशिक जिल्हामध्ये निफाड तालुक्यातील एक गाव आहेत तर निफाड तालुक्यामधील स्थान खडक माळेगाव हे तालुक्या मधील उत्तरेकडील सर्वात शेवटचे गाव आहे ते चांदवड तालुक्याला लागून आहे तर खडक माळेगावचे अक्षवृत्तीय विस्तार 200 16’ 34” उत्तर ते200 20’ 45” उत्तर अक्षवृत्ता पर्यत आहे खडक माळेगावचे रेखावृत्तीय विस्तार 740 20’ 45”पूर्व ते 740 14’ 25”पूर्व या रेखावृत्ता पर्यत आहे तर खडक माळेगावचे क्षेत्रफळ १९६२.१७ हेक्टरअसून पिंपळगाव बसवंत व चांदोरी नंतर निफाड तालुका व तिसरा क्रमांक लागतो खडक माळेगावची दक्षिण उत्तर लांबी 5.1 किलोमीटर असून तर पूर्वपश्चिम अंतर हे 5 किलोमीटर आहे.व समुद्र सपाटी पासून उंची ५४० मीटर आहेत

खडक माळेगावचे शेजारील गावे
पूर्वेकडील गावे : टाकळी ,पिंपळद
नैऋत्य : कोटमगाव
उत्तरेकडील गावे : देवरगाव
आग्नेय : दरसवाडी
पश्चिम : सावरगाव
वायव्येकडील : सारोळे खुर्दे
दक्षिणेकडील : वनसगाव, खानगाव
३) भूपृष्ठ रचना :खडक माळेगाव हे गाव दखनच्या पठारावर असलेले गाव आहेत दख्खन भूपृष्ठ रचना ही हे पठार बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे तर संपूर्ण भूपृष्ठ रचना उंच सखल आहे छोट्या छोट्या टेकड्या भूरूपे आढळतात.
मृदा : खडक माळेगाव मध्ये दोन प्रकारची मृदा आढळते त्याचे प्रकार पुढील प्रमाणे
काळी मृदा २) तांबडी मृदा
काळी मृदा : काळ्या मृदेत लोह आणि प्राणिज घटक द्रव्याचे प्रमाण आहे या घटकामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो तर या मृदा मध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक आहे पावसाळ्यात हि मृदा पाण्याने अधिक चिकट होते उन्हाळ्यात या मृदेला मोठया प्रमाणात भेगा पडतात तर खडक माळेगाव मध्ये या मृदा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झाला आहे गावा मध्ये या मृदाचे क्षेत्र ४२% इतके आहे.
तांबडी मृदा : तांबडया मृदेत लोह मॅग्नेशियम अॅल्युमिनियम या घटक द्रव्याचे प्रमाण अधिक असते तर त्या मृदा मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते तर खडक माळेगाव मध्ये या मृदाचे प्रमाण ५७% इतके आहे

६.हवामान :
खडकमाळेगावचे हवामान हे उष्ण कटिबंधीय प्रकारचे हवामान आहे
हवामानाची स्थिती :- हवामानाची स्थिती ही मोसमी प्रकारची आहेत.
उन्हाळा :- खडकमाळेगाव मध्ये उन्हाळाचा कालावधी हा फेब्रुवारी ते मे पर्यत उन्हाळा पडत असतो तर गावचे वार्षिक सरासरी तापमान 200C ते 320C पर्यत आहे.
पावसाळा :- खडकमाळेगावात पावसाळा ऋतूचा कालावधी जून ते सप्टेबर ह्या कालावधीत होतो हा पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्या पासून पाऊस पडतो खडकमाळेगाव मध्ये वार्षीक सरासरी पर्जन्य हे ५० ते १०० सेमी इतका आहे.
हिवाळा :- खडकमाळेगाव मध्ये हिवाळा ऋतू हा नोव्हेंबर ते जानेवारी असतो तर सरासरी हिवाळ्यात तापमान ०५ अंश सेल्सियस ते १५ अंश सेल्सियस पर्यत असते
७.नदी प्रणाली :
शेलू नदी प्रणाली : उगमस्थान :शेलू नदीचा उगम हा चांदवड येथील सातमाळ डोंगर रांगेत शेलू या गावाजवळ होतो नदीची लांबी साधारणता २२ किलोमीटर असून टी पुढे शेलू, सोग्रस, देवरगाव मार्गे वाहत खडक माळेगाव मध्ये येते खडक माळेगाव मध्ये या नदीवर लघुधरण प्रकल्प आहे.
नदीचा शेवट : हि नदी पुढेजाऊन निफाड मध्ये कादवा या नदीची उपनदी बनते व तिला मिळते.
८.वनस्पती जीवन
खडकमाळेगावचे हवामान हे उष्ण कटिबंधीय आहे व कोरड्या ऋतू मध्ये या वनस्पतीचे उन्हाळ्यात पाने झडतात तर पावसाळ्यात नवीन पाने येतात साधारणता या वनस्पतीची उंची ८ टे १२ मीटर इतकी आढळते
१) बाभूळ : बाभूळ हि वनस्पती काटेरी स्वरुपाची आहे ती खडक माळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
२) कडूलिंब : ही वनस्पती पानझडी स्वरुपाची आहे तिचे गुणवैशिष्टे हि कडू वनस्पती आहे.
३) बोर : हि काटेरी वनस्पती आहे तील फळे येतात.
४) आंबा : हि एक फळझाड वनस्पती आहे.
५) चिंच : चिंच वर्षानुवर्ष वाढणारी वनस्पती आहे
६) घायपत : घायपत हि एक झुडप स्वरुपाची वनस्पती असून जमीन लगत वाढत असते.
९.प्राणी जीवन :
खडकमाळेगाव मध्येपाळीव प्राणी संख्या ३६२३ इतकी असून त्यात गायची सर्वाधिक संख्या आहे १८५८ इतकी आहेत तर बैलाची संख्या ४९५ इतकी आहेत म्हैसची संख्या ७० इतकी आहेत इतर प्राणी १२०० आहेत.

१०.लोकसंख्या रचना
सदर खडकमाळेगावची लोकसंख्या २०११ जनगणनेनुसार ५९०१ इतकी आहे तर गावामध्ये स्री संख्या २८६० असून तर पुरुष संख्या ३०४१ असून सदर खडकमाळेगावची लोकसंख्या घनता ही दर चौरस किलोमीटर ३०० लोक राहतात सदर खडकमाळेगावची लिंग गुणोत्तर ही दर हजारी पुरुषा मागे १००० इतकी आहे तर गावाची साक्षरता ही ८५% इतकी असून पुरुष साक्षरता प्रमाण ९१% व स्री साक्षरता ७९% आहे.
११.वस्ती
सदर खडक माळेगाव मध्ये लोकवस्ती वितरण गावा मध्ये मोठया प्रमाणता लोक वस्ती आहेत.खडक माळेगाव मधील दाट लोकवस्ती, मध्यम लोकवस्ती व कमी लोकवस्ती पुढील प्रमाणे.
दाट लोकवस्ती : खडक माळेगाव मध्ये दाट लोकवस्ती ही गावा मध्ये आढळेत.
मध्यम लोकवस्ती : चांदवड खडक माळेगाव रोड, केद्राई कॅनॉल परीसर वसेवाडी, ओझरखेड कॅनॉलचा पूर्वेकडील परीसर, टाकळी रोड,शिंदे वस्ती इ.परिसरात लोकवस्ती मध्यम आहेत.
कमी लोकवस्ती : सावरगाव शिवार,शेलू नदीचा पश्चिमेचा परीसर, माळेगाव धरण परीसर कमी लोकवस्ती चा आढळतो.

१२.मानवी व्यवसाय :
सदर खडकमाळेगावचे प्रमुख तीन व्यवसाय चालतात.
प्राथमिक व्यवसाय :
हा व्यवसाय संपूर्णता निसर्गावर अवलबून असणारा व्यवसाय आहेत हा व्यवसाय मानवी श्रमावर अवलबून असतो तर सदर खडकमाळेगाव मध्ये प्राथमिक व्यवसाय सर्वाधिक चालणारा व्यवसाय आहे (शेती ) या व्यवसायाचा सर्वाधिक विकास झालेला आहे तसेच पशुपालन केले जाते त्यातून दुधाचे उत्पादन घेतले जाते.सदर खडक माळेगावचे संपूर्ण अर्थकारण या व्यवसायावर अवलंबून आहेत.

द्वितीय व्यवसाय :
खडकमाळेगाव मध्ये हा व्यवसाय फारसा दिसत नाही तरी ग्राम कुटीर उद्योग शेतीस अवजारे बनवणे असे उद्योग आहेत तर कुटीरउदयोग :- २ इतके आहेत तर त्याच प्रमाणे अन्न प्रक्रिया उदयोग थोड्या प्रमाणात आहेत तर अन्न प्रक्रिया उदयोग : ३ आहे
तृतीय व्यवसाय :
खडकमाळेगाव मध्ये तृतीय व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो खडकमाळेगाव मध्ये शिक्षण सेवा,वैद्यकीय सेवा,व्यापार सेवा,संदेशवहन सेवा, बँकिग सेवा, दूरध्वनी सेवा या खडकमाळेगाव मध्ये आहेत एकुण ३ बँक व ४ दवाखाने, १ पोस्ट ऑफिस तसेच व्यापर पण चालतो.

१३.शेती
सदर खडकमाळेगाव मध्ये शेती हा व्यवसाय गावचा प्रमुख व्यवसाय आहेत.त्याचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे फळबागा, भाजीपाला,धान्यपीक इ.प्रकारची पिके घेतली जातात.
द्राक्षे : खडकमाळेगाव मध्ये द्राक्षे या फळपीक उत्पादन हे व्यापारी तत्वावर घेतली जाणारे पीक आहेत या पिका खाली सर्वाधिक क्षेत्र आहेत. उच्च तंत्रज्ञानचा आधारे द्राक्षेचे उत्पादन घेतले जाते परंतु मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते फळकाढणी ही जानेवारी ते मे महिन्या पर्यंत असते व द्रक्षेची मोठया प्रमाणात विदेशात निर्यात केली जाते द्राक्षाचे उत्पादन मुख्यत्वे दोन प्रकारात घेतले जाते १)टेबल ग्रेप्स २) वाईन ग्रेप्स
कांदा : खडकमाळेगाव मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते कांद्याची लागवण हंगामी सप्टेबर ते जानेवारी पर्यंत चालते उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच लाल कांदा उत्पादन घेतले जाते.
मक्का :
खडकमाळेगाव मध्ये मक्काचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच मक्का हे पिक जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात घेतले जाते खरीप हंगामात या पिकाची निवड केली जाते .
सोयाबीन :
खडकमाळेगाव मध्ये सोयाबीन उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होते
तेलबियाणे असल्यामुळे ते खरीप हंगामामध्ये त्याचे उत्पादन घेतले जाते.
टोमेटो :-
टोमेटो हे एक भाजी पिक असल्यामुळे त्याचे उत्पादन खडक माळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
तसेच इतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व इतरही पिके गहू हरभरा, मिरची, डाळीब इ. पिकाचे उत्पादन घेतले जाते. करतात .
.सिंचन सुविधा :
खडक माळेगाव मध्ये सिंचन सुविधा ह्या चांगल्या आहेत सिंचन प्रमुख स्रोत नद्या,धरण,बंधारे,तलाव,विहिरी,कालवे,शेततळे,बोअरवेल इ. प्रमुख सिंचन सुविधा आहेत तर यात. विहिरी ८५४, शेततळे १८०, बोअरवेल ५०८, बंधारे १०, नदी २, धरण १, कालवे २, तलाव १ इतके सिंचन सुविधा उपलब्ध झाले आहेत
विभाजित वर्तुळ :-

शेतीची समस्या
वारस हक्क मुळे खडक माळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडीकरण आढळून आले आहेत त्यामुळे जमिनीचे आकारमान लहान होत चालले आहे.
खडक माळेगाव मध्ये उत्पादित होणारा कृषी माल बाजारपेठेत नेले वर त्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यास उत्पादनासाठी केलेला खर्चास पूर्ण मोबदला मिळेनासे झाले आहे .
खडकमाळेगाव दुष्काळ भागत येत असल्यामुळे तेथे डिसेंबर ते मे पर्यंत पाण्याची मोठी समस्या जाणवते.
खडकमाळेगाव मध्ये जलसिंचनाचे स्रोत मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तेथील भूजल पातळी ही खालावत आहे जमिनीची भूजल पातळी खाली गेली आहे.
१४.वाहतूक व दळणवळण
खडक माळेगावला तालुका शहर जिल्हा शहर व बाजारपेठ इ.ठिकाणाला गावाला रस्त्याने जोडले आहेत.

प्रमुख रस्ते
खडक माळेगाव ते लासलगाव
खडक माळेगाव ते सोग्रस
खडक माळेगाव ते नाशिक
खडक माळेगाव ते निफाड तसेच जवळच्या गावांना रस्त्याने जोडले आहे.
खडक माळेगाव ते टाकळी
खडक माळेगाव ते पिंपळद
खडक माळेगाव ते सारोळे खुर्दे
खडक माळेगाव ते देवरगाव
अशा प्रकारे वाहतूक मार्ग जोडले आहेत.

१५.दळणवळण
या गावामध्ये दळणवळणाच्या सोयी चांगल्या प्रमाणात आहेत त्यामध्ये पोस्ट टेलिफोन ऑफिस ई. दळण वळणाच्या सुविधा आहेत

१५.ग्रामप्रशासन :
खडक माळेगावचे ग्रामप्रशासन हे पंचायत व्यवस्थेतील ग्रामपंचायत द्वारे चालवले जाते ग्रामपंचायत प्रमुखास सरपंच म्हटले जाते.तर उपप्रमुखास उपसरपंच म्हटले जाते.सरकारी कर्मचारी असतो त्यास ग्रामसेवक म्हणतात. खडक माळेगावची ग्रामपंचायत स्थापना ही १९५०मध्ये झाली
ग्रामपंचायत पद प्रमुख
सरपंच : बाळासाहेब बाबुराव रायते
उपसरपंच : रंजना तानाजी शिंदे
ग्रामसेवक : कैलास बेंडके
एकुण ग्रामपंचायत सदस्य संख्या १५ आहे तसेच ग्रामपंचायत तर्फे पुढील समितीचे कार्य पाहिले जाते.
१.ग्रामसुरक्षा दल
२. न्याय पंचायत
३. ग्रामशिक्षण समिती

महसूल प्रशासन :
तलाठी चे कामे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या आदेशानुसार महसूल विषयी व नियोजन कार्यक्रम व इतर सोपविलेली कामे पाहणे हे काम तलाठी करतो .

१६.आरोग्य
सदर खडक माळेगाव मध्ये आरोग्य सुविधा सरकारी आरोग्य उपकेंद्र आहेत व नवीन आरोग्य केंद्र सदर खडक माळेगाव मध्ये होत आहेत व खाजगी आरोग्य सुविधा खडक माळेगाव मध्ये ४ खाजगी दवाखाने आहेत.
१७.शिक्षण
सदर खडक माळेगाव या गावामध्ये शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत सादर गावात पहिली ते चौथी जी.प शाळा आहेत तर पाचवी ते दहावी उच्च माध्यमिक शाळा उपलब्ध आहेत व संपूर्ण मुले हि गावातील शाळेत आपले शिक्षण पूर्ण करतात
सदर खडक माळेगाव मध्ये शिक्षण सुविधा खालील प्रमाणे आहेत.
अंगणवाडी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्या:२५९
रायते वस्ती प्राथमिक शाळा वसेवाडी विद्यार्थी संख्या : २०
नुतन विदयालय खडक माळेगाव विद्यार्थी संख्या:६०१

१८.मनोरंजन :
खडक माळेगाव मनोरंजन म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते द्राक्ष बागा पाहणे तसेच जानेवारी फेब्रुवारी मध्ये खडक माळेगाव मध्ये ग्राम देवता हरीबाबाची मोठी यात्रा भरते तसेच पोळा, दसरा, दिवाळी, होळी, गुडीपाडवा हे सण मोठ्या प्रमाणात साजरे

१९.निष्कर्ष
सदर खडक माळेगाव या गावाचे सर्वेक्षण केले असता असे आढळून आले कित्या ठिकाणीची भूजलपातळी खालावली आहे . त्यामुळे विहिरी व कूपनलिका या मुख्य सिंचन स्रोत चे जानेवारी ते मे महिन्यात पाणी कमी पडते . त्यामुळे पाण्याची मोठी समस्या जाणवते .
सदर या गावा मध्ये आधुनिक तंत्रज्ञान चा वापर मोठया प्रमाणात केले जाते.
सदर या गावात शेततळी ची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते . त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा वापर हा द्राक्ष बागा ना पाणी देण्यास उपयोगी ठरते .
सदर गावामध्ये पडीक जमीन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आढळून येते .
सदर गावामध्ये द्राक्ष पिकास मोठ्या प्रमाणात बेसुमार औषधे व रासायनिक खते यांचा वापरा मुळे हवा प्रदुषण व जल प्रदूषण होते तर मृदेची प्रत खालवते
सदर गावामधून ओझरखेड कालवा जात असल्यामुळे या गावातील शेतीला पाणीपुरवठा होतो .
२०. शिफारसी:
गावातील तरुण वर्गाने द्वितीय व्यवसायात गुंतवणूक करने
(२) पारंपरिक शेती व्यवसाय टाळणे
(३) व्यापारी तत्वावर व तांत्रिक पद्धतीने शेती करणे

२१.संदर्भ सुची
सदर खडकमाळेगाव या गावाचा सर्वेक्षण अहवाल तयार करत असताना संदर्भ सूची पुढील प्रमाणे
१.लोकसंख्या
२.ग्राम प्रशासन
३.लोकसंख्या घनता
४.लिंग गुणोत्तर
५.साक्षरता
इत्यादी माहिती ग्रामपंचायत कार्यलयातून मिळवली तसेच
१.पीक पद्धत २.सिंचन सुविधा ३.व्यावसाय ४.गावाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती तलाठी कार्यलयातून घेतली
वाहतूक व दळणवळण –प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली .
लोकसंख्या : ग्रामपंचायत
हवामान विषयक माहिती : www.accuweather.com
वनस्पती अभ्यास मृदा अभ्यास –प्रत्यक्ष भेट देवून माहिती मिळवली
अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार: गुगल map
सदर माहिती लिहिताना आर्थिक भूगोल (S.Y.B.A ) कृषी भूगोल (T.Y.B.A) भारताचा प्रादेशिक भूगोल या पुस्तकाचा माहिती तयार करताना आधार घेतला.

aaaaa
खडक माळेगाव धरण

Group content visibility: 
Use group defaults