केली होती तपश्चर्या काहीतरी मिळवाया आज आहे शाप, तेव्हा वरदान जे भेटलेले

Submitted by निखिल झिंगाडे on 23 August, 2017 - 09:26

दुःखाच्याच सावलीत आयुष्य फुललेले
सुख आहे जिवनात काट्यात खोचलेले

केली होती तपश्चर्या काहीतरी मिळवाया
आज आहे शाप, तेव्हा वरदान जे भेटलेले

राग आला वाटले सोडूनी तुला आज जावे
आज नाही गाव माझे जे माझेच वाटलेले

कोसळलेच नाही जे येथे गर्जून आज गेले
आमने सामने सारे आले मेघ दाटलेले

रस्ता आहे चांगला गतिरोधकच फार होते
उडायाचे होते मला पंख का तू छाटलेले

Group content visibility: 
Use group defaults