शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 August, 2017 - 07:54

मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे.
तर!!! मी आठवड्यातले पाच दिवस रिकामटेकडाच असतो.पुर्वि मित्र असायचे त्यांच्यामुळे वेळ जायचा .पण सातारा एमआय्डीसीचे बारा वाजल्याने बरेच मित्र पुण्यात व काही परदेशात आहेत.इंटरनेटचे मला खूप आकर्षण होते ,अजुनही आहे.सुरवातीला वेळ चांगला जायचा नेटमुळे पण सध्या माझा वेळ जाता जात नाही.घर खायला उठते.बाहेर बोंबलत कीति फिरनार ,मग नेटवर काही कुचाळक्या करणे,एकटाच ट्रेकला जाणे असले खर्चिक उद्योग करत बसतो.माझे हे उद्योग आता खिशावरही ताण टाकत आहेत.माझे दिवसाला दहा सिगरेटचे प्रमाणही जैसे थे आहेच.(यावर एक धागा काढला होता)
मला काम करायचे आहे ,असे काहीतरी काम ज्याने वेळ जाईल आणि बर्यापैकी पैसे मिळतील.व नवीन मित्र जोडता येतील.पण मला सोशल फोबीया आहे,म्हणजे मला कामाच्या ठीकाणी भीती वाटते,मुल्यांकनाची(performance anxiety)प्रचंड भीती वाटते.पण यावर ट्रीटमेंट चालू असल्याने यावर कंट्रोल आहे.माझे शिक्षण बीएस्सी इतके झाले आहे.वय तीस आहे.
तर काय करता येईल मला?
पब्लिक रिलेशन जॉब अर्थातच नकोय. असे कोणतेतरी काम मला सूचवा जेणेकरुन् महीण्यातले वीस बाविस दिवस बसून राहणे कमी होईल.व्यवसाय सूचवला तरी चालेल.धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मते एकदम डीरेकट एखादा व्यवसाय करण्यापेक्षा तुम्हाला ज्याची आवड आहे / गती आहे /काय करायला जमेल ते विचारपूर्वक ठरवून त्याची फ्रेंचाईझ घ्यायचा प्रयत्न करा अर्थात त्याकरता डिपॉझिट ला पैसे घालण्याची तयारी ठेवावी लागेल . फ्रेंचाइझ घेताना विचारपूर्वक व्यवसाय निवडावा . तुमच्या शेतीला पूरक असेल तर फारच उत्तम . कुठल्याही व्यवसायाची फ्रेंचाईझ घेताना त्यांच्या अटी नियम व्यवस्थित तपासून घ्या . बाकी मायबोलीकरांच्या शुभेछा तर कायम सगळ्यांच्या पाठी असतातच Happy

सिंजी,
गेल्याच आठवड्यात मी एक बातमी वाचली होती. एका शेतकर्‍याने वेगवेगळे प्रयोग करून एकरी २.५ लाख उत्पन्न मिळवल त्याची. (त्यांची एकंदर ६ एकर जमीन होती). हे उत्पन्न नक्कीच उसापेक्षा जास्त. तुमची तर कृष्णा काठची जमीन. करा की प्रयोग. सुरवात एका एकरा पासून करा. जमल तर वाढवा. उसामुळे तुम्हाला रिकामेपण आलय. ते बदला. शेती करायची नसेल तर जोड धंदे आहेत.
त्यातून दुसर काही करायच असेल तर कशाची आवड आहे, कसला कोर्स करता येइल का बघा. ज्याचा उपयोग काही व्यवसाय चालू करण्यास होइल. (पण खायला आवडते म्हणून हॉटेल काढू नका एकदम). Happy
माझे जे वाईचे मित्र आहेत त्यातील बर्‍याच जणांची शेती बरोबर दुकाने आहेत. (कपडे, अवजारे, बियाणे, किराणा ). एकतर प्रोफेसर झाला.

तुम्हाला शुभेच्छा.

इस्टेट एजंट व्हायला जमेल का..?
हा व्यवसाय दुय्यम व्यवसाय म्हणून करायचा असेल तर किती वेळ करायचा हे बहुतांशी आपल्या हातात राहू शकतं..
वेळाही फ्लेक्झीबल राहू शकतील..

इंट्रा डे शेयर ट्रेडिंग करा... इनतेरेस्टिंग आहे .. आणि जर क्लीक झाले तर सिगरेट चे पैसे सुटतील नक्कीच दिवसाचे..

शेतात सोलर पॅनेल बसवा आणि वीज मंडळाला वीज विका.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 23 August,>>>>>>
>>मी सोलर पॅनल बसवून काय फाक्या मारत बसू का रानात??
माझा वेळ जावा आणि चार पैसे गाठीला जमावेत ,थोडं समाजकार्य करायला मिळावे या उद्देशाने धागा काढला आहे.कंटेंट पुर्ण वाचून प्रतिसाद द्यावा.

इंट्रा डे शेयर ट्रेडिंग करा... इनतेरेस्टिंग आहे .. आणि जर क्लीक झाले तर सिगरेट चे पैसे सुटतील नक्कीच दिवसाचे..
नवीन Submitted by च्रप्स on 23 August, 2017 - 09:34
इंट्रा डे शेयर ट्रेडिंग करा..
>>
या बद्दल अधिक माहीती कुठे मिळेल? >>> सिंजि, ह्यात पडू नका असे म्हणेन. हातात असलेली कॅश सुद्धा जाण्याची रिस्क आहे.
ईंट्रा डे ट्रेडिंग शेअर्सच्या फंडामेंटल नाही तर टेक्निकल अ‍ॅनालिसिस वर बेस्ड असते. मोठ्या काळाचा अभ्यास आणि अनुभव असल्याशिवाय ह्यात हात घालू नये आणि लिक्विडिटी ईशू असल्यास तर आजिबातंच नाही.

तुम्ही शहरात रहात असल्याने किराणा दुकान ही त्यातल्या त्यात सेफ आणि सोपी संधी आहे. घराचाच वापर दुकान म्हणून करू शकता.
किंवा गाळा भाड्याने घेवून जुजबी जुने फर्निचर विकत घेवून चालू करू शकता. ईंटरनेट वरून देशीय मार्केटमध्ये कमॉडिटी च्या वरखाली होणार्या किंमतींवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे आगाऊ माल कमी किंवा जास्तं विकत घेवू शकता.
ऊदा. पंजाबात पावसाचा प्रॉब्लेम झाला किंवा ट्रक वाल्यांचा संप झाला की महाराष्ट्रात महिन्याभरात आटा, बेसन, चना अश्या मालाच्या किंअती वाढू लागतात. साऊथमध्ये काही झाले की तांदळाच्या किंमती अ‍ॅफेक्ट होतात. एमपी वगैरे मधून पल्सेस येतात त्यांच्यावरही लक्ष ठेवू शकता.
तुमच्या ऊसामुळे साखरेच्या मार्केट मधली माहिती ही तुम्हाला मिळू शकते. अशी तेजी मंदी होलसेल लेवल वर कॅप्चर करून तुमच्या रिटेल प्राईसेस एरियातल्या ईतर पारंपारिक दुकानदारांपेक्षा काँपिटिटिव थेऊन तुम्ही कस्टमर बेस वाढवू शकता.
तुम्हाला शुभेच्छा!!

You can start coaching classes. It can be done at home. Company of kids keep you fresh and dynamic, happy and lot of positivity. Hardly any investment and lot of profit. As a social work you can teach some deserving kids at lesser fees or no fees.

ट्विटरवर भक्तांची पेड आर्मी जॉईन करता येते आहे का बघा. वेळही जाईल, आणि चार पैसेही गाठीला लागतील.
नवीन Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2017 - 10:30
>>
केली तरी ते वर्च्युअल इंटरॅक्शन ठरेल ना! मला माझा सोशल फोबिया घालवण्यासाठि डॉक्टरने एक्सपोजर थेरपी सांगितली आहे.
बर्ग ,विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.

वेमा,मायबोलीवर् जरा अडचण येतेय .मी जो ब्राऊजर वापारतो त्यावरुन .म्हणून ललितमध्ये धागे काढत आहे.पुढच्या वेळेस लक्षात ठेऊन वेगळा ब्राऊझर वापरुन बघेन.

सिंजी पॉलीहाऊस/ शेडनेट , त्यातली माहिती मिळवुन चालु करा आणि इतर शेतकर्‍यांचं प्रबोधन करा , ठिबक सिंचनाच महत्व लोकांना पटवुन देण्याचा प्रयत्न करा ( जरी कृष्णामाई भरपुर पाणी देत असेल तरी ), ऑरगॅनिक शेतीच महत्व पटवुन द्या , त्यासाठी गावोगावी जाऊन लोकसंपर्क वाढवा.

Fulsheti kinva mushroom ch peek gheta yeil.. greenhouse gheun rope vadhvun viku shakta...kahich nahi tar shramdan karu shakta social kamasathi...

अगरबत्ती बनवणे, साबण चुरा किंवा व डया बनवण्याचे युनिट टाका. सर्व रॉ मटेरिअल सरळ उपलब्ध असते. व चांगले मार्जिन आहे. मोठ्या रूम मध्ये करता येते. लेबर लावून करून घ्या. मार्केटिंग करून आजू बाजूच्या गावात विका.

{{{ >>मी सोलर पॅनल बसवून काय फाक्या मारत बसू का रानात??
माझा वेळ जावा आणि चार पैसे गाठीला जमावेत ,थोडं समाजकार्य करायला मिळावे या उद्देशाने धागा काढला आहे.कंटेंट पुर्ण वाचून प्रतिसाद द्यावा. }}}

ह्या असल्या उर्मट प्रत्युत्तरांमुळे तुम्हाला मदत केल्याचा पश्चात्ताप केल्याची वेळ आणता. सोलर पॅनेल बसवलं म्हणजे तुम्हाला काहीच काम राहणार नाही असे वाटते का? आधी ते पॅनेल बसविण्याकरिता अर्ज द्यावा लागेल. मंजुरी मिळाल्यावर पॅनेल बसवतानाही तुम्हाला देखरेख करावी लागेल. त्यानंतर वीजमंडळालाच्या ग्रीडमध्ये जोडणी, पुन्हा त्याचे पैसे वळते करुन घेण्याकरिता फॉलो अप यात तुमचा चिकार वेळ जाईलच की.

मी सोलर पॅनल बसवून काय फाक्या मारत बसू का रानात?? >>>>> Lol सॉरी पण राहावलेच नाही हसल्याशिवाय...

मला वाटते तुम्ही आधी स्वत:शी प्रायोरीटी क्लीअर करा. वेळ घालवणे, समाजकार्य करणे, पैसा कमावणे या तिघांना एक क्रम द्या. वेळ घालवणे प्लस समाजकार्य असेल आणि पैसे मिळालेच पाहिजेत असा हट्ट नसेल वा गरज पडल्यास पदरचे चार पैसे घालायची तयारी असेल तर वेळ पुरणार नाही ईतक्या समाजकार्याची गरज आहे समाजाला..

जर पैसा कमावणे हे गरजेचेच असेल तर उगाच आपल्याच मनाचे समाधान करायला त्यात समाजकार्याला वगैरे आणू नका. पैसा कमावणे आणि त्यावर नियमित कर भरणे यापेक्षा चांगले दुसरे समाजकार्य नाही जगात.

पैसा समाजकार्य दोन्ही दुय्यम आणि पैसे खर्च न करता चांगला वेळ जावा अशी अपेक्षा असेल तर छंद जोपासा.

सगळंच थोडं थोडं हवे असेल तर एक पटकन सुचणारा व्यवसाय - लायब्ररी काढा. झालेच तर पाच पैसे सुटतील. नाहीच तर वाचनात आपलाच छान वेळ जाईल. गोरगरीबांना फुकट वाचायला द्या. पुण्यही मिळेल. आणि वाचलेच चार जणांनी तरी कुठे पुस्तक लगेच झिजतेय..

जर कॅरम खेळायची आवड असेल तर बैठ्या खेळांची जिम सुद्धा चालू करू शकता...
ईण्टरनेटची आवड आहे म्हणता तर दोनतीन कम्प्युटर घेत कॅफे चालू करू शकता..

तुमचे वेळ सकारात्माक आणि भरीव कामासाठी जाणे तसेच गर्दीचा फोबिया जाणे आणि पैसे येणे ह्यासर्वाचा सुवर्ण मध्य म्हणजे कृषी पर्यटन – एक शेती पुरक व्यवसाय हे योग्य ठरेल असे वाटतेय
पहा विचार करून ,
http://kissanstory.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0...

इ सेवा केंद्र काढून बघा. लोकांना अाॅनलाइन तिकीट बुक करुन देणे, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लाईसन्स साठी appointment घेऊन देणे, online सातबाराचा उतारा काढणे, लाइटबिल भरून देणे अशी अनेक कामे करता येतील.
जमल्यास सोबतीला scanning, printing, Xerox machine पण ठेवा.
यातून तुम्हाला लोकांशी होणारे interaction वाढेल, त्याचा तुम्हालादेखील फायदा होईल.

राहुल१२३,

त्यांना नेटपासून लांब राहता येईल असा उपाय सूचवा.

तुम्ही जो उस पिकवता त्याचे काय करता? म्हणजे स्वतः घरी खाता(क?) की बाहेर साखर कारखान्याना देता?

त्या कारखान्यांचे उत्पादन काय काय आहे? गुळ,काकवी, साखर? तुम्ही ह्याची डिलरशिप घेउ शकता का?
शेतीसाठी लागणारी खतं? बीयाणं ह्याचा जोडधंदा इतर गावात जावून, किंवा कच्चा माल उपल्ब्ध करून देणे दुसर्‍याना, बँकेत लोकांची पॉलीसी करून देणे(पॉलीसी एजंट - ह्यात काय ज्यास्त सोशल वाटले तरी तुमचीच आजूबाजूची लोकं आहेत...).
एखादे ग्रोसरी दुकान, लहान मुलांना शिकवायची आवड असल्यास शिकवणी,
सर्व तुमच्यावर आहे..

मला ऋन्मेशचा प्रतिसाद आवडला.

पुढे शिक्षण घेणे किव्वा तुम्ही घेतलेले शिक्षण/ अनुभव लोकान्ना देणे हा पण एक पर्याय आहे....

सिंजी तुम्ही तुमच्या गावात वा आसपास च्या गावात वेगवेगळे शेती रीलेटेड, किंवा अजुन वेगळ्या विषयावरचे इव्हेंट ऑरगनाईज करु शकता.नविन मित्र मैत्रीणी पण मिळतील.लोक संपर्क वाढेल.४ दिवस कार्यक्रम/ प्रदर्शन/संपला की ब्रेक घेऊ शकता.परत नविन काहीतरी सुरु करु शकता.

इथले काही काही प्रतिसाद पाहून जाम हसू येतय. आमच्या वड्डी गावात इवेन्ट ऑर्गनाइज करणे, बीयाणाची एजन्सी, काकवीची एजन्सी (??) असे सल्ले दिले तर मला कृपामयी इस्पितळ (येड्यांचा दवाखाना) मध्ये स्वत:च्या खर्चाने टाकतील.

तुम्ही जो उस पिकवता त्याचे काय करता? म्हणजे स्वतः घरी खाता(क?) की बाहेर साखर कारखान्याना देता? >>> Biggrin , अहो ३-४ एकर ऊस घरी कसा खातील ?

सिंजी
मग तुम्ही राजकारणाचे इव्हेंट ऑरगनाईज करा.हाकानाका. Proud

Pages