भवताल निनादत होते

Submitted by अनन्त्_यात्री on 18 August, 2017 - 01:38

शब्दांचे इमले रचता
रचता मी इथवर आलो
पण वीट वीट कोसळता
नि:शब्द, खोल मी उरलो

त्यावेळी जखमी अवघे
भवताल सोबती होते
विझत्या शब्दांच्या संगे
झिन झनन निनादत होते

शब्दांच्या विझत्या ज्योती
उतरती गडद डोहात
तरि नाद कुठुन हे येती
जणु पैंजण रुणझुणतात

-मी काठावर, की मीच खोल डोहात?
-की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults