पाउस

Submitted by मी मीरा on 16 August, 2017 - 07:12

ऋतू माझा
नभी काळोख दाटला, दाटला मनी विचार
अंतरंगी खुलून गेले, स्वप्न निराळे साचार
संपला जणू चातकाचा, प्रतीक्षेचा पहारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

सुकली होती वृक्षांची खोड आणि साली
वाट पाहती सारीच पक्षी आणि वेली
साद देते कोकीलाही, दूर करण्या उन्हाचा मारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

येणार नवी पालवी, होणार ओली माती
झेलून घेतील दवहि मग, ओली गवताची पाती
हेच तर सांगत सुटलाय मंद थंड वारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

ओली ती पायवाट, हिरवी ती रानमाळ
शेतकऱ्याचा भविष्याचा, हाच तर सुखाचा काळ
बहरेल निसर्ग हा, खुलेल आसमंत सारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

देईल गती नदीला, होईल मोठा झरा
वाढेल पातळी पाण्याची, तलावात हि जरा
पाहू सखी आपणही या नयनी हा नजारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋतू माझा
नभी काळोख दाटला, दाटला मनी विचार
अंतरंगी खुलून गेले, स्वप्न निराळे साचार
संपला जणू चातकाचा, प्रतीक्षेचा पहारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

सुकली होती वृक्षांची खोड आणि साली
वाट पाहती सारीच पक्षी आणि वेली
साद देते कोकीलाही, दूर करण्या उन्हाचा मारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

येणार नवी पालवी, होणार ओली माती
झेलून घेतील दवहि मग, ओली गवताची पाती
हेच तर सांगत सुटलाय मंद थंड वारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

ओली ती पायवाट, हिरवी ती रानमाळ
शेतकऱ्याचा भविष्याचा, हाच तर सुखाचा काळ
बहरेल निसर्ग हा, खुलेल आसमंत सारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा

देईल गती नदीला, होईल मोठा झरा
वाढेल पातळी पाण्याची, तलावात हि जरा
पाहू सखी आपणही या नयनी हा नजारा
आला ग आला ऋतू माझा, पाऊससरी अन गारा