स्वातंत्र्य माझे

Submitted by शिवाजी उमाजी on 15 August, 2017 - 04:00

स्वातंत्र्य माझे

उगा देशभक्तीचा आव आणु कशाला
विकले आहे स्वातंत्र्य माझे जगाला !

मारतो जरी रोजच बढाया कर्तृत्वाच्या
घरचेच करतात हो विरोध विरोधाला !

नाही भिती जेवढी परक्यांची इथे, मात्र
कमजोरी समजली आहे शेजाऱ्याला !

कसले स्वातंत्र्य? घेवुन बसलो आम्ही
आपसात न जमला एकोपा आम्हाला !

येणार का ईतक्यात येथे बदलांचे वारे
करतोय नुकतेच पार आम्ही सत्तरीला !

शिस्त एक पाळोनी घालवून भ्रष्टाचारा
होईल थोर राष्ट्र पाळता प्रमाणिकतेला !

© शिवाजी सांगळे
मो.+91 9545976589
http://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t29299/new/#new

Group content visibility: 
Use group defaults

उगा देशभक्तीचा आव आणु कशाला
विकले आहे स्वातंत्र्य माझे जगाला !
मारतो जरी रोजच बढाया कर्तृत्वाच्या
घरचेच करतात हो विरोध विरोधाला !
नाही भिती जेवढी परक्यांची इथे, मात्र
कमजोरी समजलीच आहे बांधवाला !
कसले स्वातंत्र्य? घेवुन बसलो आम्ही
आपसात न जमला एकोपा आम्हाला !
येणार का ईतक्यात येथे बदलांचे वारे
केलेय नुकतेच पार आम्ही सत्तर वर्षाला !
शिस्त एक पाळोनी घालवून भ्रष्टाचारा
होईल थोर राष्ट्र पाळता प्रमाणिकपणाला !

अलामती मध्ये बदल करता येईल काय?

निखिलजी धन्यवाद,
गझलच्या तांत्रिक बाबी हळूहळू समजून घेत आहे, आपण जरूर मार्गदर्शन करावे.

छान लिहिता आपण, मी ही नवीनच आहे, भूषणजींचे (बेफी) गझल परिचय वाचा सुंदर सोपे आहे तंत्र समझन्यासाठी