Submitted by ननि on 12 August, 2017 - 12:01
नमस्कार,
मला गेल्या १ वर्षापासून व्हर्टीगो चा त्रास चालू झाला आहे. सुरवातीला MBBS , नंतर MD, famous MD, neurologist , न्यूरोसर्जन झाले. पित्ताने , लो शुगरने चक्कर येते असे करत neurologist ने सांगितले की कानाचा प्रोब्लेम आहे. त्या टेस्ट केल्यावर त्या नोर्मल आल्या. तेव्हा ते डॉ. म्हणाले रिपोर्ट मध्ये येत नाही. पण हा कानाचाच प्रोब्लेम आहे. आयुश्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. तर असा कोणाला त्रास झाला होता का? कोणाला काही अनुभव आहे का? की हळूहळू त्रास कमी होतो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
part of the family heirloom
part of the family heirloom
मला नोव्हेंबर 2019 पासून
मला नोव्हेंबर 2019 पासून वर्टिगो चा त्रास सुरू झाला. सुट्टीचा दिवस असल्याने मी दुपारी झोपून मोबाईलवर मुव्ही पाहत बसलो होतो. अर्धा मुव्ही पाहून झाल्यावर मी उठण्यासाठी कूस बदलली तेव्हा मला चक्कर आल्यासारखे जाणवले. मी पुन्हा जागेवर आलो की चक्कर जात होती. मी पुन्हा डाव्या बाजूला मान वळवली तेव्हा सगळे घर जोरात गोल गोल फिरू लागले. मी पुन्हा मान जागेवर घेतली चक्कर थांबली. मग मी मी उजव्या बाजूला मान वळवली तेव्हा सगळे घर जोरात गोल गोल फिरू लागले. ही चक्कर फक्त आडवा पडल्यावरच येत असे. चक्कर येऊन गेलं तर डोकेदुखीचा त्रास खूपच होऊ लागला. मी फिजिओथेरपिस्ट कडे गेल्यावर मानेचे व्यायाम केले. माझी चक्कर थोडीशी कमी झाली. पण मला पूर्ण आराम नाही भेटला. चक्कर अधून-मधून येत होती. डोकेदुखीचे प्रमाण कमी जास्त होत होते. वीस-पंचवीस दिवसानंतर कोणीतरी सांगितल्याप्रमाणे कानामुळे चक्कर येत असेल. म्हणून मी घरी कान साफ केले. घरी कान साफ केल्यामुळे माझ्या डाव्या कानाच्या पडद्याला लहान छिद्र पडलं. कानातून पाणी येऊ लागले व कानातून शिट्टी सारखा आवाज चालू झाला म्हणून मी इयर स्पेशालिस्ट डॉक्टरची ट्रिटमेंट घेतली. डॉक्टरांच्या औषध उपचारामुळे माझ्या कानाचा पडदा भरून आला. पण कानाचा पडद्याच्या आत मध्ये पाणी साचलेले दिसल्यामुळे डॉक्टरांनी कानाच्या पडद्याला होल पाडून त्यामध्ये लहान ग्रोमेट बसविले. हे एक लहान प्रकारचे ऑपरेशनच होते. तरीपण कानातून शिट्टी सारखा आवाज येतच होता. डॉक्टरांना विचारले कानातून शिट्टी सारखा आवाज का येतो. डॉक्टर म्हणाले कानाच्या पडद्याला छिद्र असल्यामुळे त्यातून शिट्टी सारखा आवाज येतो. ऑपरेशन नंतर डॉक्टर ने एक महिन्याने कान दाखवण्यासाठी बोलवले. ऑपरेशन होऊन एक महिना झाला होता तरीपण कानातून शिट्टी सारखा आवाज येत होता. त्यातूनच पुन्हा मला चक्कर येऊ लागली. मानेला तान आला की चक्कर येत होती. मी पुन्हा डॉक्टरांकडे कान तपासणीसाठी गेलो. कानाची तपासणी करताना स्क्रीनवर कानाचा पडदा पाहिला असता कानाच्या पडद्याला ग्रोमेट जवळ नवीन छिद्र पडले होते. मग डॉक्टरांनी तेव्हा बसवलेले ग्रोमेट काढले. डॉक्टरांनी मेडिसिन देऊन न्यूरोलॉजिस्ट यांना दाखवण्याचा सल्ला दिला. सध्या चक्कर चे प्रमाण कमी आहे. आडवे पडताना एक दोन सेकंदांसाठी फिरल्यासारखे होते व डोकेदुखीचे प्रमाण कमी जास्त होत आहे. हा त्रास मला पाच महिन्यापासून चालू आहे. न्यूरोलॉजिस्ट त्यांच्याकडे तपासणीसाठी जायचे आहे पण कोरणा संसर्गामुळे सर्व लॉक डाऊन आहे. हा आजार पूर्णपणे बरा होईल की नाही हे माहीत नाही पण माझे प्रयत्न चालू आहेत. या आजारातून पूर्णपणे बरा होण्यासाठी प्लीज मला चांगले सल्ले द्या.
रोहन,
रोहन,
आपल्या कानात ज्याला अंतःकर्ण म्हणतात तिथे दोन्ही बाजूला प्रत्येकी ३ "वॉटर लेव्हल" असतात.
या तुम्हाला त्रिमितीत उर्फ क्ष, य व झ अक्षांत तोल सांभाळण्यासाठी मदत करतात. दोन्ही कानांतल्या वॉटर लेव्हल उर्फ सेमीसर्कुलर कॅनाल्सचा बॅलन्स गेल्यावर चक्कर येणे सुरू होते.
याचा इलाज बहुतेकदा हा बॅलन्स रिसेट होण्याची वाट पाहणे, दरम्यान सांगितलेले मानेचे व्यायाम करणे, हा च असतो.
"नसेचा" आजार असेल तर मात्र यातून बरे होणे कठीण अथवा असाध्यही असू शकते. तुम्हाला आवाज ऐकू येता तो टिनिटस आहे. मेंदू तज्ञ व कान वाले डाक्टर यांच्या सल्ल्याने वागत रहा. मानेचे/डोके फिरवण्याचे व्यायाम साम्गितले आहेत, त्याने चक्कर वाढले असे वाटले तरीही ते व्यायाम करत रहा. त्यानेच बरे वाटेल.
स्टेमेटिल वगैरे औषधे या तोल साधण्याच्या संवेदना दाबून टाकण्याचे काम करतात. पण त्याने दोन्ही बाजू समानतः दाबल्या गेल्याने फक्क्त चक्करची इंटेन्सिटी कमी होते. मूळ आजार बरा होत नाही.
रच्याकने.
ग्रोमेटच्या बाजूला नवे पर्फोरेशन म्हणजे ग्रोमेट ब्लॉक झालीये. काहीतरी लोचा आहे. एक ईन्टीचंच सेकंड ओपिनियन घेऊन टाका. नव्या डॉक्तरांना इथे लिहिली ती सगळी हिस्ट्री आधीच सांगा, प्लस सगळे कागदही दाखवा.*(त्यांचि परिक्षा पाहण्याचा यत्न करू नका, याने आपला वेळ व खर्च खूप वाचतो.)
क्शार तेल पावसाळ्यात कानात
क्शार तेल पावसाळ्यात कानात टाकु नये असे वाचले होते. कर्णनाद आधीही होता पण आता जरा जास्त त्रास होतोय त्या आवाजाचा.
मला २००१ साली त्रास झाला होता
मला २००१ साली त्रास झाला होता. एक अतिशय चांगले घरगुती औषध मी केले आणि तेंव्हा पासून हा त्रास कायमचा गेला. काचेच्या ग्लासात आवळकाठी ( म्हणजे आवळ्याचे वाळवलेले तुकडे आणि धने रात्री एक एक चमचा व पाणी ठेवावे. सकाळी आवळकाठी आणि धने गाळण्याने गाळून घ्यावे. यात खडीसाखर घालून हे पाणी रिकाम्या पोटी सलग दहा दिवस प्यावे.
शिवाय कानात श्रुती हे कानात घालायचे औषध ( बालाजी तांबे फार्मसी ) रात्री झोपताना कानात घालावे.
याने आराम पडेल.
Pages