प्रतिशोध भाग-पाच
भाग चार: https://www.maayboli.com/node/63448?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C3427356645
पुढच्या दिवशी
कॉलेज कँटिन मध्ये
काव्या स्वतःच्याच तंद्रीमध्ये बसली होती.आतापर्यंत सियालचे किती कॉल येऊन गेले पण तिने उचलला नाही.
"हाय काव्या, आज एकटीच,गँग कुठे ग तुझी.."स्वरा तिच्या समोरच्या खुर्चीत बसून बोलली.
"माहित नाही.स्वरा तू या कॉलेजमध्ये अकरावी पासून आहे ना?"
"हो ,का ग??अस अचानक?"
"स्वरा मला तुला काहीतरी विचारायच आहे, प्लीज हेल्प मी यार."
"अग रिक्वेस्ट काय करते,आपण क्लासमेट आहोत.. विचार पण त्या आधी काही खाऊया का?थांब मी सँडविच घेऊन येते."
स्वरा पुन्हा येईपर्यंत काव्याने तिचा फोन बंद केला. सियालसोबत बोलायची तिची इच्छा नव्हती.
"हे घे...आणि चल विचार आता.. तसपण तू त्या ग्रुप सोबत एवढी असते की आम्हाला विसरली."
"अस नाही ग,
मला तुला कस्तुरी बद्दल विचारायच होतं."
कसबस तिने विचारले.
स्वरा खायची थांबली.
"काव्या तू कोणत्या कस्तुरी
बद्दल विचारतेय?"
"जी अकरावीला तुझ्यासोबत होती.."
"तुला कस माहित तिच्याबदद्ल ??
ओह तुझ्या ग्रुप वाल्यांनी सांगितल का?"
काव्या तिला सर्व काही सांगते..
"काव्या...
कस्तुरी माझी मैत्रीण होती. आणि तुला माहित नाही... मी तुझ्या याच ग्रुप सोबत असायची.. कुमार माझा bf होता ..पण नंतर आमच ब्रेकअप झालं.आणि मी तो ग्रुप सोडला.
असो,
कस्तुरी कुमारला,बबलुला ,श्रीला आणि सँडीला या सर्वांना भाऊ मानायची.का ते नाही माहित.
पण सियाल,तो तिच्या साठी खूप खास होता. आम्ही हॉस्टेलमध्ये एकाच रुममध्ये होतो त्यामुळे बाकीच्यांना तिच्या बद्दल जास्त माहित नसल तरी मला माहित आहे. मी तुला सर्व सांगेन पण आता इथे नाही आपण संध्याकाळी भेटू,सहाच्या आसपास.
तुला चालेल का?"
"हो चालेल,पण कुठे भेटणार?"
"सांगेन तुला कॉल करून,चल आता लेक्चरला तर जाऊया."
"हा वेळ आहे ना अजून, आणि खरं सांगू तर इच्छा नाही ग काही करायची."
"मी समजू शकते काव्या, होईल सर्व नीट.
पण तुला आता एवढच सांगेन तू त्या ग्रुप मध्ये पुन्हा एवढ्यात तरी जाऊ नको.कस्तुरीचा विषय चालू आहे आणि जर त्यांच्या पैकी कोणाला समजल की मी तुला कस्तुरी बद्दल काही सांगणार आहे तर मग प्रोब्लेम होईल."
"एक मिनिट , काय प्रोब्लेम होणार??
हे बघ तु कस्तुरी बद्दल नंतर सांग ठिक आहे पण तू जे आता बोलली ते का हे तर सांग."
"काव्या,मी जाते पुढे.15 मिनिटे आहेत अजून, तुला ठिक वाटल तरच ये लेक्चरला,नाहीतर भेटू तेव्हा नोटस देईन.आणि हा आजचा ब्रेकफास्ट माझ्याकडून हा..बाय , काळजी घे."
काव्याच डोक भणभणत होतं.ती bag उचलून निघतच होती तेवढ्यात अचानक तो तिच्या समोर आला.
"मला बोलायच आहे, काव्या.."
"पण मला काही बोलायच नाही आणि ऐकायच सुध्दा नाही. एकट राहायच आहे. समजून घे सियाल."
"ठिक आहे, जातो मी पण एवढ ऐक की कस्तुरी माझा भूतकाळ होती. तु माझं वर्तमान आहेस. माझी चुकी ही की मी तुला से सर्व आधीच सांगायला हवं होतं.पण आम्ही ठरवलेलं की हा विषय पुन्हा काढणार नाही."
"सियाल,मी घरी जातेय.मला ठिक वाटलं की बोलेन."
काव्या निघाली तर पण वाटेत एक नवीन चेहरा तिची वाट बघत उभा होता.
त्याला बघून काव्या खूष झाली.
"तू इथे??अरे वा आजकल पोलीस पण सरप्राईज द्यायला लागले.
आलाच आहेस तर घरी चल माझ्यासोबत मम्मी पप्पा पण खूष होतील."
"अग हो हो,जरा हळू..
तुलाच न्यायला आलो आहे. चल बस आता गाडीत , निघुया."
काव्या त्याच्यासोबत निघाली.सियाल मागून तिच्या कडे आणि त्या नवीन माणसाकडे बघत राहिला.
Twist पे twist क्या बात है पु
Twist पे twist क्या बात है पु.भा.प्र.
अरे व्वा! पुढचा भाग आला पण...
अरे व्वा! पुढचा भाग आला पण...
मस्त!! पुभाप्र..
Waa uttam..pudhil bhagachya
Waa uttam..pudhil bhagachya pratikshet
मस्त
मस्त
धन्यवाद अक्षयजी,सायुरी
धन्यवाद अक्षयजी,सायुरी,देवांशी,भुत्याभाऊ
भारी लिहिलंय ...
भारी लिहिलंय ...
pudhil bhagachya pratikshet...!!!
पुढचा भाग कधी ? पुलेश.
पुढचा भाग कधी ? पुलेश.
धन्यवाद सच६४८६ आणि prasad
धन्यवाद सच६४८६ आणि prasad inamke
पुढचा भाग कधी ? >>>
आज रात्री
मस्तच
मस्तच
/\
/\