अँमेझाँन चा सेल कितपत उपयोगाचा? : बंद धागा.

Submitted by यक्ष on 10 August, 2017 - 00:49

सध्या अँमेझाँन चा सेल चालू आहे.
मी तशी चार पाच वेळा खरेदी केली पण त्याही छोट्या छोट्या वस्तुंचीच (उदा. पुस्तके, चादरी वगैरे) मोठ्या वस्तू मला त्यापेक्षा बाजारतनं व्यवस्थीत व कमी किमतीत मिळाल्या.
अँमेझाँन ची वेबसाइट बघत बसण्यात वेळ मात्र फु़कट जातो.
आज मी ' हायड्राँलिक जँक' (कार साठी), 'एअर पंप'(कार साठी) 'प्रेशर कूकर' व 'इस्त्री' चा शोध घेत होतो. अँमेझाँन च्या वेबसाइटवर ५०% ते ७०% ह्या वर्गात एकही अशी वस्तु सापडली नाही. आता सरळ 'बोहरी आळी' चा रस्ता गाठतो. तिथे मला माझ्या आजवरच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत तशी ह्याही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा आहे.
आपलेही विचार जाणून घ्यायला आवडतील!

(तांत्रिक कारणासाठी हा धागा बंद केला आहे. धाग्यातला मजकूर आणि प्रतिक्रिया दुसर्‍या धाग्यावर नेण्याचे काम सुरू आहे.वेबमास्तर)

Group content visibility: 
Use group defaults

इस्त्री : रॅकोल्डची चार पौंडी

इस्त्री : रॅकोल्डची चार पौंडी घ्यावी. साधारणपणे मुठीच्यामागे एक सॅाकेट असते त्यात एक सेपरेट वायर लावता येते. एक टेलर मॅाडेलही मिळते यास पुढे त्रिकोणी टोक असते त्याने खुप फायदा होते. (१)
हल्ली मुठीच्या मागे आतूनच कायमची वायर लावलेल्या स्टाइलिश इस्त्री मिळतात त्यात ओटो हिटर कंट्रोलर असतो त्या बिघडल्या की नवीनच घेणे स्वस्त पडते. यांचे एलमेंट बदलणे किचकट काम. (२)

नंबर १ चे एलमेंट वीस रुपयांत मिळते ते साधारण आठदहा वर्षे टिकते.

हो पण असे माँडेल्स आताशा मिळतात? आणी तसा'आँटो हीट कंट्रोलर' सील्क किवा नाजुक कपड्यांसाठी आवश्यक नाही कां?

बरं झालं विषय निघालाय. काॅटनचे कपडेही नीट व्यवस्थित प्रेस होतील अशी इस्तरी सांगा प्लीज.

# यक्ष,चंपा
१) हिटर ओटो असल्याने आणि तो हलक्या कपड्यांसाठी सेट केल्यावर बरोबर ओनओफ झाला तर चांगलेच परंतू तो बिघडला की बदलावा लागतो. ते महागात पडते. या इस्त्र्या जड मिळत नाहीत.
२) कॅाटन कपड्यांसाठी इस्त्रिचा जडपणा हवा. कपड्यांवर पाणी मारून दमट करून फिरवली की सुरकुत्या मोडल्या जातात तेव्हा दाबावेही लागते. जड इस्त्री उष्णता धरून ठेवते व दाबावी लागत नाही. यामध्ये ओटो हिटर नसला तरी दमट कॅाटन लगेच जळत नाही शिवाय एक हात कापडावर फिरत ठेवतो तेव्हा इस्त्री किती गार गरम आहे त्याचा अंदाज येततच असतो. तसा मेन स्विच ओनओफ करावा लागतो. काम मात्र चांगले बराबर होते.
( अॅमझॅानच्या धाग्यावर थोडे अवांतर होतय. )