समोसा-पावचा शोध!

Submitted by नानाकळा on 9 August, 2017 - 07:37

मुंबैत वडापावचा शोध अशोक वैद्य यांनी १९६६मध्ये लावला.

तर.. मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.... म्हणजे दावा तपासून पहा बॉ मीच लावला का ते!

काय की समोसापाव मागितला की लोक 'हॅण्ड ग्रेनेड' मागतोय असं काहीसं बघायचे.

त्याआधी कधी समोसा पावात टाकून खातांना पाहिलं नाय का मुंबैकरांनी? मला खरंच माहिती नाही म्हणून विचारतोय.

स्टोरी लिहून ठेवतो. पुढे सापडायची नाही, शोधायला गेलात तर....

तर आम्ही जेजे होस्टेलवाले, शिववडापावची व्याघ्रगर्जना करणार्‍या उधोजींच्या शेजारी राहायचो. तेव्हा बाळासाहेब होते.

सगळी होटेलं, टपर्‍या एक दीड किमी च्या बाहेर होत्या. तर होस्टेल गेटच्या बाहेरच, साहित्यसहवासच्या समोर (म्हणजे जिथे सचिन राहायचा, हां, वपु वगैरेही राहायचे म्हणा) एक मद्रासी अण्णाची डेली नीड्स व एसटीडीची (एसटीडी म्हणजे एका शहरातून दुसर्‍या शहरात फोन लावण्यासाठी असलेली सुविधा, - ओन्ली नायन्टी'ज किड्स विल नो इत्यादी इत्यादी.) पानटपरी असायची, अजून असेल, आता तिथले मालक म्हणून किमान तीसेक अण्णा बदलून गेले असतील. तिथे दुपारी ५ वाजता ताजे गरम समोसे यायचे. फक्त समोसे. बाकी काही नाही. बाकी त्याच्याकडे आसपासच्या रहिवासी लोकांना रोज लागणारे चुटूर पुटुर सामान, सिगरेट, इत्यादी.

आम्हा पोरांना संध्याकाळच्या भुका लागायच्या. मग आम्ही समोसे खायला जायचो, बाजुच्या चहावाल्याकडे एक चहा घ्यायचो. एक किंवा दोन समोसे नुसते खाऊन माझे पोट भरत नसे. मग मी शक्कल लढवली. दोन समोसे घ्यायचे. एक स्वीट बनपाव घ्यायचा. त्यात दोन पाव छोटेसे यायचे, लुसलुशीत छान. मग पाव उघडायचा, त्यात समोसा कोंबायचा, सॉस ची किनार लावली की झकास!. तो समोसा आणि तो पाव अगदी 'मेड फॉर इच अदर' होते. आकार आणि चव दोन्हीच्या बाबतीत एकमेकांना तबला आणि सारंगीसारखी दाद देणारे.

तेव्हा ते दोन समोसे ५ रुपयाचे आणि बनपाव ४ रुपयाचा. एक रुपयाची सॉसची सॅशे..... असे १० रुपयात दणदणीत पोट भरत असे. त्यावर दोन रुपयाची कटींग मारली की काम तमाम!

हा प्रकार हॉस्टेलातल्या पोरांना जाम आवडला. मग पैसे नसले कुणाकडे तरी दहा रुपयात दोघांचेही जमून जात असे.

असेही, वडापाव खायला म्हणून तीन किमी पायपीट करुन फायदा काहीच नव्हता...

आळशी माणसांना क्रीएटीव आयडीया सुचतात म्हणे..... त्यात अस्मादिक दोन्हीही.... .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोलापूर WIT जवळच्या अरविंद टपरीमधे बनसमोसा आणि बनकचोरी ९०च्या सूरुवातीपासून मिळत होती. म्हणजे आधीही मिळत असेल मी खाल्ली ९०च्या दशकात.
४ ₹ चा बन+समोसा/कचोरी/वडा आणि ३₹ चे सुगंधी दूध. ७₹ त पोट भरायचं.

मुंबईमध्ये २००३ च्या आधीपासूनच समोसापाव मिळत होता.

आमच्या शाळेच्या कँटीनमध्ये पण समोसापाव मिळायचा. २ रुपयाचा वडापाव आणि तेवढ्याच किंमतीचा समोसापाव खाल्लेला आठवतोय. (पाचवीनंतर पॉकेटमनी मिळायला लागला)
५० पैशात वडापावची चटणी घालून नुसता चटणीपावदेखील मिळायचा.

पहिलीत मी १ रुपयाचा वडापाव खालेल्ला आठवतोय. ८० पैशाचा वडा आणि २० पैशाचा पाव. हे लक्षात राहीले कारण कँटीनमध्ये गर्दीतून आईने दिलेला १ रुपया सांभाळत घेतला होता. पहिल्यांनाच स्वतः काहीतरी विकत घेऊन खाल्ले होते. Happy
दरवर्षी वडापाव-समोसापावची किंमत चार आण्यांनी वाढायची.
मी दहावी २००० साली पास झालो.

कॉलेजच्या कँटीनमध्ये आणि आजूबाजूच्या मिठाईच्या दुकानात पण समोसापाव, भजीपाव वगैरे मिळायचे.

दादरच्या कीर्ती कॉलेजच्या अशोक वडापाववाल्याकडचा समोसापाव आणि पेप्सी हे कॉम्बिनेशन मला फार आवडायचे. अजूनही तिकडे जाणे झाले तर त्या समोसापावासाठी तिकडे वाकडी वाट करावी का, अजून मिळत असेल का असे वाटत राहते.

तर.. मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय....

==

'टेपा' लावायची देखिल एक लिमीट असते, Proud म्हणे मुंबईत २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.
१९८५ पासून, म्हणजे मी मुंबईत आल्यापासून कितीतरी वेळा 'समोसापाव' खाल्लेला आहे.

मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय.... >>> या वाक्याच्या पुढेही बरंच काही लिहिलेलं आहे ते बहुतेक लोक वाचतील अशी अपेक्षा होती.. पण काय मजबुरी असेल देव जाणे! Happy Happy

५० पैशात वडापावची चटणी घालून नुसता चटणीपावदेखील मिळायचा. >> आमच्या शाळेत सुद्धा Happy
पहिलीत मी १ रुपयाचा वडापाव खालेल्ला आठवतोय.>>> मे तिसरीत असताना आमच्या शाळेसमोर ९० पैशाला वडापाव मिळत होता.

वडापावची किंमत वाढत गेली आणि एका वडापावने पोट भरेना, तसेच तुलनेत समोसा वड्यापेक्षा मोठा म्हणून मी आणि माझ्या एका मैत्रिणीने समोसा-पाव खायला सुरुवात केली होती.

अरे खाद्यपदार्थांचंही पेटंट असायला हवं.
नाहीतर उद्या एखादी आजी म्हणेल, पुरणपोळीचा शोध मी लावलाय.
नवीन Submitted by पद्म on 9 August, 2017 - 17:47

>>>> पोस्ट चा पॉईन्ट तुमच्याच लक्षात आला... ग्रेट!

आमच्याइथे एक भन्नाट प्रकार मिळायचा तो म्हणजे पावपकोडा!! पावात बटाटेवड्याची भाजी घालुन मग तो पाव बेसनात बुचकळुन तळायचा. अहाहा!!! तसा प्रकार नंतर कुठेच खाल्ला नाही

1999 मध्ये मी शाळेत असताना.. किंग जॉर्ज मध एक दोन वेळा समोसापाव खायचे आठवतेय.. चटणीपाव खायचो मोस्टली, पैसे नसायचे समोसापाव साठी..

पावपकोडा नाही पण ब्रेड पकोडा खाल्लाय, अजुनही खाते.
बटाटेवड्याची भाजी ब्रेड मध्ये भरली की झाला ब्रेडपकोडा.
ठाण्यात गजानन मधला खाल्ला होता बर्याच वर्षा पुर्वी. आता मिळतो का माहीत नाही

हिम्सकुल पुण्यात ल्या टपर्यांचे पत्ते देता का.
फार वांधे होतात खाण्याचे पुण्यात गेलं की

@ अॅमी... अगदी अगदी
हेच सांगयला हिरीरीने आले होते. Happy
बन कचोरी आणि गोड चटणी. खावी तर अरविंदचिच!

>>तर.. मुंबैतच २००३ साली 'समोसापाव'चा शोध मी लावलाय....<<

जेजे होस्टेल समोरच्या टपरीत "समोसापाव" चा शोध लावला, असा बदल करा; मुंबई खुप मोट्ठी आहे. आणि खाण्याच्या बाबतीत तर सगळ्या शहरांमध्ये अग्रेसर. घाटकोपर पुर्वेच्या खाऊ गल्लीत तर १००+ प्रकारचे नुसते डोसे मिळतात...

राज, आय गेस.... मी इतिहासावर संशोधन करुन कुठला रिसर्च पेपर लिहिलेला नाहीये इथे.... Wink Happy

------------------------------

का बा, लोक्स एवढे सिरियस का होउन राहिलेत...?

पुढे भविष्यात कधी आत्मचरित्र लिहिले तर मुंबैचे नावही लिहू नये असे काही सुचवतायत की काय लोक्स?

असे असेल तर '२००२ साली मी मुंबैत आलो' हे वाक्य कसे लिहावे मग? . बॉम्बे चे मुंबै केले.... आता मुंबै पण नको....?

अस्मिता फारच टोकदार झाल्यात की दुसरंच काही चालू आहे? Happy Happy

विरारला समोसापाव कित्येक वर्षे मिळायचा परंतू बनपाव गोडापाव नव्हे . आता या टपय्रा जाऊन तिथे मोबाइलवाले आले अथवा चाइनिज भेळवाल्यांनी धंधा खाल्ला! याचे श्रेय तुम्हालाच!

>>राज, आय गेस.... मी इतिहासावर संशोधन करुन कुठला रिसर्च पेपर लिहिलेला नाहीये इथे....<<
नानाशेठ, चिल. यावरुन तुम्हाला कोणी अजुन धोपटु नये म्हणुन तो बदल सुचवला, याउप्पर तुमची मर्जी... Happy

कोणी अजुन धोपटु नये म्हणुन तो बदल सुचवला

>> याबद्दल लै लै धन्यवाद आणि आभार्स.... याउप्पर मी म्हणेन... जैसी जिसकी सोच. ज्याला जे वाटेल त्याला तो स्वतः जबाबदार राहिल... सानु की! Wink Happy

दुसरा कोई फेके तो फेकने का कौतुक, और नाना फेके तो सिरीयस धोपटना? बहुत नाईन्साफी है ये! Wink

जमलंय पण नानाकळा तुम्हाला. Happy

त्या टपरीवाल्याला समोसापाव हा प्रकार माहिती नव्हता आणि तुम्हालाही.
जसा सगळ्या वस्तूंच्या शोधाची जननी गरज असते, तशीच भूक आणि पैशाच्या टंचाईच्या गरजेपोटी त्या टपरीवर (टपरीपुरता) समोसापावचा शोध लावलात.
असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

लहान असताना, खेळायला जायची घाई असायची, मग पटापट जे1 संपवण्यासाठी चपाती मदे भाजी टाकून रोल करून पळायचो खेकायला... आता कळतंय की काठी रोल नावाचा प्रकार सुरू झालाय..

दुसरा कोई फेके तो फेकने का कौतुक, और नाना फेके तो सिरीयस धोपटना? बहुत नाईन्साफी है ये! >>>> +१
फेकनेवाले के इंतजार में बैठे हम यहाँ.... Lol

दुसरा कोई फेके तो फेकने का कौतुक, और नाना फेके तो सिरीयस धोपटना? बहुत नाईन्साफी है ये! Wink
जमलंय पण नानाकळा तुम्हाला. Happy
>> थोडंं गफ्रे वगैरे अ‍ॅड केले असते तर अजून छान झाले असते. Wink

फेकनेवाले के इंतजार में बैठे हम यहाँ....
>>
त्यासाठी special keywords आहेत, ते प्रतिसादात टाका करा. बघा हजर होतो की नाही ते. Happy

Happy
आवडला लेख. खाउन बघितला नाही अजून हा प्रकार. बाय द वे तो सामोसा पंजाबी असायचा की पट्टीवाला? अण्णाकडे पंजाबी सामोसा म्हणजे काय प्रकार असेल विचार करतोय.

बाकी सेनावाले लोक राहायचे त्याच्या समोरच "अण्णा" ची टपरी म्हणजे ही मराठीपणा सोडून हिंदुत्ववादाकडे गेल्याच्या काळातली सेना असावी Happy

एसटीडी चा ९०ज मधला अर्थ दिलात हे बरे केलेत Happy

मी खाल्ल्या आहे late 90s मध्ये त्यापूर्वी पण असणार पण मी तेव्हा घराबाहेर पडले नव्हते अथवा कमावती नव्हते.
ठाणा स्टेशन तेव्हाचा 5 नंबर प्लॅटफॉर्म डाऊन साईडला पहिला लेडीज जवळ.

सगळेच मस्त प्रतिसाद , सर्वांना धन्यवाद! Happy

अशीच एक आठवण लिहून काढली... इथे शेअर केली, तुम्ही लोकांनी वाचलं, बरं वाटलं! Happy

मी पहिल्यांदा हा प्रकार एकला, खाल्ला तो आमच्या कॉलेज कँटीनमधे. केळकर कॉलेज, साधारण ९७-९८ च्या सुमारास. बाहेर कुठे फारसा मिळायचा नाही तेव्हा. पण अगदी पोटभरीचा आणि स्वस्त म्हणुन हिट होता Happy

Pages