अमेरिकन टॅक्सेस व भारतातील सेव्हिंग्ज ई.

Submitted by फारएण्ड on 8 August, 2017 - 15:48

अमेरिकेत टॅक्स फाइल करताना भारतातील संबंधित माहिती द्यावी लागते त्याबद्दलचा धागा.
- इन्कम टॅक्स फाइलिंग
- FBAR
या दोन्ही संबंधात इथे माहिती द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात सध्या माहिती काढत आहे ती FBAR संदर्भात. पूर्वी हा फॉर्म फक्त अशा लोकांनाचा भरावा लागत असे, ज्यांचे भारतातील सेव्हिंग मागच्या वर्षभरात $१०,००० पेक्षा जास्त कधीही असेल. पण यावर्षी असे ऐकले आहे की ज्यांचे भारतात कोणत्याही प्रकारचे सेव्हिंग आहे त्यांना सर्वांनाच हा फॉर्म भरावा लागेल.
दुसरे म्हणजे याची तारीख पूर्वी जून मधे असायची, ती यावर्षीपासून नेहमीची टॅक्स डेडलाइन - १५ एप्रिल केली आहे. मात्र याला आपोआप एक्स्टेन्शन मिळते सहा महिने.

तर मला हे विचारायचे आहे की भारतात जर एलआयसी ई. च्या पॉलिसीज असतील ज्यात मॅच्युरिटीनंतर भरलेली अमाउण्ट परत मिळते - त्यांची नोंद यावर करणे गरजेचे आहे काय, आणि नक्की काय भरायचे.

वेब वर थोडीफार माहिती मिळाली, आमच्या टॅक्सवाल्यालाही विचारले आहे. पण इतरांनाही फायदा होईल म्हणून इथे.

पण यावर्षी असे ऐकले आहे की ज्यांचे भारतात कोणत्याही प्रकारचे सेव्हिंग आहे त्यांना सर्वांनाच हा फॉर्म भरावा लागेल. >> IRS वर असे काही दिसत नाही. तू कुठे बघितलेस ?
https://www.irs.gov/businesses/small-businesses-self-employed/report-of-...

$१०,००० च्या वर अमाऊंट असेल, तर डिक्लेअर करावं लागतं, हे माहीत आहे. पण सगळ्यांनाच सरसकट ते डिक्लरेशन द्यावं लागेल, ही नवीन बातमी आहे. अर्थात तसं असेल, तर पुढच्या वर्षी रिटर्न्स भरताना ते करावं लागेल.

मी तसे ऐकले होते. पण काढतो अजून माहिती.

एनीवे, त्यात एलआयसी, एन एस एस ई. बद्दल काय द्यावे लागेल ती माहिती तरीही उपयोगी होईल.

मला आठवतंय हा विषय ३-४ वर्षांपुर्वि माबोवर निघाला होता...

पुर्वि काहितरी थ्रशोल्ड अमाउंट होती, $५०,००० बहुतेक लक्षात नाहि आता. टॅक्स रिटर्न्स भरताना फॉर्म ८९३८ भरावा लागतो ज्यात सगळ्या फिन इंस्टि, इन्वेस्टमेंट्स वगैरेची माहिती द्यावी/अपडेट करावी लागते. फॉर्म ऑन लाइन हि भरु शकतो. हा फॉर्म फक्त फॉरेन अ‍ॅसेट्स डेक्लरेशन साठी आहे; त्याचा इमिजिएट इंपॅक्ट तुमच्या टॅक्स लायाबिलिटी वर होत नाहि. जेंव्हा तुम्हि फॉरेन अ‍ॅसेट विकुन इन्कम मिळवता ते १०४० वर रिपोर्ट करावं लागतं - त्याच्यावर टॅक्स द्यावा लागतो. भारतात मिळालेल्या उत्पन्नावर टिडिएस कापला जातोच, ते उत्पन्न आणि कापलेला टॅक्स १०४० वर दाखवुन टॅक्स क्रेडिट घेता येते.

आता तर भारतातल्या फिन इंस्टि सुद्धा केवायसी च्या प्रोसेस द्वारे तुमचा सोशल मागतात. भारतात जसे पॅन आणि आधार# लिंक्ड केलेले आहेत तशाच प्रकारे पॅन आणि सोशल हि लिंक्ड करुन आयारएस शी इंटिग्रेट केल्याची शक्यता नाकारता येणार नाहि... Wink

राज तुमचे म्हणणे बरोबर आहे. फॉर्म ८९३८ हा जर परदेशात $५०००० पेक्षा जास्त पैसे ( $१००, ००० जर एकत्र टॅक्स रिटर्न्स भरत असल्यास ) असल्यास भरावे लागते.

FBAR साठी ही रक्कम $१०,००० आहे.

दोन्ही नाही भरले तर त्याला प्रत्येकी कमित कमी $१०००० चा दंड आहे.

ह्या दोन्ही फॉर्म साठी बाजारभावा प्रमाणे किंमत घ्यावी लागते. ह्या वर्षा पासुन दोन्ही ची डेडलाइन - १५ एप्रिल आहे. दोन्ही फॉर्म वर लागणारी माहिती एकच आहे. H&R च्या software मध्ये ८९३८ भरण्याची सोय आहे (बाकीच्या मध्ये पण असेलच) . FBAR चा pdf मध्ये फॉर्म आहे तो भरुन आपणच upload करु शकतो. त्यानंतर इमेल मध्ये confirmation येते.

जर अमेरिका कायमची सोडली तर FBAR अमेरिकेतल्या शेवटच्या दिवसा पर्यन्त भरवा लागतो पण ८९३८ बद्दल कायद्यात बरेच फाटे आहेत.

राज,
परदेशात म्हणजे कुणाच्या परदेशात? जर अमेरिकन उत्पन्न ५०,००० पेक्षा जास्त असेल तर कि अमेरिकेबाहेरचे उत्पन्न ५०,००० पेक्षा जास्त असेल तर? या मर्यादेबद्दलची खात्रीची लिंक देऊ शकाल का?

मी दर वर्षी FBAR भरत आलो आहे देशाबाहेरील इन्वेस्टमेंट १०००० च्या आत असेल तरी. माझ्या टॅक्सवाल्याला विचारतो का ते. एकुणात माझा त्याच्यावर आता फार विश्वास नाहिये Happy

>>परदेशात म्हणजे कुणाच्या परदेशात? जर अमेरिकन उत्पन्न ५०,००० पेक्षा जास्त असेल तर कि अमेरिकेबाहेरचे उत्पन्न ५०,००० पेक्षा जास्त असेल तर? या मर्यादेबद्दलची खात्रीची लिंक देऊ शकाल का?<<

परदेश म्हणजे एनी फॉरेन कंट्री - आपल्या बहुतेकांबाबात भारत (अन्लेस सम ऑफ अस हॅव मिल्यन्स स्टॅश्ड इन बर्मुडा... Happy ). आणि हि रिक्वायर्मेंट रिगार्डलेस ऑफ योर युएस इन्कम आहे. तुमच्या भारतातल्या अ‍ॅसेट्स/इन्वेस्ट्मेंट्स ची वॅल्यु $५०,०००/$१००,००० (फाय्लिंग सिंगल्/जॉइंट) असेल तर तुम्हाला फॉर्म ८९३८ भरणं आवश्यक आहे...

अधिक माहितीसाठी इथे पहा.

तुमच्या भारतातल्या अ‍ॅसेट्स/इन्वेस्ट्मेंट्स ची वॅल्यु $५०,०००/$१००,००० (फाय्लिंग सिंगल्/जॉइंट) असेल तर तुम्हाला फॉर्म ८९३८ भरणं आवश्यक आहे. >> हे विधान " तुमच्या अमेरिकेबाहरच्या अ‍ॅसेट्स/इन्वेस्ट्मेंट्स ची वॅल्यु $५०,०००/$१००,००० (फाय्लिंग सिंगल्/जॉइंट) असेल तर तुम्हाला फॉर्म ८९३८ भरणं आवश्यक आहे." असे लिहिले तर अधिक स्पष्ट होते. वर अजयला पडलेला प्रश्न मलाही पडला होता.

>>हे विधान " तुमच्या अमेरिकेबाहरच्या अ‍ॅसेट्स/इन्वेस्ट्मेंट्स ची वॅल्यु $५०,०००/$१००,००० (फाय्लिंग सिंगल्/जॉइंट) असेल तर तुम्हाला फॉर्म ८९३८ भरणं आवश्यक आहे." असे लिहिले तर अधिक स्पष्ट होते.<<

विषय फॉरेन अ‍ॅसेट्सच्या संदर्भात असल्याने "अमेरिकेबाहेर" अध्याहृत (माझ्या मते) होतं. एनीवे, आय स्टँड करेक्टेड... Happy

>>अमेरिकेबाहेर घर असेल तर ते अ‍ॅसेट्स/इन्वेस्ट्मेंट्स मध्ये येते का?<<

टेक्निकली येते पण त्याची वॅल्यु फॉर्म ८९३८ मध्ये डेक्लेर करावी लागत नाहि. पण ती जर विकली तर ते इंन्कम मध्ये दाख्वुन टॅक्स भरावा लागतो...