"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरा अभिनय केलाय मु.ब ने काल. आता आपला खेळ खल्लास, आपण नक्की पकडले जाणार हे जाणवल्या नंतरचे अश्रू, आईला फोन करुन सुचना देणं, गलबलुन आलं होतं तिला.
पुढचा प्लॅनही कसला भारी होता..लगेच कशी सोय होते ह्यांची अँब्युलन्सची?? आणि फटाफट हालचाली..
पण रा आता धुरत ला काय explaination देईल मोठी बातमी कवर करायला तिथे न आल्याचं?
रा ला आई पण explaination द्यावं लागेल घड्याळात ते विडीओ शुट केलेलं कार्ड लपवुन ठेवलय त्याचं.

आईने त्या शेजारच्या बिल्डिंग मधल्या मुलाला बोलावणे पाठवलेय, आता त्याने कार्ड पाहिले तर वांधे.

बाकी त्या दोघींनी काल खूप सुरेख काम केले. मनात विचार आला, अपघाती मृत्यू समोर दिसत असताना त्यात अडकलेल्या लोकांनाही असे काहीतरी वाटत असेल का?

धुरत सहज म्हणून गॅरेज मध्ये जाऊ शकला असता. पोलीस कार्ड दाखवू शकला असता, जसे जगतापने केले. जरी तो ऑफिशियली कोणाला अटक करू शकला नसला तरी पैसे घेऊन जाणाऱ्या बाईला पाहता आले असते. ते न करता तो गाडीत का बसून राहिला हे कळले नाही. केवळ कथानकाची गरज. त्याला काही करता येत नाही म्हणून त्याने रागिणीला बोलावले. आता रागिणी घरी जाऊन बॅगा टाकून, परत रागिणी बनून जाईल टीम घेऊन.

कालचा भाग जबरदस्त. सदा गॅरेज मध्ये जाऊन रागिणीला पकडू शकला असता पण तिचा पाठलाग करून ती कुठे जाते किंवा कुणाला सामील आहे हे त्याला बघायचं असतं..
तो रागिणीला नेमकं फोन करून सगळं सांगतो हे मलाही थोडं खटकलं.. केवळ कथानकाची गरज म्हणून.. पण चालायचंच..
मालिका आवडली असल्याने Happy
काल पकडले जाऊन आपलं आता काही खरं नाही हे जाणून ती आईला फोन करते तो सीन मस्तच.. पण ती आई सुहासला बोलावते त्याच्या कडुन ते घड्याळामागचं कार्ड काढून घेते की काय..!

बाकी त्या दोघींनी काल खूप सुरेख काम केले. मनात विचार आला, अपघाती मृत्यू समोर दिसत असताना त्यात अडकलेल्या लोकांनाही असे काहीतरी वाटत असेल का?>>>>>
+1साधना

हे माहित असताना देखील धडधड होत होती पाहताना... अगदी अगदी.
तो जगताप आणि पकडलेला माणूसही छान काम करतोय. पोलीस चौकशी करतोय किंवा पकडून भलत्याच ठिकाणी नेलय तरी घाबरत नाही..
इनफॅक्ट सगळेच कलाकार छान काम करतात. हे दिग्दर्शकाचं यश म्हणावं लागेल.. बाकी संपूर्ण टीम मस्त जमून आली आहे. कलाकार, दिग्दर्शक, संवाद, पार्श्व संगीत.... कुणालाही नाव ठेवायला जागा नाही.. परफेक्ट मालिका..!

आता कसं नाही समजलं, रागिणी फोन लोकेशन धुरतला... ट्रेस नाही केलं ओ.. रागिणीचा संशय येईल तर करेल पुन्हा
Happy
त्याने फक्त त्याच दिवशी चेक केलं मोबाइल लोकेशन. खुनाच्या दिवशी आणि पहिल्यांदा हल्ल्याच्या दिवशी चेक केलं तरी संशय येईल तिचा.

त्याने फोन केल्यावरच लोकेशन चेक करेल, आणि हे आता त्याला प्रायव्हेट ली करावे लागणार, स्वतःचे कॉन्टॅक्टस वापरून. त्यामुळे वेळ लागेल. त्यामुळे वेळ लागणार.

धुरत सहज म्हणून गॅरेज मध्ये जाऊ शकला असता. पोलीस कार्ड दाखवू शकला असता, जसे जगतापने केले. जरी तो ऑफिशियली कोणाला अटक करू शकला नसला तरी पैसे घेऊन जाणाऱ्या बाईला पाहता आले असते. ते न करता तो गाडीत का बसून राहिला हे कळले नाही. केवळ कथानकाची गरज. त्याला काही करता येत नाही म्हणून त्याने रागिणीला बोलावले. आता रागिणी घरी जाऊन बॅगा टाकून, परत रागिणी बनून जाईल टीम घेऊन.

>> अगदी अगदी.

एक शंका आहे. मिठबावकरने सातवच्या बायकोला गाडी चा नंबर कालच कसा काय सांगितला? >>> जो माणूस गाडी चोरू शकतो त्याच्या करता नकली नंबरप्लेट बनवणे म्हणजे डाव्या हाताचा खेळ असेल ना?

ती बाई ( जी professional आहे असं धुरतला वाटत असतं) धुरतला ओळखू शकते आणि त्याला तिला रंगेहात पकडायचं असतं. रागिणीला फोन करतो कारण तो स्वतः काही करू शकत नाही आणि मिडियात गेल्यावर त्याला वरिष्ठांवर दबाव आणता येतो.

धुरतचा पेशन्स >>> धुरत मायबोलीचे धागे वाचतात. Happy

या धाग्यावरील चाहते बघुन मालिकावाले खुश असतील. कारण काही चाहते भारीभारी प्रश्न विचारतात व यातलेच काही चाहते त्याला (मालिकावाल्यांचे काम वाचवोन) परस्पर योग्य ते उत्तरही देतात. Happy

आज परत लागला होता एपि तेव्हा लक्षात आलं की मुक्ता कार चालवत आणते आणि म्हणते की तिला अॅपची वगैरे काही माहिती नाही आणि त्या गॅरेजवाल्यालाही हा प्रश्न पडत नाही, त्याला ते महत्वाचं वाटलं नसेल. गाडी पाकपूक करून राहिली वगैरे संवाद मस्तच. पुभा काल वेगळा दाखविला व आज वेगळा असं मला वाटलं की तो माझा भास होता. काल पुभामध्ये दाखवलं की एक गाडी सदाच्या गाडीसमोर येऊन ऊभी राहते आणि सदाचं आणि त्या ड्रायव्हरचं भांडण होतं. आजच्या पुभामध्येे दाखवलं की मुक्ता त्या गाडीत बसायला जाते, गाडीचा ड्रायव्हर ऊतरून मागे येतो आणि सदा मुक्ताला लांबून बघत असतो बॅगा ठेवताना.

हे सगळं सदा नुसतंच बघत बसणार, एवढी खात्री आहे त्याला की रागिणी जिथे असेल तिथून लगेच येईल आणि बातमी करेल, आपण लांबूनच watch ठेऊया.

कारण काही चाहते भारीभारी प्रश्न विचारतात व यातलेच काही चाहते त्याला (मालिकावाल्यांचे काम वाचवोन) परस्पर योग्य ते उत्तरही देतात. Lol
@चंपा..दोन्ही सीन दाखवलेत पुढील भागात. सदा गॅरेज कडे बघत असतो पण त्याला रागिणी बॅग ठेवताना दिसते की नाही हे सोमवारी कळेलच. कारण तिथे अ‍ॅम्ब्युलन्स उभी असते.

ती गाडीही डावानेच उभी केलीय धुरतच्या गाडीशेजारी. आता तिथे बाचाबाची होईतो रागिणी पळणार अम्ब्युलन्समधून. फक्त घरी आईने राडा केलेला नसला म्हणजे झाले.

रगिणीनी घरापर्यत अ‍ॅम्ब्युलंसनी जायला नको. डावाला तिचं घर माहित होइल. तिनी वाटेत उतरुन टॅक्सी पकडून जायला पाहिजे.

खूप दिवसांनी एक छान मालिका बघायला मिळत आहे. एकही भाग चुकवू नये असे वाटायला लावणारी.....रागिणीचे कॅरेक्टर खूपच छान पद्धतीने उभारले आहे मुक्ताने. मुक्तासाठई ही मालिका पहिल्या भागापसून बघत होतेच आणि आज माबोवरचा हा धागा वाचून तर अजूनच उत्साह आलाय ही मालिका पहायचा.. सगळेजण किती रस घेऊन ही मालिका बघतात आणि चर्चा करतात, सगळ्यांनाच सलाम !

मुक्तासाठी मम. अग्निहोत्रमध्ये सॉलिड केलं तिने. बघायला हवी परत hotstar वर > - अंजूताई स्टार प्रवाहवर अग्निहोत्र पुन्हा दाखवायला सुरूवात केली होती, तेव्हा हॉटस्टारवर पण यायचे सगळे भाग, पण आता मध्येच बंद केली. चांगल्या मालिका अशा मध्येच बंद करून पुढचं पाऊल आणि तत्सम पकाऊ मालिका दाखवत बसतात हे लो, आपलंच दुर्दैव, दुसरं काय!

प्रोमोमध्ये रागिणी बॅगा काढून अम्ब्युलन्स मध्ये टाकतेय दाखवले आणि धुरत पाहायचा प्रयत्न करतोय हे दाखवले तरी धुरतला हे दिसणार नाही. एकतर तिच्या गाडीमुळेच आडोसा झालाय. धुरत तिच्या गाडीच्या उजव्या बाजूला आहे. अम्ब्युलन्स डाव्या. आणि दुसरे म्हणजे धुरतच्या समोर दुसरी गाडी पार्क झालीय. धुरत गाडीबाहेर पडून गॅरेजच्या दारात येऊन उभा राहिला तरच त्याला दिसेल. पण कथानकाच्या सोयीसाठी त्याला गाडीतच बसवून ठेवलेय. तो बाहेर पडणे सर्वात जास्त लॉजिकल झाले असते.

हो मीनाक्षी star प्रवाहच्या इतिहासात दोनच मालिका त्यांनी चांगल्या दिल्या एक अग्निहोत्र आणि शिवाजी महाराज. बाकी त्यांना अति अत्याचार, जादू टोणा, चमत्कार दाखवायला आवडतात.

सॉरी ह्या अवांतरासाठी.

पण कथानकाच्या सोयीसाठी त्याला गाडीतच बसवून ठेवलेय. तो बाहेर पडणे सर्वात जास्त लॉजिकल झाले असते. >>> मम.

आपली उत्सुकता ताणण्यासाठी कथानक उपाययोजना आहे सर्व, आपला जीव टांगणीला लागणार पण मुक्ता सुमडीत सर्व करणार.

मला वाटतं ज्या दिवशी मालिका प्रक्षेपीतही होत नाही (शनी-रवी), त्या दिवशीसुद्धा एवढ्या सुपरस्पीडने धावणारा धागा फक्त याच मालिकेचा असावा. Happy

Pages