Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराग +१
पराग +१
पोलीसही चॅनलवाल्यांशी आजकाल इतके अरेरावीने वागतात का?
तरी, कीर्तीकरांशी संबंधित काहीतरी मेजर ट्विस्ट पुढे येईल या आशेवर आहे मी अजून ...
शिवा कोण आहे? त्याला बघितलंय
शिवा कोण आहे? त्याला बघितलंय कुठेतरी. सिरीअल मात्र मस्त आहे.
शिवा म्हणजे "रात्रीस खेळ
शिवा म्हणजे "रात्रीस खेळ चाले" मालिकेतला दत्ता आहे बहुतेक.
बरोबर दत्ताच आहे तो.
बरोबर दत्ताच आहे तो.
किर्तीकरांचा खरंच अॅन्टी क्लायमॅक्स होता. मलाही वाटलं होतं की ते गुंतले असतील नक्कीच. यातल्या अनेक पात्रांना दोनेक भागांपुरतंच घेतलंय का? बाबू, बारचा मालक, किर्तीकर... सगळे आले नी गेले पण... काम करा, मरा, पैसे घ्या, जा...
पहिल्या भागात मुक्ता फारच
पहिल्या भागात मुक्ता फारच बिनधास्त दाखवली आहे. म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा ती पहिल्यांदा करतेय पण पोलिसांच्या गाडीचा आवाज एेकूनही ती अगदी आरामात सगळेे पुरावे म्हणजे तिचं सामान गोळा करते. ती जीवावर उदार आहे पण तेव्हाच पोलिसांनी पकडलं असतं तर पुढे जेलमध्ये बसावं लागलं असतं. रच्याकने, एक हसीना थी मधल्या उर्मिलाची आठवण आली.
मला असं वाटतंय कीर्तिकर मेले
मला असं वाटतंय कीर्तिकर मेले नसतील आजच्या भागात दाखवतील कदाचित ते हॉस्पिटल मध्ये आहेत असं. त्यांच्या वर फक्त हल्ला झालाय असं समजलंय पण त्यात ते मेले नसावेत . तरीही कीर्तिकरांनी त्या माणसाला घरात घेतलाय हे मात्र चुकीचं दाखवलं. कोणीही एसी दुरुस्त करायला म्हणून येईल . त्यांनी त्याच कार्ड मागायला पाहिजे होत . आणि तसही त्यांनी जर का कोणाला दुरुस्त करायला बोलावलाच नव्हतं तर संशय यायला पाहिजे होता.. पण मग त्यांच्या वरती हल्ला कसा झाला असता ? म्हणून मालिकेच्या सोयीकरता त्यांनी त्याला घरात एंट्री दिली असं दाखवलाय
गेल्या दोन भागात सागर
गेल्या दोन भागात सागर तळाशीकर दत्याला ( या मालिकेतल त्याच नाव काय ? ) ऑर्डर देताना दाखवलाय आणि दत्या बाबुला मुक्ताच्या नवऱ्याचा गेम करायला सांगतो आणि कालच्या भागात सागर तळाशीकर ला पण आणखीन कोणी तरी ऑर्डर देतोच आहे . मग मुख्य सूत्रधार कोण ? आणखीन बऱ्याच लोकांच्या एंट्र्या बाकी आहेत किरण करमरकर/ विवेक लागू /सुहास पळशीकर / सुहास शिरसाट यांची एन्ट्री अजून व्हायचीच आहे . तरी ही वाटतंय सूत्रधार ते सायकियाट्रीस डॉक्टरच नसतील ना ?
मला अजूनही वाटतंय कि किर्तीकर
मला अजूनही वाटतंय कि किर्तीकर यात इन्व्हॉल्व्ह असावेत आणि आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःवर हल्ला करवला असेल.
मेले का ते नक्की? मी परवा रात्री पर्यंतचे एपिसोड्स पाहिलेत फक्त. पण कथा वेगात पुढे सरकतेय त्यामुळे मजा येतेय बघायला.
किर्तीकर प्लॉट फारच फ्लॉप
किर्तीकर प्लॉट फारच फ्लॉप होता!
न्यूज चॅनलचा एडीटर असा एकटाच तात्त्विक गप्पा मारत फिरेल का पोलिस स्टेशन टू पोलिस स्टेशन?!
आणि शिवाय आपले पुढचे प्लॅन उघड करत?>> +1.
किर्तीकरांना मारलं कसं त्याने??? पाना मानेत घुसवून?? असं मारणं शक्य आहे?? माणूस मरु शकतो असा???
आणि त्यांचा मृत्यू अॅक्सीडंट दाखवणारे ना तो.. म्हणजे घरात पाय घसरुन पडले आणि गेले असं वाटेल. पण पान्याच्या खूणा मानेवर दोन ठिकाणी उमटणार ते नाही का लक्षात येणार??
सुजा ब्लेम गेम खेळतेयस का??
दर एपिसोड गणिक उत्कंठा
दर एपिसोड गणिक उत्कंठा टिकून आहे यात मजा आहे.
किर्तीकरांना मारलं कसं त्याने
किर्तीकरांना मारलं कसं त्याने??? >>> पान्हा डोक्यात घातला जोरात.
सूत्रधारांची साखळी एक-एक करून स्क्रीनवर येतेय ते आवडलं मला. शेवटी वर्तुळ कुठे पूर्ण होणार त्याचं गेस-वर्क करत बसायचं
पाना. पा ना.
पाना. पा ना.
पण पान्याच्या खूणा मानेवर दोन
पण पान्याच्या खूणा मानेवर दोन ठिकाणी उमटणार ते नाही का लक्षात येणार??.. कोणाच्या लक्षात येईल?
त्या ड्रायवर चा मृत्यु जसा आत्महत्या म्हणुन दाख्वला, तसे कागद्पत्र तयार केले, तसच काहीतरी करणार आताही.
पोलीस सामील आहेतच सगळ्यात.
किर्तीकरांनी आधी मिडीयातच बातमी द्यायला पाहिजे होती. याला +१.
हे प्रेझेंट मधे चालू आहे का अजुन फ्लॅशबॅक चालुये? म्हणजे मुक्ताला रहस्य उलगड्ण्यात मदत करणारे सगळे १-१ करुन मारले गेल्यावर नंतर तिने स्वतः सगळी सुत्र हातात घेतली आहेत का? (पहिला एपी).
चैत्राली, हो. पोलिस सामील तर
चैत्राली, हो. पोलिस सामील तर काय पण करु शकतात ते लोक.
फ्लॅशबॅकच चालू आहे अजून.
म्हणजे मुक्ताला रहस्य उलगड्ण्यात मदत करणारे सगळे १-१ करुन मारले गेल्यावर नंतर तिने स्वतः सगळी सुत्र हातात घेतली आहेत का?>> असंच असणार किंवा मग तिला कोणाचाच विश्वास वाटत नसणार.
तरी ही वाटतंय सूत्रधार ते
तरी ही वाटतंय सूत्रधार ते सायकियाट्रीस डॉक्टरच नसतील ना ? >>> असं दाखवलं तर एकदम मोठा ट्विस्ट होईल.
किर्तीकर पोलीसात गेले आधी ते एकवेळ ठीक, दुस-या पोलिसाकडे गेले तेव्हा माझं डोकंच सटकलं, अरे त्यापेक्षा चॅनेलवर न्युज दाखवाना, काय हा मुर्खपणा असं मी बडबडत होते. ते वाचले तर मात्र आपल्या सर्वांना संशय येतोय त्यांचा तसं काही असण्याची शक्यता आहे.
मला मुक्ता बर्वे आवडते.तिच्या
मला मुक्ता बर्वे आवडते.तिच्या बोलण्यात/आवाजाच्या टोनमध्ये एक सेक्स अपील आहे.
किर्तीकर पोलीसात गेले आधी ते
किर्तीकर पोलीसात गेले आधी ते एकवेळ ठीक, दुस-या पोलिसाकडे गेले तेव्हा माझं डोकंच सटकलं >>> आधी तुरुंगाधिकार्याकडे गेले, मग पोलीसांकडे गेले.
पूनम, हो, हो, पाना...
सागर तळाशीकर परत दिसला काल तो
कालच्या भागात सागर तळाशीकर परत दिसला पण तो मेला होता ना? हाताच्या नस कापल्यामुळे
कालच्या भागात सागर तळाशीकर
कालच्या भागात सागर तळाशीकर परत दिसला पण तो मेला होता ना? हाताच्या नस कापल्यामुळे>>आता फ्लॅशबॅक चालू आहे..मुक्ता सगळं रेकॉर्ड करतीये..आधी कायकाय झालय ते
आधी तुरुंगाधिकार्याकडे गेले,
आधी तुरुंगाधिकार्याकडे गेले, मग पोलीसांकडे गेले. >>> हो हो बरोबर, तुरुंग अधिका-याकडे असा अनुभव आल्यावर न्युज टिव्हीवर एकीकडे चालू करायला हवी होती.
आता फ्लॅशबॅक चालू आहे.>>>>
आता फ्लॅशबॅक चालू आहे.>>>> नाही पण तो बाबु मेला जेलमधे असं सांगतो शिवा म्हणजे आत्ताचेच आहे ना. त्या सिन नंतर बघितले नाही काय झाले ते
अंजली सर्वच फ्लॅशबॅक आहे.
अंजली सर्वच फ्लॅशबॅक आहे.
आज एका बैठकीत सगळे एपिसोड
आज एका बैठकीत सगळे एपिसोड पाहिले :), मुक्ता (अॅज ऑल्वेज) बेस्ट! सतीश राजवाडे आणि सागर तळाशीकर ऑलटाईम फेव्हरिट. नवीन पात्रांमधली छाया मला आवडली. सुहास पळशीकरला तर अनेक वर्षांनी पाहिलं. दिग्दर्शन मस्त आहे.
छाया पण मरणार का आता?
छाया पण मरणार का आता?
ती छाया शेजारी उगाच सांगून
ती छाया शेजारी उगाच सांगून येते. शेजारीण विश्वासू असली तरी तिला धमकावलं तर बिचारी काय करेल.
का ती ज्याच्याकडे आलीये तोच
का ती ज्याच्याकडे आलीये तोच काही दगाफटका करेल?
मला एक शंका आहे. Ozee मी
मला एक शंका आहे. Ozee मी बघीतले तर सर्व इपिसोड फक्त ५ ते ६ मिनिटाचे आहेत. खरच एवढाच वेळ असतो का इपिसोड? का Ozee वर कट करुन दाखवत आहेत. एवढाच असेल तर गंमतच आहे.. मुळात ५ मि च्या भागाकरता ३० मि चा स्लॉट. २५ मि नुसता मागे काय पुढे काय आणी जाहीराती?
मला एक शंका आहे. Ozee मी
मला एक शंका आहे. Ozee मी बघीतले तर सर्व इपिसोड फक्त ५ ते ६ मिनिटाचे आहेत>>> Webisode आहेत ते... शाळेत असताना धड्याच्या शेवटी 'आपण काय शिकलो' असायचं ना तसा प्रकार आहे तो.. Ozee वर full episodes पण आहेत available
उलट या मालिकेत जाहिरातींचे
उलट या मालिकेत जाहिरातींचे ब्रेक्स कमी आहेत असं मला जाणवलंय. ९:३० ते ९:५० सलग एक पार्ट दाखवतात, त्यानंतर मात्र लागोपाठ दोन ब्रेक्स येतात.
Webisode आहेत ते... शाळेत
Webisode आहेत ते... शाळेत असताना धड्याच्या शेवटी 'आपण काय शिकलो' असायचं ना तसा प्रकार आहे तो.. Ozee वर full episodes पण आहेत available>> हो वेबिसोड आहेत कळले. पण फुल कुठे आहेत. मला दिसलेच नाही. सभासदत्व लागते का?
Pages