श्रावणमासा

Submitted by vijaya kelkar on 7 August, 2017 - 04:51

श्रावणमासा

आज कोणी आळविला मेघमल्हार
आज उमटला पावसाचा पदकल्हार
आला श्रावणमासा फुल्हार फुल्हार

झाला रंगित पोपटी, शेवाळी,गडद हिरवा
करी गंधित जाई-जुई,चंपक आणि मारवा
आला श्रावणमासा गारवा गारवा

बांधिल्या आकाशी सातरंगी कमानी
ऐकिल्या तिथे जलप्रवाहाची गाणी
आला श्रावणमासा नाद-वाणी

हाक देती एकमेका भाऊ-भगिनी
हाक ऐकून राष्ट्राची सीमेवरती सज्ज सेनानी
आला श्रावणमासा ताठा-अभिमानी

विजया केळकर ____

Group content visibility: 
Use group defaults