डोळे झाकुन जाते जिकडे कविता नेते

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2017 - 15:28

बुडताना आधार कुण्या काडीचा घेते
तीच नेमकी बुडवत खोल तळाशी नेते

प्रेम दुरावा दु:ख यातना आणिक फसगत
पवित्र मानू जे जे पदरी पडेल ते ते

जंगलातला रस्ता आणिक वादळ वारे
पाहुया तरी मशाल कुठवर उजेड देते

सताड उघडे डोळे तरिही रस्ता चुकते
डोळे झाकुन जाते जिकडे कविता नेते

गारपीट आवर्षण आणिक अतीव वृष्टी
जागेवरुनी 'प्रिया' कुठे हालतात शेते ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users