मदत हवी आहे

Submitted by वेब on 5 August, 2017 - 16:55

मला एक प्रश्न आहे . तो योग्य धाग्यावर लिहला आहे कि नाही ते माहिती नाही जर योग्य धाग्यावर लिहला नसेल तो कुठे
आणि कसा हलवावा .
प्रश्न : २००७ साली मी आमच्या एका नातेवाईकाला एक draft दिला (Amt ४०,०००). मी कुठलेही देणे लागत नव्हती. पण काही
फॅमिली मॅटर मध्ये मदत म्हणून मी ती अमाऊंट दिली .
त्यानंतर लागलीच मी उसगावात आले. १० वर्ष मी US मध्ये आहे . एकदा भारतात आले होते १० वर्ष काहीही या विषयवार चर्चा झाली नाही.
हि अमाऊंट मी मदत म्हणुन केल्याने फोलो UP चा काही संबंध नव्हता
काही दिवसापूर्वी या नातेवाईकाने परत पैशाची मागणी केली तेंव्हा मी त्या draft ची आठवण करून दिली. तो नातेवाईक म्हणतो त्याला तो मिळाला नाही
हा DRAFT त्या व्यक्तीच्या नावाने होता बँकेकडून त्याबाबत काहीही कळले नाही याचा अर्थ गैरव्यवहार झाला नाही. हा draft दिल्यानंतर ती व्यक्ती
मला " तू हे देऊन उपकार केले नाही असे म्हणाली . मी कानाडोळा केले.
१० वर्षांनंतर मी त्या draft ची चौकशी बँकेकडे करू शकते का गेलात ५ वर्ष माझे बँकेत व्यवहार नाही पण खात चालू आहे

Group content visibility: 
Use group defaults

>> मला एक प्रश्न आहे . तो योग्य धाग्यावर लिहला आहे कि नाही ते माहिती नाही जर योग्य धाग्यावर लिहला नसेल तो कुठे
आणि कसा हलवावा .

Groups audience मध्ये "गुलमोहर - ललितलेखन" ऐवजी "माहिती हवी आहे" टाका

>> १० वर्षांनंतर मी त्या draft ची चौकशी बँकेकडे करू शकते का गेलात ५ वर्ष माझे बँकेत व्यवहार नाही पण खात चालू आहे

प्रत्यक्ष बँकेच्या हेल्पलाईन वर फोन किंवा इमेल करून विचारायला काय हरकत आहे. विचारले असेल तर त्यांचा काय रिप्लाय आला? व्यक्तिश: मला याबाबत जास्त आशा वाटत नाही. कारण इथे अख्खी बँकेची शाखाच (विशेषतः खाजगी बँक) पाच वर्षात जागेवर राहत नाही तिथे तब्बल दहा वर्षापूर्वीच्या ड्राफ्ट विषयी माहिती मिळणे दुरापास्तच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद . ती शाखा पुण्याची कॉपीआरटीव्ह बँकेची आहे आणि ती अजून तीथेच
फक्त जुना रेकॉर्ड इतके दिवस ठेवतात का हा प्रश्न आहे .

अनपेड ड्राफ्टचा रेकॉर्ड असायला हवा (ड्राफ्ट अनपेड आहे, हे गृहीत धरून). ड्राफ्टचे तपशील तुमच्याकडे असले, तर शक्य आहे.

बँका जुने रेकॉर्ड ठेवतात. तुम्ही त्यांना सर्व केस सांगा. मॅनेजरला. कांउंटरवरच्या व्यक्तिला नाही. अगदी लगेच नाही, पण ते जुने रेकॉर्ड मिळवू शकतात. तुम्ही ज्यांना पैसे दिले, त्यांनी उपकार केले नाही वगैरे भाषा केली असेल तर , ते पैसे त्यांना नक्की मिळाले आहेत, आणि परत करायला नकोत म्हणून ते न मिळाल्याचं नाटक करत आहेत असं आपलं माझं मत.
परत त्यांना किंवा कुणालाही पैसे देताना काळजी घ्या.

तुम्ही स्वतःच त्या व्यक्तीच्या हातात ड्रफ्ट दिला असाल तर मग तो मिळाला त्यांना. त्यांना त्याच्यावरचे पैसे मिळाले नसते तर त्यांनी तुम्ही us मध्ये असला तरी पैसे मिळाले नाही म्हणून कळवले असते. त्यांच्या हातून हरवला असता तरी कळवले असते. तुम्ही कोणा तिसर्याच्या हातून ड्रफ्ट दिला असेल तर कदाचित तो न मिळण्याची शक्यता आहे. तिसर्याच्या हातून हरवला/द्यायचे राहून गेले व ज्याच्यासाठी होता त्याला तुम्ही दिलाच नाही वाटून त्याने तुम्हाला विचारले नसावे. अशा वेळी बँकेत जुने रेकॉर्ड बघावे लागतील. वेळ लागेल पण मिळतील.

लोक मदतीची हक्काने अपेक्षा ठेवतात व वर उपकार करत नाहीयेस हे का बजावतात कळत नाही. तसेही कोणीच कोणावर उपकार करत नसते, अगदी मदत करत असले तरी स्वतःची मदत करण्याची इच्छा/गरज म्हणून मदत करत असते. मग ही मदत स्वीकारून वरून असे उद्गार काढायचा कृतघ्नपणा का करावा?

There would be a record in bank whether it's cleared or unrelated. You may need extensive follow-up to find out the status of the draft (I am assuming draft meant demand draft)

प्रतिक्रियांबाबत धन्यवाद .
मला पैसे परत नको. त्या व्यक्तीला ते मिळाले हे नक्की आहे .
फक्त त्या व्यक्ती ला त्याच्या खोटेपणाचा/ढोंगीपणाची आठवण करून द्यायची आहे

<<<लोक मदतीची हक्काने अपेक्षा ठेवतात व वर उपकार करत नाहीयेस हे का बजावतात कळत नाही.>>>
असतो एकेकाचा स्वभाव.
जर पैसे पाठवले असतील तर ते मिळाले हे सांगणे हे सुद्धा काही लोक आपले काम समजत नाहीत. आपण विचारले तर "हो, हो. माहित आहे तू पैसे दिलेस म्हणून काय येता जाता आठवण करून देतो आहेस का? आम्ही काय जन्मभर तुझे ऋणी रहायचे का?" असेहि बोलणारे लोक आहेत.
म्हणूनच -
<<<तसेही कोणीच कोणावर उपकार करत नसते, अगदी मदत करत असले तरी स्वतःची मदत करण्याची इच्छा/गरज म्हणून मदत करत असते. >>>
हे समजून असावे, नि मगच मदत करावी!