मित्रांसाठी मदत हवी आहे.

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 5 August, 2017 - 08:56

माझ्या काही मित्रांबाबत मला मदत हवी आहे. समस्त मायबोलीकरांना विनंती की आपण मला मदत करावी.

मित्र क्र. 1 - वय 25 वर्षे 7 महीने, कामधंदा - काहीही नाही. इ. 12 वी नंतर एका चांगल्या संस्थेमधून 'हार्डवेअर आणि नेटवर्किंग' चा कोर्स केला. डिसेंबर 2012 मध्ये कोर्स पूर्णही झाला. तेव्हापासून आजतागायत नोकरी वा स्वतः चा व्यवसाय वगैरे काहीही करत नाही. (नाही म्हणायला एका ठिकाणी डिलिव्हरी बॉय म्हणून 3-4 महिने नोकरी केली, व नंतर अचानक सोडून दिली.) स्वतः च्या वडीलांना मात्र असे भासवतो की, मी नोकरी करतो. त्यासाठी वडील घरी येण्याच्या वेळी फॉर्मल कपडे घालून, बॅग घेऊन बाहेर जातो. घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यामुळे त्याचे हे कारनामे लक्षात येत नाहीत. दुर्दैवाने त्याची आई त्याला काही बोलत नाही, कारण त्यांना अशी भीती वाटते की, मी (आई) किंवा त्याचे वडील त्याला काही बोलले तर तो घर सोडून निघून जाईल किंवा जीवाचे काही बरेवाईट करून घेईल (त्याचे वडील थोडे तापट आहेत) . मी त्याला अनेकदा नोकरी न करण्याबाबतची कारणे विचारली तर मनमोकळेपणाने बोलत नाही. तो स्वतः च्या आयुष्याची अशी वाट लावून घेतो, हे मला पाहवत नाही.

मित्र क्र. 2 वय (साधारण 20 वर्षे) इंजेक्शन घेण्याची भारी हौस! (आजकाल लोकांना कसली हौस असेल सांगता येत नाही.) इतकी हौस की, कधीतरी डॉक्टरने दिलेले इंजेक्शन पुरेसे नाही म्हणून हा मित्रांकडून इंजेक्शन घेतो. एकदोनदा त्याने मलाही त्याच्या पार्श्वभागावर इंजेक्शन द्यायला सांगितले. त्याला कुठल्याही अंमली पदार्थाचे व्यसन नाही, इंजेक्शन घेतानाही त्याने माझ्यासमोर सीलबंद बिसलेरीची बाटली उघडून त्यातील पाणी भरले. म्हणजे ही शक्यता देखील नाही. मग तो इंजेक्शन का घेतो? पाण्याचे इंजेक्शन घेऊन त्याला काय मिळत असेल? बरे, इंजेक्शन तरी लहानसे घ्यावे ना! हा पठ्ठ्या 10ml ची 3-4 इंजेक्शनस् अगदी सहज घेतो. (इथे डॉक्टरकडे गेल्यावर एक लहानसे इंजेक्शन घ्यायचे म्हटले तरी हृदयाचे ठोके वाढतात!) त्याची ही विनाकारण इंजेक्शन घ्यायची सवय कशी मोडावी?? की मी इंजेक्शनला घाबरतो म्हणून मुद्दाम मला चिडवायला तो माझ्याकडून इंजेक्शन घेत असेल????

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहीली केस--- आई बाप मेल्यावर ,पैसे नसल्याने भूकेने पोटात आगडोंब उसळल्यास काम करणे किंवा भीक मागणे यापैकी एकतरी काम तुमचा मित्र करेल याची १००% हमी मी देतो.

दुसरी केस--- पार्श्वभाग त्याचा ,इंजेक्शन त्याचं,मिनरल वॉटर त्याचं ,तुमचं काय जात आहे यात?

दुसऱ्या केस मध काही इससू वाटत नाही आहे... at least ड्रग्स तर घेत नाहीय.
पहिल्या केस मध्ये वडिलांना सांगणे हाच उपाय आहे मग तो घर सोडून का जाईना..

१ शंका.

इथे केलेली मदत तुम्ही त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवणार आहात?

पहिला प्राणी कठीण आहे त्याबद्दल नंतर.

दुसरा. याला बिसलरीच्या पाण्याची इंजेक्शने घेऊन आत्तापर्यंत बुडावर/इंजेक्शनच्या जागी असंख्य अर्बुदे झाली असतील. कारण ते पाणी निर्जंतुक नाही. दुसरे, ते 'आयसोटोनिक' नसल्याने प्रचण्ड दुखणार.

आणखी एक शंका... मित्रांसमोर पार्श्वभाग उघडा टाकायला त्याला आवडत असेल? आणि तुम्ही का त्याच्या ढुंगणावर इंजेक्शन द्यायला होकार देताय..

दुसरा किस्सा ईंटरेस्टींग आहे. मित्राला आनंद नक्की कुठली गोष्ट देत असावी हे पहिला शोधायला हवे.

१) ईंजेक्शनची सुई टोचल्याने होणारी हलकीशी वेदना
२) शरीरात सुळसुळत शिरणारे पाणी
३) ईंजेक्शन नेहमी ठराविक जागीच घेत असेल तर त्या जागेशी काहीतरी संबंध असू शकतो.

एखादा ओळखीचा डॉक्टर गाठून त्याच्याशी बोलून बघा. मानसोपचारतज्ञाकडे जायची घाई करू नका.

पहिल्या किश्यात आईला माहीत आहे आणि घरची परिस्थिती चांगली आहे तर टेंशन घेण्यासारखे काही नाही. असे मला वाटते. फक्त मित्र म्हणून या काळात वाईट मार्गाला लागणार नाही याची काळजी घ्या. वय पंचवीस आहे तर अजून दोन तीन वर्षांनी मुलगीशोध सुरू होईल घरून. तेव्हा सारे काही सेट होईल आपसूक. अर्थात आताही गर्लफ्रेंड असती तर सारे प्रश्न आताच सुटले असते. पोरी आपल्याला सांभाळतात.

अजून दोन तीन वर्षांनी मुलगीशोध सुरू होईल घरून. तेव्हा सारे काही सेट होईल >>>>
"चोच देईल तो चारा देईल " या धर्तीवर मुलगी देईल तो नोकरी देईन वगैरे विचार आहेत का?

मुलगीवाल्यांना सगळे सांगावे लागते ना की पोरगा काय करतो वगैरे.. आणि मुलगीवाले स्वत:ही बाहेरून चौकश्या करतात. तर तेव्हा काही लपून राहणार नाही.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!!

@ आ. रा. रा., 'अर्बुदे', 'आयसोटोनिक' म्हणजे काय?? आणि बिसलेरीचे पाणी निर्जंतुक नसते? RO, UV treated असते ना?

@ ऋन्मेऽष, शरीरात सुळसुळत शिरणारे पाणी??? माझ्या अनुभवानुसार syringe मधील औषध शरीरात जातानाच सर्वाधिक वेदना होतात. त्यातून 'आनंद' कसा मिळू शकतो???

औषध शरीरात जातानाच सर्वाधिक वेदना होतात. त्यातून 'आनंद' कसा मिळू शकतो???
>>>><
तोच तर.. त्या वेदनेतून मिळणारा आनंद. नशा म्हणजे आणखी काय. दारू कडवट असते. पण पिणारयाला आनंद देते. चरस गांजाही काही मधाचे बोट चाखल्यासारखे लागत नसणार, पण जो नशा करतो त्याला आनंद देतात. सिगारेट गुटखा तर वासानेच मला मळमळायला होते. पण लोकांना मिळणारा आनंद ईतका अफाट असतो की सोडता सोडवत नाही. ईतकेच कश्याला, दोन जीवांचे मीलन, आपलं ते ईंटरकोर्स, ते सुद्धा वेदनादायी असते असे ऐकलेय, पण परमोच्व आनंदाचा क्षणही तोच देतो असे वाचलेय. तर मित्रा जी व्यक्ती ईंजेक्शनमधून आनंद उचलते ती नक्कीच एखाद्या वेदनेतून आनंद उचलत असणार. ही थोडी एबनॉर्मल केस असल्याने मित्रांचे सल्ले कामाचे नाहीत. डॉक्टरच गाठा !

मित्र क्र. १ - घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अर्थार्जनाची गरज नाही. म्हणून हि वृत्ती. तो कुणाला मानतो किंवा कोणाचे ऐकतो? तेच त्याचे चांगले प्रबोधन करू शकतात. पण तरीही फरक पडेलच याची खात्री नाही. माझ्या पाहण्यात अनेक सुशिक्षित व्यक्ती आहेत. जबाबदारी पडूनही कामधंदे करत नाहीत.

मित्र क्र. २ - स्वत:ला इजा करून घेण्याची हि व्याधी आहे. त्वरित चांगल्या मानसोपचारतज्ज्ञचा सल्ला घ्या.

मित्र क्र. २ : ही शक्यताही असू शकते. वर ऋन्मेष यांनी उल्लेख केला आहे त्याबद्दल या लेखात जास्तीची माहिती सापडेल. त्यांनी सांगितलेली "नशा" ज्यामुळे व्यसनाधीन होणे आणि ही गोष्ट यात फरक आहे.
Behaviors associated with Sexual Masochism Disorder can be acted out alone (e.g., binding, self-sticking pins, self-administration of electric shock, or self-mutilation) or with a partner (e.g., physical restraint, blindfolding, paddling, spanking, whipping, beating, electric shock, cutting, pinning and piercing, and humiliation ...

आपल्या आयुष्याचे काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वरील दोन्हीं बाबींमध्ये तुम्ही सोडल्यास बाकी कोणालाही त्रास नाहीय. तुम्ही स्वतःलाच समजवा व मित्रांना जे वाटते ते त्यांना करू द्या.

उद्या तुमचे हे मित्र आमचा मित्र आम्हाला हवे तसे आयुष्य जगायला देत नाहीय, काय करावे म्हणून इथे धागे काढतील.

उद्या तुमचे हे मित्र आमचा मित्र आम्हाला हवे तसे आयुष्य जगायला देत नाहीय, काय करावे म्हणून इथे धागे काढतील. >>> Lol

पहिल्या मित्रावर एखादी गंभीर जबाबदारी टाकुन बघायला सांगा त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला

दुसर्याला डॉककडे घेवुन जा
बाकी तो दुसरा मीत्र तुमच्या आयडीला अगदी.समर्पक असा वाटतो

पहिल्या मित्रावर एखादी गंभीर जबाबदारी टाकुन बघायला सांगा त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला>>>>>>

काहीही उपयोग होत नाही हा स्वानुभव आहे. जवळच्या नात्यात आहे एक, लग्न लावून दिले, मग पोर झाले तरी हा ढम्या ढिम्मच... कसलीही जबाबदारी नको , काहीही कमवायला नको पण खायला ल्यायला मात्र फर्स्ट क्लास हवे हा आग्रह, मग खर्च कोणीही करु दे. डबल ग्रॅज्युएट आहे पण घरी पडून खातोय.

आपण दुसऱ्याच्या खर्चाने खातोय याची लाजतर नाहीच उलट हक्क असल्यासारखे वागणे. बायको, पोरे लाथ घालून हाकलवू शकतात असल्या नवऱ्याला व बापाला पण आईवडील टाकून नाही देऊ शकत, पोर कितीही अवगुणी निघाले तरीही. असले लोक कधीही सुधारत नाहीत.

असले लोक कधीही सुधारत नाहीत.
>>>>
खूप पटकन काढलेला आणि जनरलाईज केलेला निष्कर्श आहे.
जेव्हा आपल्याला एखाद्याच्या बिघडण्याचे नेमके कारण समजत नाही तेव्हा आपण भलतेच उपाय करत बसतो आणि कधीही न सुधारणारी केस आहे बोलून डिक्लेअर करतो.
पेशन्स हवेत अश्या व्यक्तीला सुधरवायला आणि मुळात आपल्याला तसे मनापासून वाटणे गरजेचे.
अर्थात या अमुक केस मध्ये काय केले पाहिजे हे सांगावे ईतका तज्ञ वा जाणकार मी देखील नाही, पण लोकं जशी बिघडतात तशी सुधारतातही यावर माझा विश्वास आहे. त्यामागे काही जेनेटीक्स डिफेक्ट असेल तर अवघड मात्र बाह्य परीस्थिती जबाबदार असेल तर त्यामुळे विचारांत होणारे बदल पूर्ववत करता येतात.

ऋ, मी वर जो लिहिलाय तो स्वानुभव लिहिलाय, तुम्ही जे लिहिताय ते जनरल लिहिताय. मी ज्यांच्याबद्दल लिहिलाय त्या घरातले पुरुष सगळेच तसेच आहेत. जेनेटिक प्रॉब्लेम. घरातल्या बायका कमावताहेत आणि पुरुष त्यावर आरामात बसून जनहिताच्या गप्पा मारताहेत. बिछान्यात पडून क्रांती करणारेत.

माणसे जरूर सुधारतात, पण केव्हा? जेव्हा त्यांना सुधारावेसे वाटते तेव्हा. आवल्याला मनापासून काहीही वाटून काहीही फायदा नाही. ज्याला खायचे प्यायचे चांगले कपडे सुंदर बायको वगैरे सगळे हवेय आपल्याला हे कळते त्यांना नेमके आपणही घराची काहीतरी जबाबदारी उचलायला हवी हे कळत नाही यावर कोण विश्वास ठेवणार? आपलीही जबाबदारी आहे, हे जोवर त्यांना वाटत नाही तोवर उपदेश करून नो फायदा. जे वागणे आपल्याला चूक वाटते ते त्यांच्यालेखी बरोबर असते. मीही उपदेश करून करून थकले, उपदेश करते म्हणून वारंवार शिव्याही घेतल्या आणि शेवटी विषय बंदच करून टाकला. जो तो आपल्या नशिबाचा. इथे परत तीच तशीच केस आणि तेच ते उपाय सुचवलेले बघून एकाच वेळी हसूही आले आणि उद्वेगही वाटला.

पहिल्याच्या बापाला सांगा सरळ.

पहिल्याच्या बापाला सांगा सरळ. आणि दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडला सांगा.
दोन दिवसात प्रॉब्लेम सरळ होतो का नाय बघा............

साधना ओके,
आपली पोस्ट पुन्हा वाचली. पहिल्या पॅराग्राफच्या सुरुवातीलाच स्वानुभव असे लिहिले आहे. पुढे मात्र जनरलाईज स्टेटमेण्ट वाटले. अर्थात ते त्याच संबंधित उद्वेगाने आले असावे.

<<<< माणसे जरूर सुधारतात, पण केव्हा? जेव्हा त्यांना सुधारावेसे वाटते तेव्हा >>>> अगदी बरोबर. आणि आपण याला एखाद्याला सुधरवण्याची पहिली पायरी बोलू शकतो. त्याला स्वत:ला जाणीव करून देणे.

उद्या तुमचे हे मित्र आमचा मित्र आम्हाला हवे तसे आयुष्य जगायला देत नाहीय, काय करावे म्हणून इथे धागे काढतील

अशी सुतरामही शक्यता नाही, कारण पहिला मराठी माध्यमातून शिकला असला तरी अवांतर वाचन नावाचा काही प्रकार असतो हे त्याच्या गावीही नाही! दुसरा तर इंग्रजी माध्यमातून शिकला आहे, त्यामुळे मराठीत पास व्हायची बोंब! धागा काढणे शक्यच नाही!!!

स्वतः च्या वडीलांना मात्र असे भासवतो की, मी नोकरी करतो. त्यासाठी वडील घरी येण्याच्या वेळी फॉर्मल कपडे घालून, बॅग घेऊन बाहेर जातो. घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यामुळे त्याचे हे कारनामे लक्षात येत नाहीत. >> सॉरी , पण मला तर मित्रापेक्शा त्याच्या वडीलांना मदतीची जास्त गरज आहे वाटतं .
मुलगा नोकरी करतो , कुठे करतो , घरात त्याचा पगार किती येतो , कुठून येतो , कधी येतो ..याची चौकशी ही ते करत नाही . फारच विचित्र आहे .

पहिल्या मुलाच्या आईला सांगा की मुलाला अजिबात मदत करु नको. खरंतर त्या बाई मुलाच्या गुन्ह्यावर पांघरुण घालत आहेत. काही केले तरी आपली आई आपल्या बरोबर आहे, हा विश्वास मुलाला आहे त्यामुळे तो काहीही करायला तयार आहे.

राग आला तर घर सोडून जाईल तर जाऊ दे त्याला! त्यानिमित्ताने कमवून किंवा भिक मागून कसे खायचे हे तरी त्याला कळेल.

त्याच्या आईला वाटत असेल की लग्न केल्यावर तो सुधारेल, पण म्हणून लग्न अजिबात लावून देऊ नका. एका निरपराध मुलीचे आयुष्य उगाच वाया जाईल.

तूर्तास सांगणे एवढेच की जमल्यास त्या मुलाच्या आईलाच समुपदेशकाची गरज आहे.

दुसर्‍या मुलाला शक्यतो एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा.

*

इंजेक्शन मध्ये एखद्या वेळेस चुकुन थोडी हवा राहिलि तर दुसर्‍याचं अवघड आहे....
म्हणजे???? नक्की काय?

फार काही नाही, पण हवेचा बुडबुडा शरीरात जाऊन गुदगुल्या करतो Happy

इंजेक्शन भरायचे काम तो मुलगा स्वत: करत असावा.
यांना हवा राहिली की काय होते हे माहीत नाही. यांच्याकडून ईंजेक्शन भरायचे काम तो मुलगा करत नसावा.

पहिल्या प्रकारात मुलाची नाही त्याच्या वडिलांची चूक आहे. मुलगा नक्की काय करतो हे सुद्धा ज्याला समजू शकत नाही तो बाप कसला? हल्ली माणसं खूप बिझी वगैरे असतात वगैरे कारणे देतात. पण इतके बिझी कि बुडाखाली काय जळतंय ते हि कळू नये?

दुसऱ्या प्रकारात, स्वत:हून कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन घेणे चुकीचे आहे. पाण्याचे वगैरे घेणे तेही पार्श्वभागात तर निव्वळ मूर्खपणा. ज्याला त्याला त्याचे हवे तसे आयुष्य जगू देण्याच्या नावाखाली दुर्लक्ष करणे चूक आहे. कारण हि त्याची कृती चुकीची आहे. ताबडतोब संबंधित जबाबदार व्यक्तींशी याबाबत बोला.

जगातली प्रत्येक मुले आपल्या आईबापांना न कळता आयुष्यात बरेच धंदे करतात. आपणही केली आहेत. आणि आपली मुलेही करतील वा करत असतील. यात काही नवल वगैरे नाही.

पहिल्या प्रकारात मुलाची नाही त्याच्या वडिलांची चूक आहे. मुलगा नक्की काय करतो हे सुद्धा ज्याला समजू शकत नाही तो बाप कसला?
>>>>
बापाला फसवतात पोरे... कित्येक मुले दारू पितात,गांजा ओढतात, बापाला कळेलच असे नाही...

@ चिखलु, तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटवू का त्या दोघांना? शिवाय माझे बँक पासबुक पण दाखवतो!

शिवाय माझे बँक पासबुक पण दाखवतो!>>>
त्याने काय सिद्ध होईल?
@ चिखलु,
माझा पहिला मित्र काहीही कामधंदा करत नाही, मी माझे पासबुक दाखवल्याने हे सिद्ध होईल की मी तो पहिला मित्र नाही!

(अर्थात मी पहिला मित्र नाही, हे सिद्ध करण्यासाठी बँक पासबुक दाखवू शकतो. दुसरा मित्र नाही हे सिद्ध करण्यासाठी काही दाखवू नाही शकत!!! Proud Proud :P)

सरा मित्र नाही हे सिद्ध करण्यासाठी काही दाखवू नाही शकत!!! Proud Proud :P)
>>>>>>

दाखवूही नका...
नाहीतर ते दाखवलेले तुमचेच आहे हे सिद्ध करायचा दुसरा राऊण्ड सुरू होईल