तूला त्याचे काय?

Submitted by निखिल झिंगाडे on 1 August, 2017 - 21:55

आहे माझे प्रेम तूझ्या वर तूला त्याचे काय
नाही झाला मेळ मनाचा तूला त्याचे काय

राज्य आहे नराधमांचे राज्यच हे रावणाचे
चालू आहे छळ जनाचा तूला त्याचे काय

काय होतास तू रे काय झालास तू आता
फिरलाय वासाही घराचा तूला त्याचे काय

मोठी किंमत मोजावी लागेल प्रेमाची मला
मी घेतला फास परंपराचा तूला त्याचे काय

रोज होतोय अत्याचार होतोय भ्रष्टाचार
जाईल जीव ही कुणाचा तूला त्याचे काय

रात्र वैर्याची संपेल ही.. होईल पहाट मित्राची
जळेल कोपरा ही मनाचा.. तूला त्याचे काय

Group content visibility: 
Use group defaults