कधी ?

Submitted by vijaya kelkar on 31 July, 2017 - 01:31

कधी ?

एक स्मृती चित्र रेखाटलं कागदावरी
रंग वठतील कां मनापरी ?
स्वप्नसृष्टीस पहाट जागे करी
दृष्टीस पडेल काही त्यापरी ?
भावना अबोल असती मनात कितीतरी
करता येतील बोलके कवीपरी ?
तारे सतेज लकाकती दूर अंतरावरी
उभा राहील कोणी जवळी शेजारी ?
चिंताग्रस्त तन-मन टाकले भूमीवरी
होणार काय भीष्म शय्येपरी ?
दाट धुक्याच्या भिंतीपार जाणार कसे तरी
जमेल का चालणे अन्धापरी ?
दिली वचने गोड कितीतरी
ठरतील काय गुळवेलापरी ?
किती लढाया लढायच्या अजुनी संसार सागरी
विजयी होईन न कधीतरी ? आतातरी ?
विजया केळकर ___

Group content visibility: 
Use group defaults