पुणे/मुंबई ते उसगाव प्रवासात सोबत शोधत आहे

Submitted by Bagz on 28 July, 2017 - 16:56

ऑगस्टच्या उत्तरार्धात कोणी पुणे/मुंबईहून अमेरिकेला येणार आहे का? माझ्या आईला प्रवासात सोबत मिळणार असेल तर ती येण्याचा विचार करत आहे. (ईस्ट कोस्ट, विशेषतः मुंबई-न्यूयॉर्क विमान असेल तर फारच बरं. यू.स. मधे मी कुठेही येऊ शकते तिला न्यायला.) कोणी असेल तर कृपया मला वि.पू. करावे.

Group content visibility: 
Use group defaults

मदतीसाठी उसगाव शीर्षक बदलून यू एस, अमेरीका असे करा.. अर्थात प्रत्येकाला हे नाव माहीत असेलच तर प्रश्न नाही..

शुभेच्छा

धन्यवाद हर्पेन!
ऋन्मेषभाऊ, उसगाव हा शब्द मी मुळात माबोवरच शिकले Happy

Immihelp आणि simplyglobal.com चेक करा. माझे आई वडील पण येणारेत, पण आँक्टोबर मध्ये. शिवाय, ते पण पहिल्यांदाच येणार आहेत

माझे विमान तिकीट आणि Visa काढून देत असाल तर आवडेल मला तुमच्या आईसोबत अमेरिकेला यायला!!! Proud Proud Proud

>>Immihelp आणि simplyglobal.com चेक करा. माझे आई वडील पण येणारेत, पण आँक्टोबर मध्ये. शिवाय, ते पण पहिल्यांदाच येणार आहेत
धन्यवाद. नक्की चेक करते ह्या दोन्ही ठिकाणी.

>>माझे विमान तिकीट आणि Visa काढून देत असाल तर आवडेल मला तुमच्या आईसोबत अमेरिकेला यायला!!!
चालेल - तुमची सगळी वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, प्रॉपर्टी डिटेल्स वगैरे पाठवा.. visa होऊन जाईल मग एखाद्या आठवड्यात. मग लगेच तिकिट काढू. Lol Lol
<वि. सू.: हा जोक आहे बरं! :)>

Bagz - कदाचित तुम्हाला माहित असेल पण तरीही सांगतो..एअर इंडिया डायरेक्ट फ्लिईत आहे मुंबई ते नुवर्क...
वहिलं चेयर दिकलेर करा... आरामात प्रवास होईल, सोबतीची गरज नाही पडणार.. ते लोकच काळजी घेतिल

>>एअर इंडिया डायरेक्ट फ्लिईत आहे मुंबई ते नुवर्क...
हो, ह्या फ्लाईट बद्दल मी बोलले होते आईला.. पण तरी तिला एकटीला यायची भीती वाटते.

हो, ह्या फ्लाईट बद्दल मी बोलले होते आईला.. पण तरी तिला एकटीला यायची भीती वाटते.>> खरेतर हाच प्रश्न आहे.. आणि या मुळेच पहिल्यांंदा प्रवास करणाऱ्यांना सोबत हवी असते. अनेकदा प्रवासा दरम्यान सुद्धा ओळखी होतातच, आणि मदत मिळु शकते.

माझी आई मागच्या वर्षी इथे येऊन गेलीय. पण जाता-येता दोन्ही वेळेला मी बरोबर होते. ती एअरपोर्टमधे एकटी पाऊल ठेवेल असं मला वाटत नाही. Happy
असो. इथे पुष्कळ माहिती मिळाली. या धाग्यावर्/वि.पू.त/ ईमेल वर ज्यांनी माहिती पाठवली त्यांचे खूप आभार!!

खरं आहे.
दरवेळी काही तरी नवा गोंधळ असतो. मला गोंधळ आवडतो पण त्या केयोस मधून वाट काढत ज्ये. ना. नी जाणे हे कंटाळवाणे आणि ओव्हर वेल्मिंग असू शकते.

Hi. I just came for first time in april with 2 kids n many bags.

There is a wheelchair facility (paid) available at Mumbai airport. Cost is approx 850 INR only. They take care of everything. It is best. U can ask her to take that. They drop u till gate after u finish all airport formalities. It's great help.

मला तरी मुंबई / हैदराबाद / लंडन एअरपोर्ट वर व्हीलचेयर चा अतिशय बेकार अनुभव आहे . विमानातून उतरताना फार काळ ताटकळत ठेवतात. वेटिंग एरिया / गेट याच्या मधेच कुठेतरी एका बाजूला सगळ्या व्हीलचेअर वाल्यांना एकत्र बसवून ठेवतात. खरोखर फिजिकल लिमिटेशन नसेल तर व्हील चेअर घेऊ नये. मदत कमी , कटकट जास्त . शिवाय टिपच्या अपेक्षा अवास्तव ! विमानतळावर चेक इन च्या आसपास कोणी ना कोणी सोबत शोधणे बेटर.

पोर्शिआ मेडिकेअर किंवा तत्सम सर्विसेस घरबसल्या एल्डर केअर सर्विसेस पुरवतात त्यांना आईंना घरून पिक अप करून एअर पोर्ट वर सोडायला सांगा चेक इन केले की मग एअर्लाइनला रिक्वेस्ट करता येइल.