अगा अनादि अनंता

Submitted by अनन्त्_यात्री on 27 July, 2017 - 01:52

प्रवासाच्या प्रत्येक
वाकणा-वळणावर
तुझ्या भेटीचे भास

हमी होती तू.......
भोळ्या भक्तीतून भेटशील,
कठोर कर्मकाण्डातून कळशील,
उपभोगाच्या उबगातून उमजशील,
गहन ग्रंथांतून गवसशील,
प्रखर प्रज्ञाचक्षूंना प्रतीत होशील,
प्रकाण्ड प्रमेयांतून प्रकटशील....

पण तू तर..
श्रद्धेच्या सोन-साखळ्या सैलावून
तर्काच्या तटबंद्या तटातट तोडून
नि:शेष निसटलास

मला मात्र..
अपेक्षाभंगाच्या आवर्तात
वंचनेच्या वावटळीत
भ्रमनिरासाच्या भोवऱ्यात
भोवंडत, भरकटत ठेवून........

ऐक आता...
स्वतःला सावरून
आस्तिकता अव्हेरून
नास्तिकता नाकारून
निघालोय.....अज्ञेयाच्या अनन्त यात्रेला

Group content visibility: 
Use group defaults

छान ! Happy
पण कविता ललित लेखनात का लिहिताय???

-मेघा., आभार.
-लिहिताना कविता व ललित-लेखन यातली सीमारेषा पुसट झाल्यासारखी वाटली म्हणून !

क्लास लिहीलंय...
अलक्षाकडे वाटचाल! सिद्धांतासाठी! हिच खरी अनंत यात्रा असते..
शुभेच्छा.. Happy

खरोखरीच्या अनंताच्या शोधयात्रेला निघाला असााल तर ज्ञानोबा —तुकोबांनी उदंड मार्गदर्शन करून ठेवलंय.... ते समजून वाचलंत तर वर लिहिलंत तशी फरफट होण्याची शक्यताच नाही..... असे माझे वै मत....
चूकही असेल माझे मत.....

खरोखरीच्या अनंत यात्रेला निघाला असााल तर ज्ञानोबा —तुकोबांनी उदंड मार्गदर्शन करून ठेवलंय.... ते समजून वाचलंत तर वर लिहिलंत तशी फरफट होण्याची शक्यताच नाही... >>>>+१११११