हळदी कुंकू

Submitted by mrsbarve on 26 July, 2017 - 05:26

हळदी कुंकू

चैत्र महिन्यातलं हळदी कुंकू म्हणजे लहानपणातला आनंदाचा एक ठेवा! ती आंब्याची डाळ,पन्हे,काकडीच्या चकत्या,वडाच्या झाडाच्या पानावरची चाखत माखत खाल्लेली डाळ ,आरास ,नवे नवे ठेवणीतले कपडे ! ती अत्तरदाणीतली अत्तरे,आणि गुलाब पाण्याचा शिडकावा !नटून थटून हळदी कुंकवाला आलेल्या बायका,त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद !हळदी कुंकू म्हणताच कि हे सगळ् आठवलं आणि आपण पण एकदा हळदी कुंकू करूया इथे अस माझ्या मानाने घेतले.

खूप वर्षांपूर्वीची हि गोष्ट !तेंव्हा नुकतच लग्न झालेले होतं ! इकडे नवी नवीच आलेली होते .हळदी कुंकवाच्या निमित्ताने नव्या ओळखी होतील असही वाटलं आणि भर स्नो मध्ये संक्रांतीच हळदी कुंकू ठरवलं.अगदी दूर दूर आमंत्रणे गेली!अर्धा पाऊण तास ड्राइव्ह करून बायका मुले जमली. मी काळी साडी नेसून तयार झाले.

झकास जीन्स मध्ये आणि टी शर्ट मध्ये आलेल्या बायकांच्या मी ओट्या भरल्या,बाकी इतक्या स्नो मध्ये त्यांनी साड्या नेसून यावे हि अपेक्षाच चुकीची होती.त्यामुळे मी माझी साडी मिरवून घेतली!:) प्रत्येकीला ट्प्र्रवेअरचा सेट ,मग डिश म्हणून पावभाजी अन फ्रुट सलाड अस सगळं मला जमेल तसा जा मा निमा केला. छोट्या मुलांचे बोरन्हाण केले ,गम्मत गम्मत ,मजा आली. बायका खुश होऊन घरी गेल्या.

संध्याकाळी मी खुशीत सासरी फोन केला आणि आनंदाच्या भरा तचं हळदी कुंकू केले, कसे छान झाले ते सगळे सांगितले.सासूबाई म्हणाल्या ,"तू कशाला एकेक नव्या प्रथा तयार करतेयस? आम्ही इकडे करतो ना हळदी कुंकू,तुला तिकडे करायची गरज नाही .! मी गप्पच झाले,नाही गेट टुगेदर ..अस अडखळत म्हणाले.तर त्या म्हणाल्या मग फक्त गेट टुगेदरच करायचयं ना... हळदी कुंकू कशाला..?

मग नवरोजींना पण एक लेक्चर मिळाले. कशा तुम्ही एकेक नव्या प्रथा तयार करता आणि त्याचा आम्हाला त्रास होऊ शकतो वगैरे वगैरे... त्याने हो म्हंटल ! मी थक्कच झाले .लग्न होऊन महिनाच होत होता ,अजुनी आमचि भांडणे व्हायला सुरुवात नव्हती.:) त्यामुळे मी आपली गप्प गप्प! आठ दिवस असेच गेले.

नवरोजी हापिसातून घरी येणार म्हणून मी खिडकीत वाट पाहात बसले होते,मी दार उघडायला खाली गेले तर हसत हसत माझ्या समोर एक मोठा बॉक्स हातात ठेवून म्हणाला ,'गेस काय आहे गिफ्ट?" मी तो बॉक्स उघडून बघितला तर ,पहाते ते काय आत पु.ना.गाडगीळांचा बॉक्स !माझी कळी खुलली !आत येऊन बॉक्स उघडला आणि पहा ते तर काय !मस्त पैकी अत्तरदाणी ,गुलाब दाणी सेट!

'दर वेळी आईचं ऐकायला पाहिजेच असं नाही '"तुला हवे ते हळदी कुंकू नक्की कर "तो म्हणाला !आणि मी अत्यानंदाने त्याला बिलगले!अ त्तर दाणीचा सुगंध आणि गुलाब दाणी चा सुरेख शिडकावा एकाच वेळी होत होता.

गेल्या आठ दिवसात त्याला न सांगितलेले मळभ कुठल्या कुठं पळून गेलं होतं !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

baryachda sun gharat ali ki tine palavyat mhanun navya pratha ujedat yetat sasrchya lokakadun..tyapeksha he bar... chaan lihilay..

छान लिहिलंय.
ह्यातून आपल्याला हवं ते किंवा आवडेल ते करायचं आणि सासरी आवडत नसेल तर मुद्दाम फोन करुन सांगायचं नाही हे शिकलात की नाही?