जन्मसिद्ध अधिकार..(शतशब्दकथा)

Submitted by पद्म on 25 July, 2017 - 00:50

"मी काही केल्या येथून जाणार नाहीये! हे माझं घर आहे, लहानाचा मोठा मी इथेच झालोय. त्यांना काहीएक अधिकार नाहीये मला जबरदस्तीने येथून बाहेर काढण्याचा, त्या नराधमांना काय माहिती माझ्या किती भावना जोडल्या गेल्या आहेत या घराशी...आणि त्यांनी हेही विसरू नये की, भारतात आता हुकूमशाही नाही, तर लोकशाही आहे आणि या लोकशाहीत मला मिळालेले वैयक्तिक आणि मूलभूत अधिकार ते माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत...त्यांना बाहेर कितीही आरडा ओरडा करू दे , कितीही प्रलोभने दाखवण्याचा प्रयत्न करू दे, मी मात्र इथेच राहणार. सांगावं त्यांना की, जितका जोर असेल लावा मीपण काही कमी नाहीये..."
डॉक्टरांकडे आता सिझरियन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता...!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

chaan!

@ मयुरी चवाथे-शिंदे , लॉजिकमध्ये काय चुकलंय? पुढच्या वेळी सुधारण्याचा प्रयत्न करेल....

@निस्तुला, प्रतिसादाकरिता धन्यवाद....पण मयुरी या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. आणि त्यांच्याकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत.

या माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. आणि त्यांच्याकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. >>> आपला दृष्टिकोन आवडला. प्रगती कराल. शुभं भवतु!

पण नक्की कथा मला समजली नाही.
१. त्या जीवाला स्वतःहुन बाहेर का यायचं नाहीए?
२. स्त्रीभ्रूण हत्ये संबंधी कथा आहे का?
३. सिझरीयनशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, म्हणजे अगोदर काही पर्याय केला होता का? कोणता?
४. अजून बरेच प्रश्न पडलेत. तूर्त एवढेच.

मी कन्फ्यूस्ड झालोय.

त्या जीवाला स्वतःहुन बाहेर का यायचं नाहीए?>>> विकसित बुद्धी नसतानाही इंडिपेंडेंट मेन्टॅलिटी.
स्त्रीभ्रूण हत्ये संबंधी कथा आहे का?>>> नाही.
सिझरीयनशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, म्हणजे अगोदर काही पर्याय केला होता का? कोणता?>>> माझ्या मते तरी, नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य दिलं जातं.

पद्म धन्यवाद... प्रतिसाद नेहमी वाचावेत अन लक्षात घ्यावे..निगेटिव्ह प्रतिसादाने लेखन सुधारतं आणि चांगल्या पॉसिटीव्ह प्रतिसादाने प्रोत्साहन मिळत. (असं माझं मत ) नेहमीचं गोगोड कसं खायचं?

हर्पेन म्हणाले तसं...कथा कल्पना चांगलीय... पण स्पष्टीकरण त्याला साजेस नाहीये... आईच्या पोटातलं बाळ... एकदम एवढं मोठ्या माणसासारखं बोलतय?(नराधम, हुकूमशाही, लोकशाही, मूलभूत अधिकार...असे शब्द)) ते खटकलं. मला त्यामुळेच " काहीही" असं लिहावंसं वाटलं.

सचिन ... त्या बाळाला आईचा गर्भ आवडलाय.. तेच तो घर समजतोय...

मस्तय.
मला पण विनोदीच वाटली आणि म्हणूनच आवडली. Happy

प्रतिसाद नेहमी वाचावेत अन लक्षात घ्यावे..निगेटिव्ह प्रतिसादाने लेखन सुधारतं आणि चांगल्या पॉसिटीव्ह प्रतिसादाने प्रोत्साहन मिळत. (असं माझं मत ) नेहमीचं गोडगोड कसं खायचं? >>>+१११ आवडलं.
हो, नक्कीच असं घडतं..

येथे अवांतर होईल पण तरीही नमुद करावसं वाटतं;
काही निगेटिव प्रतिसाद खरंच प्रतिसाद देणार्याकडून लिहीणार्यानं लेखन सुधरावं हा दृष्टिकोण ठेऊन दिलेले असतात..याउलट काही प्रतिसाद खुप जहरीले, खवचट आणि नाऊमेद करणारे असतात..

माझं वैयक्तिक मत असं आहे, लहान बाळाचं बोबडं बोलणं आपल्याला कौतुकाचं वाटतं, रांगणं आनंद देत आणि आपण त्याला या गोष्टी शिकायला प्रोत्साहन देतो, मदत करतो त्याप्रमाणे नविन लिहू लागलेल्यांशी सर्वांनी व्यवहार करायला हवा.. Happy

यावरून सहज आठवले, एकदा कँटीनमध्ये संध्याकाळच्या वेळेला मित्रांसोबत बसल्याबसल्या मी अशाच गप्पा सुरू केलेल्या. मित्रांपैकीच एकेकाचे नाव घेत त्याने या जगात येताना त्याच्या स्वभावाला अनुसरून कशी नाटकी केली असतील..
आता फारसे आठवत नाही, पण मजा आलेली.

कल्पना चांगली होती. या घराशी माझी नाळ जुळली आहे असा एक डायलॉग हवा होता. एकदम रिअ‍ॅलिस्त्टिक झाले असते.